Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तालुका पोलिस रात्री फिरायला निघालेल्या कल्पना ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर संजय पाटील (वय ५४, रा. खोटेनगर, निमखेडी शिवार, जळगाव) या महिलेल्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना पाटील या खोटेनगरात कुटुंबासह वास्तव्याला आहेत. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते फिरायला निघाले होते. तालुका पोलिस ठाण्यासमोर पाण्याच्या टाकीजवळ चालत असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ दुचाकी हळू केली आणि काही कळण्याच्या आतच कल्पना पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पोबारा केला. यावेळी महिलेने जोरदार आरडाओरड केली. मात्र, चोरटे पसार…

Read More

चोपडा : प्रतिनिधी बांधकाम करताना वापराचा रस्ता सोडावा, या कारणावरून अडावद (ता. चोपडा) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दगड, विटांचा वापर करण्यात आला. घटनेत ८ ते १० जण जखमी झाले; तर, तब्बल ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. यात आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी एक गट पोलीस ठाण्यात पोहोचला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगाव…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी आपल्या जळगाव शहराचा ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरू झाला. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘वेदा’ मधील अभिनेत्री तन्वी मल्हारा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. मंचावर सिनेअभिनेत्री तनवी मल्हारा, माजी महापौर सीमाताई भोळे, भारतीताई सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, रंजना वानखेडे, सुरेखा तायडे, रेखा वर्मा, कुमुदिनी नारखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भगवान नटराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर समन्वयक सचिन महाजन यांनी प्रस्तावना केली.स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावून सादरीकरण करावे. आपल्या आवडत्या कलाप्रकारातून करिअर करायचे असेल तर निश्चितच ध्येयप्रती…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधला. बजत गटांच्या माध्यमातून अनेक महिला या लखपती झाल्या महिला बचत गटांना जे कर्ज दिले ते त्यांनी नियमित परत केले. केंद्र व राज्याने ज्या संधी उपलब्ध करुन दिल्या त्याचे त्यांनी सोनं केले. राज्यात लाडकी बहिण योजनांचा अनेक महिलानी लाभ घेतला, ज्या महिला भगिनींनी या योजनेचा अजून पर्यंत घेतलेले नाही त्यांनी आपली नोंदणी…

Read More

मेष राशी वाहनामुळे त्रास होऊ शकतो. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी काही वेळ आधीच घर सोडा. व्यवसाय योजना गुप्तपणे पार पाडा. अन्यथा कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला किंवा शत्रूला त्याची माहिती मिळाल्यास ते विस्कळीत होऊ शकते. नवीन कर्मचारी किंवा व्यवसायात काम करणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवा. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लक्षणीय यश व सन्मान मिळेल. राजकारणात तुम्हाला काही महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद न्यायालयाच्या माध्यमातून सोडवला जाईल. वृषभ राशी नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील. नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. बौद्धिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पावसाळा सुरु झाल्यापासून सतत पाऊस सुरु होता. दरम्यान पावासने काहीशी उसंत घेतली मात्र यंदा पिकांना आवश्यक प्रमाणात ऊन मिळत नसल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अश्यात आता ढगाळ वातावरण कायम असल्यानेआणि वातावरणात होत असलेल्या बदलाने कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. मात्र मागील दोन- तीन वर्षापासून सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना घट येत असून उत्पादन खर्च अधिक होत आहे. शिवाय हमी भावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतं असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कपाशी पिकाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील राजकारण तापले असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. केंद्रात भाजपचे सरकार तर राज्यात महायुतीचे सरकार असतांना देखील भाजपच्या एका नेत्याने जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागितली असल्याने सध्या भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. भाजपमध्ये संधी मिळत नसल्याने होणाऱ्या घुसमटीतून आपण जरांगेंकडे तिकीट मागितले आहे, असे या नेत्याने म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पेटवला आहे. या मुद्यावरून त्यांनी सरकार व विरोधी पक्षांची कोंडी केली असताना भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी यांनी मनोज जरांगे यांच्याकडे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासुंद देशासह राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असताना विरोधकांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली असतांना नुकतेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल, यूपी, बिहारपाठोपाठ महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लाजिरवाणे गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत? काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, बदलापूरमध्ये दोन निरपराधांवर झालेल्या गुन्ह्यानंतर जनता जोपर्यंत ‘न्यायासाठी याचना’ करत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले जात नाही. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? अखेर पीडितांना…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील बसस्टँड परिसरामध्ये उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती गांजा घेऊन फिरत होता. बसने निघून जाण्याच्या तयारीत असताना चोपडा शहर पोलिसांना गोपनीय माहितीनुसार ताब्यात घेतले. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून २० रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चोपडा बस स्टैंड परिसरात उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातील दुबारी येथील मजूर रामकिशन मुनीब चौहान (वय २४) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, २१ रोजी चोपडा न्यायालयाने रामकिशन चौहान यास २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत. ही…

Read More