जळगाव :प्रतिनिधी सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर एकनाथ रामदास पाटील (वय 75, रा. साळवा, ता. धरणगाव, ह. मु. जळगाव) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ पाटील हे आजारी होते. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 28 रोजी दुपारी 3 वाजता राहते घर महाबळ कॉलनी च्या खाली संभाजीनगर चौक (डॉ. राहुल पाटील यांच्या घरासमोर) येथून निघणार असून नेरी नाका समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आवास योजनेत मंजूर घरकूल नावावर करण्यासाठी लाभार्थ्याकडून १० हजारांची लाच घेताना खडकदेवळा, ता. पाचोरा येथील सरपंच व त्याच्या पंटरला रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खडकदेवळा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (४६) आणि त्याचा पंटर बलराम हेमराज भिल (४६, रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहे. त्यांचे आवास योजनेतंर्गत घरकूल मंजूर झाले होते. परंतु ते राहत असलेल्या जागेला नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यात आलेले नव्हते. ते काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती.…
जळगाव : प्रतिनिधी बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय असलेल्या भोपाळ येथील भूषण भिका वाघ (३५) यांनी जळगावात थांबलेल्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण वाघ ८ ते १० दिवसांपासून कामानिमित्त जळगावात आले होते. एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी, हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेल मालकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण असा परिवार आहे.
जळगाव : प्रतिनिधी पत्नीसह रावेर येथे मुलाकडे गेलेले निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (६७, रा. दादावाडी) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख सात हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बडगुजर हे पत्नीसह १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेले पंकज बडगुजर या मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या चांदीच्या दोन…
जळगाव : प्रतिनिधी सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट २०२३ पासून सुरू होता. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून करण दत्तू सोनवणे (२०, रा. कांचननगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलगी दहावीत असल्यापासून करण सोनवणे याने तिच्याशी ओळख निर्माण केली. दि. १० सप्टेंबर रोजी, या मुलीला दुचाकीवर मेहरुण तलाव परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. मुलीने २६ सप्टेंबरला शनिपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून तरुणाला अटक करण्यात आली.…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील फापोरे – मंगरूळ रस्त्यावर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) उघडकीस आली. बिबट्या चिखलात रुतलेला असल्याने त्याचा निमोनियाने किंवा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या बिबट्याचे वय ४ ते ५ वर्षे असावे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ रोजी बिबट्याने एक पारडू फस्त केले होते. वनविभागाने त्याचा पंचनामा करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शुक्रवारी सकाळी फापोरे मंगरूळ रस्त्यावरील शेतात बिबट्या चिखलात रुतलेला मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शव जानवे जंगलात नेऊन त्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत झाले. यात एका २२ वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि कंबरेवर धारदार वस्तूने वार करून त्याला जबर दुखापत केली. ही घटना दिनांक २५ रोजी रात्री घडली होती. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरागड येथील रहिवासी गणेश राजू सोळुंके (२२) हा तरुण मनवेल, ता. यावल या गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला होता. तेथे नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत घडले. शिरागड गावात गणेश सोळुंके याला ताराचंद व्यंकट सोळंके, कैलास व्यंकट सोळंके व…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मुडी गावातील रहिवासी असलेला तरुण आणि त्याच्या वडिलांना एकाच दिवशी नियतीने हिरावून नेले. मुडी येथील रहिवासी व सध्या जालना येथे वास्तव्यास असलेल्या सूर्यवंशी परिवारातील गौरव राजेंद्र सूर्यवंशी (३८) यांचे अल्पशा आजाराने २६ रोजी पहाटे २ वाजता निधन झाले. त्याचे वडील राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी (६८) यांचे २६ रोजी रात्री १० वाजता निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सूर्यवंशी हे जालना येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ते छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पत्नी त्यांची देखरेख करीत होती.दरम्यान, पोटाच्या विकाराने गौरव हा देखील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल होता. रात्री अचानक पोटात रक्तस्त्राव झाल्याने…
मेष राशी प्रयत्नांना यश मिळेल. मानसन्मान मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. आनंद होईल. नोकरीत अपेक्षित बढती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस घेतल्याने तुमचे मनोबल वाढेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. लहान भावंडांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ राशी भेटवस्तू मिळेल. तुमची मनमिळाऊ आणि सहनशील स्वभाव आयुष्यात आनंद आणेल. कायमस्वरूपी संपत्ती वाढेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. डोळा दुखणे शक्य आहे. वाद घालू नका. रोजगार मिळेल. दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन राशी तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रवास यशस्वी होईल. फायदा होईल. चांगले मनोबल तुमच्या…
मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी याबद्दल हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याबद्दल आता सुनावणी पार पडली. आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. नुकतंच याबद्दल हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश…

