जळगाव : प्रतिनिधी
घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून घरात प्रवेश करीत रवींद्र उर्फ गोलू भागवत चौधरी (रा. खेडी बुद्रुक) याने एका महिलेचा विनयभंग केला. तसेच या महिलेच्या पतीलाही धक्काबुक्की केली. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. ती महिला घराच्या दरवाजाचे कुलूप उघडत असताना रवींद्र चौधरी हा त्याठिकाणी आला. व त्याने घरमालकाशी असलेल्या वादाच्या कारणातून महिलेला अश्लील शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. महिलेचे पती वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील धक्काबुक्की केली. रवींद्र याला चेतन प्रदीप गाजरे (रा. खिरोदा, ता. रावेर) याने चिथावणी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर महिलेने चौधरी व गाजरे यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.