मेष राशी आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाईल. रक्षाबंधन असल्याने घरी उत्साहाचं वातावरण असेल. एकामागून एक बातम्या कानावर येऊन आदळतील. अर्थात आनंदाचे समाचार असतील. एखाद्या नव्या कामात रुची वाढेल. एखादं काम उद्यावर ढकलू नका. आजच करा. जुन्या चुका करू नका. धार्मिक कार्यात भाग घ्याल. दूरचा प्रवास संभवतो. वृषभ राशी नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत आज महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज खर्च वाढेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने एखादं थांबलेलं काम मार्गी लागेल. शेजाऱ्याच्या नादी लागू नका. जोडीदाराचे बोलणे ऐकावे लागेल. मनाने केलेल्या कामाचा फटका बसेल. आरोग्याची कुणकुण जाणवू शकते. बहिणीशी भेट होईल. मिथुन राशी आजचा दिवस सामान्य राहील. इच्छा नसताना कामावर जावं…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते. वाहतुकी संदर्भात नियोजन शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे.…
नागपूर : वृत्तसंस्था महाविकास आघाडीमध्ये सध्या भावी मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा मग पाठिंबा देतो. याबरोबरच शनिवारी(दि.17) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील असा पुनरुच्चार केला आहे. शनिवारी (दि.17) विदर्भामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 2019 मध्येही उद्धव ठाकरे यांना सर्व संमतीने मुख्यमंत्री करण्यात आले होते. आता 2024 ची वेळ आहे. जागावाटप सुसंवादातून होईल आणि मविआचे सरकार येईल. मला विश्वास नव्हे खात्री आहे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील,…
जळगाव : प्रतिनिधी रक्षा बंधनासाठी गुजरात येथे बहिणीकडे गेलेल्या कुटुंबीयांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. चोरलेला सुमारे ११ लाखांचा ऐवजसह चोरट्यांनी त्यांच्याच दुचाकीवरुन तेथून पळून जात होते. परंतु रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या संयशास्पदरित्या दुचाकीवरुन जाणाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा मुद्देमाल घेवून पसार झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास बजरंग बोगदा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महावीर नगरात नितीन खंदार हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रक्षा बंधनानिमित्त ते कुटुंबियांसह गुजरात येथील वडोदरा येथे बहिणीकडे शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारने गेले होते. यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चार चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मौजे अहिरे बु ।। रहिवासी गं.भा.आप्रूकबाई रतन पाटील, वय वर्षे 87 यांचे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 5.45 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.00 वाजता मौजे अहिरे बु ।। या मुळ गावी राहत्या घरुन निघणार असुन मौजे अहिरे बु ।। येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या इंजि. श्रीराम रतन पाटील कार्यकारी अभियंता, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या मातोश्री होत.
जळगाव : प्रातिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने आर्यकीर्ती उर्फ बबलू चंद्रकांत सोनवणे (२६, रा. श्यामनगर) हा तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) गिरणा पंपिंग रस्त्यानजीकच्या रेल्वे रुळावर घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्यामनगरातील रहिवासी आर्यकीर्ती सोनवणे हा तरुण एका कापड दुकानात कामाला होता. शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तो ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. यावेळी नातेवाइकांनी आक्रोश केला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी येथे ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव प्रवीण सोमा साळुंखे असे आहे. नातेवाइकांनी त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण साळुंखे यांनी शनिवारी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाइकांचे निदर्शनास येताच त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी मृत घोषित केले. चंद्रकांत साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपीचं नाव जगन धर्मा कोळी (४४) रा. अयोध्यानगर भुसावळ असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर भागात पालिका संकुलात आयुष्यमान आरोग्य मंदिर बंद कार्यालयाजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दहा हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्टल (कट्टा) मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत असल्याने ताब्यात घेतले. या प्रकरणी पो.कॉ. राहुल नारायण भोई यांनी खबर दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव : प्रतिनिधी मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची पट संख्या वाढवावी. प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहावे. शिक्षकांनी ड्रेस कोड वापर करावा, पायी शिक्षण घेणाऱ्या मुलींना 1 हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार असून जिल्ह्यातील जिप शाळांच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. बसविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून शाळेचा जिल्हा व राज्यस्तरावर नावलौकिक वाढवावा असे आवाहन करून माझी शाळा – सुंदर शाळा हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव इंदिरा कन्या विद्यालय येथे शिक्षण विभागा मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत…
मेष राशी आध्यात्मिक कार्यामध्ये बराच वेळ घालवाल. त्यामुळे तुमची विचारसरणी उजळून निघेल. इतरांना मदत करण्यातून आध्यात्मिक सुख मिळू शकते. वैयक्तिक कामही शांतपणे सुटेल. कारणाशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाशी वाद घालू नका. मुलांना काही समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीची सल्ला घ्या. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात जास्त गुंतवणूक करू नका. जीवनसाथीच्या अस्वस्थतेमुळे तुम्हाला घरात सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहू शकते. वृषभ राशी वडिलांचे मार्गदर्शन आणि सल्ला आज तुमच्यासाठी वरदान ठरेल. काही महत्त्वाचे कामही वेळेवर पूर्ण होऊ शकते. कोणतीही समस्या मित्रासोबत फोनवर बोलूनही सोडवली जाऊ शकते. खर्चासंबंधी खूप उदासीन बनाल. स्वतःला नुकसान पोहोचवण्याऐवजी थोडं स्वार्थी व्हा. भाडेसंबंधी बाबींबाबत वादळे निर्माण होऊ शकतात. व्यवसायानुसार स्थिती सध्या…

