जळगाव : प्रतिनिधी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने शेख खलील शेख यूनूस याने त्याच्या आईला विट मारण्यासह बहीण, भाचा व मुलावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील शेख युनूस हा त्याच्या आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतू त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने अंगणात पडलेली विट आईच्या डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी शेख खलील याची बहीणा नजमुननिसा जावेद शेख, त्यांचा मुलगा व भाचा हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता शेख खलील याने त्यांच्यावर विळ्याने…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकाश आकाश मुंडे (वय ३१, रा. परळी, जि. बीड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिणेच्या बाजूला बॅगची तपासणी करत असताना स्कॅनर मशीनमध्ये पिस्तूल आढळले. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे आढळली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना व लोहमार्गचे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले. काही दिवसांपूर्वीच लगेज स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा…
जळगाव : प्रतिनिधी लहान मुलाला मारत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने आजीज अक्रम खान (वय २७, रा. उस्मानिया पार्क) या तरुणाला मारहाण करीत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १२ रोजी सायंकाळच्या सुमारास धनाजी काळे नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजीम अक्रम खान हा तरुण वास्तव्यास असून तो ई कार्डचे पार्सल वाटपाचे काम करतो. दि १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीने धनाजी काळे नगरातील पार्सल वाटप करण्यासाठी गेला. याठिकाणी एक जण लहान मुलाला मारहाण करीत होता. दरम्यान, आजीम याने त्या इसमाला मुलाला का मारतोय अशी विचारणा…
मेष राशी आज तुम्हाला व्यवसायात तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी अधिक समन्वय निर्माण करावा लागेल. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात लाभाचे संकेत मिळतील, कार्यक्षेत्रात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. वृषभ राशी पूर्वीपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यात प्रगतीचा योगायोग आहे. राज्यात आणि समाजात मान-सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. तुमचा विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मिथुन राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्याने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. पण आता थोड्या वेळापूर्वी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी लागण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. आज सकाळी ९ वाजता महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. विधानसभे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. दरम्यान, आजची कॅबिनेट शेवटची असून लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यमंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसावर घोषित होणार असतांना भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या विविध 9 ठिकाणी 2 कोटी 64 लाख रुपये निधी तर विविध विकास कामांसाठी 75 लक्ष निधी मंजूर करून मुस्लिम समाजासाठी विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाच्या सभागृहाच्या उभारणीमुळे मुस्लिम समाजातील समता आणि एकता दृढ होण्यास मदत होवून सामाजिक प्रगती साधता येईल. धरणगाव येथे मुस्लिम समाज व पंच मंडळ आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह शासन कायमच प्रयत्नशील आहे. या सभागृहाच्या…
जळगाव : प्रतिनिधी घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून घरात प्रवेश करीत रवींद्र उर्फ गोलू भागवत चौधरी (रा. खेडी बुद्रुक) याने एका महिलेचा विनयभंग केला. तसेच या महिलेच्या पतीलाही धक्काबुक्की केली. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. ती महिला घराच्या दरवाजाचे कुलूप उघडत असताना रवींद्र चौधरी हा त्याठिकाणी आला. व त्याने घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून महिलेला अश्लील शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. महिलेचे पती वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील धक्काबुक्की…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील लालमाती येथे रविवारी रात्री हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी एका गटातील ११ जणांविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफा शित्र तडवी याने चिथावणी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश नारायण पवार (४४) हे त्यांना याबाबत विचारणा करण्यास गेले असता शिवीगाळ करण्यात आली. याचबरोबर धमकी देत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रमेश नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर शित्र तडवी, शब्बीर उर्फ चंवा शित्र तडवी, मुस्तफा शित्र तडवी, हसन जहात तडवी, हुसेन जहात तडवी, कालु…

