Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच पाचोरा तालुक्यातील म्हसावद-नांद्रा रस्त्यादरम्यान माहिजी गावाजवळ स्लॅब टाकण्याच्या मिक्सर मशीनचा दोर तुटल्याने दुचाकीवर बसलेल्या मामा-भाचा जखमी झाले आहेत. या दोघांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगावच्या खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद येथील मिक्सर मशीन (एमएच १९ सीवाय ९०३२) या टेम्पो गाडीला मागे दोर बांधून नांद्राकडे जात असताना माहिजी गावाच्या पुढे लासगाव येथील नाना गणसिंग पाटील (६५) व भाचा नारायण साहेबराव पाटील (३५, खोकरपाट) हे दुचाकीवरून चालले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान लासगाव (ता. पाचोरा) येथून अंतुली (ता. एरंडोल) येथे गंधमुक्तीच्या…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी जळगाव शहरासह चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गुरे चारताना वीज कोसळून शिरसोलीतील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. धुळ्यातही सोमवारनंतर मंगळवारी सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार येथे मंगळवारी जोरदार पाऊस झाला. धरणाजवळ गुरे चारत असताना वीज कोसळल्याने त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी) (७१, रा. शिरसोली प्र.न.) हे जागीच ठार झाले. या सोबतच तेथे एक म्हैसही दगावली. ही घटना तालुक्यातील शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ मंगळवारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेदरम्यान घडली. त्र्यंबक अस्वार हे मंगळवारी नायगाव धरणाजवळ गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला व अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात…

Read More

मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असेल. तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या आजूबाजूला जर काही वाद सुरू असेल तर त्यात पडू नका. मौन बाळगा. तेच तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आज असंख्य नवीन लोकांसोबत चर्चा करावी लागणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्येचा पूर्णविराम होईल. आज तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीचं भान ठेवा आणि त्यानुसारच पैसा खर्च करा. आज तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. मुलांसोबत आज वेळ घालवाल. त्यामुळे तुमचा तणाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी संतांचे आशीर्वाद प्रेरणा देतात. सेवेतून सत्कार्य घडते. संतांचे कीर्तनातून प्रबोधन हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत होत आहे हे पुण्याचे काम आहे. प्रत्येकाने किर्तन श्रवण करून सात्विक होण्याचे भाग्य घ्यावे असे आवाहन जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले. उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान अयोध्या येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्या येथे भगवान प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये बेळी येथील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील हभप भरतजी महाराज पाटील हे भाविकांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या ठिकाणी सोमवार दि. १९…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारी नोकऱ्यांसाठी थेट पद्धतीने नियुक्ती (लॅटरल एंट्री) करण्याच्या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘हे देशविरोधी पाऊल असून, यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेतले जात आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘आयएएसचे खासगीकरण ही मोदी सरकारची आरक्षण संपवण्याची गॅरंटी आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी सेवकांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून करून राज्यघटनेवर हल्ला करीत आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली. केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयांतील सहसचिव, संचालक आणि उपसंचालक आदी पदांवर 45 तज्ज्ञांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे.…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर येथील शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मोठा जनउद्रेक उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात न्यावे. विशेषतः अशा नराधमांच्या मनात धडकी भरण्यासाठी त्यांना एकदा तरी सार्वजनिकपणे फाशी दिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, लैंगिक अत्याचाराची एखादी अशी घटना घडल्यानंतर केवळ बदल्या करून प्रकरण सुटणार नाही. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करते.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गुजरातसह राज्यभरातील विविध शहरातून ऑटो रिक्षा व दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून सहा रिक्षांसह १४ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलावून त्यांची विक्री केली, तर काही वाहने गहाण ठेवल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून चोरी झालेली दुचाकी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तरुण वापरत असून होता. ती दुचाकी तो पंधरा हजारात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकातील कर्मचारी प्रवीण भालेराव यांना मिळाली. त्यांनी दुचाकी विक्री करणाऱ्या आमीन कालु मणियार (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला पाळधी, ता.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी जाणारे रिक्षाचालक बबलू शेख उस्मान शेख (३५, रा. तांबापुरा) यांच्याकडे पैशाची मागणी केल्याने त्यांनी नकार देताच त्यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री इच्छादेवी चौकात घडली. १८ रोजी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बबलू शेख उस्मान शेख हे शनिवारी रात्री मुलांसाठी नाश्ता घेण्यासाठी ईच्छादेवी चौकात आले होते. तेथे दोन जणांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून दोघांनी शेख यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे येथील निंबा देवी धरणात मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची सोमवारी (दि. १९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. मृत तरुणाचे नाव वेदांत सुवर्णसिंग पाटील (२०, रा. निमगाव, ता. यावल) असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता. सध्या तो पदवीचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता, रक्षाबंधनानिमित्त सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत निंबा देवी धरणावर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, धरणाच्या सांडव्यामध्ये पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला. त्यानंतर तो वर आलाच नाही.…

Read More