नवी दिल्ली : वृत्तसंस्था गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता त्यात मोठा बदल झाला आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ दिला जातो. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे. या गोष्टी मिळणार केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच महायुतीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत ६० पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि युवकांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरे जायचे याबाबत सखोल मार्गदर्शन युवक पदाधिका-यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला किती जागा लढणार याबाबतही त्यांनी खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या ५४ आमदार आहेत. तर दोन आमदारांचा…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था देशासह राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक्स-रे काढण्यासाठी तरुणाला निर्वस्र करून अंगालाही स्पर्श केला. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टेक्निशियनने टॉप काढायला लावत निर्वस्त्र करून तिच्या अंगाला स्पर्श केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे एक्स-रे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचही समोर आले आहे. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर तो घाटीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. मात्र कंत्राट संपल्यानंतर…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा आदी भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकटांसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे…
अमळनेर : प्रतिनिधी धार येथील पाझर तलावात बारावीतील जयेश दीपक पाटील या एका विद्यार्थ्यांचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते. त्यात तो पाण्यात बुडाला. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत मारवड पोलिस ठाण्याचे पोहेकाँ सुनील तेली, पोहेकॉ मुकेश साळुंखे, कुलदीप चव्हाण (रा.अमळनेर), प्रशांत धाप (रा.अमळनेर), इक्बाल शेख (रा.धार), सोपान पाटील (रा.धार) यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. जयेश हा कंडारी गावाचा रहिवासी होता. त्याने शिक्षणासाठी शहरातील अयोध्या नगरात रूम केला होता, प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्यानंतर त्याने बारावीसाठी…
जळगाव : प्रतिनिधी रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंप्राळा भागात जुन्या वादात तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. नूर मोहम्मद शेख लतीफ (वय ४०, रा. अक्सानगर) याच्यावर दि. २९ रोजी, रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेसोबत काही वाद झाले होते. त्याबाबत महिलेने नूर मोहम्मद विरुद्ध तक्रार देण्याची तयारी केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर २० जुलै २०२४ रोजी नूर मोहम्मद हा रात्री ११.४५ वाजता महिलेच्या घरी आला, तेव्हा महिला घरी एकटीच असताना, माझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेवर अत्याचार केला. याबाबत जर कोणाला सांगितले तर,…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी स्वप्निल देवीदास चौधरी (३०) याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी ही घटना घडली. विशेष म्हणजे त्याने पत्नी पूनम हीस चिप्स तळून मागितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी किचनमध्ये चिप्स करत असताना दुसऱ्या खोलीत त्याने आत्महत्या केली. पत्नी पूनमही चिप्स द्यायला गेली असता हा प्रकार लक्षात आला. घटनेमागील कारण समजू शकले नाही. स्वप्निल याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विजय नवल चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.
मेष राशी आज तुमचं नशीब जोरावर आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. गोड बातमी मिळण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचं लक्ष्य साधण्यात यश मिळेल. विभिन्न कार्यात तेजी येईल. तुमच्या प्रयत्नांमुळे सर्वांना प्रभावीत करून सोडाल. संकोच दूर होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. भावनेच्याभरात कोणताही निर्णय घेऊ नका. दुसऱ्यांवर टीकाटिप्पणी करण्यात वेळ वाया घालवू नका. आज जीवनसाथीसोबत ऑनलाईन शॉपिंग कराल. तरुणांशी मैत्री होईल. दाताची कवळी बदलून घ्या. वृषभ राशी आज मेहनतीचं फळ मिळण्याचा दिवस आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित काम मार्गी लागेल. तुमचं लक्ष्य पूर्ण करण्यावर भर द्या. पर्सनल लाईफबाबत कोणतीही रिस्क घेऊ नका. तुमच्या पर्सनल लाइफबाबत कुणालाही बोलू नका. पती पत्नीच्या दरम्यानचे संबंध चांगले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पालघरमध्ये आज ७६ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यामध्ये वाढवण बंदर प्रकल्पाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यात आले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि.३० रोजी माफी मागितली. शिवराय आमचे आराध्य दैवत आहेत, आम्ही त्यांच्या चरणी डोके ठेऊन मी माफी मागतो, त्याचबरोबर जे शिवरायांना आराध्य दैवत मानतात, त्या शिवभक्तांचीही माफी मागतो, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (दि.३०) वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबोधित करताना आपल्या भाषणाची मराठीतून सुरूवात केली. ते पुढे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकत्ता येथील घटना ताजी असतांना नुकतेच आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही बातमी समजताच महाविद्यालयात खळबळ उडाली. कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. जे नंतर लीक करून काही विद्यार्थिनींना विकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या फोटो आणि व्हिडिओंची संख्या 300 च्या आसपास आहे. याप्रकरणी पोलिसांनी विजय कुमार याला अटक केली आहे, जो गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुडीवाडा येथील बी.टेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आठवडाभरापूर्वी याची माहिती देण्यात आली…

