मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून त्यातच इच्छुक उमेदवार आपापली उमेदवारी फायनल करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत. यात सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांतील नेत्यांचा समावेश आहे. पण आता भाजपमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 24 नेते अस्वस्थ असून, त्यापैकी चार-पाच जण पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती उजेडात आली आहे. स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याची पुष्टी केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर अनेक मतदारसंघांतील राजकीय चित्र बदलले आहे. कोल्हापूरच्या कागल मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी व्यक्तीच्या अवतीभवती कसे मित्र असतात यावरून माणसाचे सामाजिक व राजकीय जीवन ठरते. पारोळा येथील गद्दाराच्या मुलाच्या अवतीभवती असणारा खास पंटर कार्यकर्ता एका निवृत्त परिचारिकेचा 30 लाखासाठी गडा आवरून खून केल्याप्रकरणी रात्री उशिरा स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पारोळा तालुक्यातील राजकारणात एकच खडबड उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांना मिळालेल्या तीस लाखाची रक्कम लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कार मध्ये त्यांची हत्या केली. या हत्तेचा उलगडा गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केला आहे. संशयित आरोपी विजय हा पारोळा येथील गद्दाराच्या मुलाचा खास पंटर कार्यकर्ता असून नेहमीच…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच पालघर तालुक्यातील दुर्गम भागातील बर्डे पाड्यालगतच्या नाल्यात आईसह दोन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डोंगरालगतच्या नाल्यात सोमवारी (दि.२) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही मृतदेह हातपाय बांधून दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, मनोर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला. सुश्मिता प्रवीण डावरे (वय २८) असे या मृत महिलेचे नाव आहे. ओढ्यात हात बांधलेल्या आणि दगडाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत दोन्ही मृतदेह आढळून आल्याने घातपात केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या मृत महिलेचा पती मच्छीमार बोटीवर काम करीत असल्याची…
चाळीसगाव : प्रतिनिधी फक्त बोलबच्चनगिरी व शब्दांचा खेळ करण्यात पटाईत असणारे उन्मेष पाटील यांची विश्वासार्हता सर्व जिल्ह्याला माहिती आहे. दूध संघांवर आरोप करणारी पत्रकार परिषद हा त्याचाच एक नमुना असून अर्धवट माहिती दातांत खोटे आरोप व जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भेसळ व इतर मुद्द्यांवर दूध संघाची बदनामी केली म्हणून पुढील काळात विक्रीवर त्याची दुरोगामी परिणाम होणार आहेत. उन्मेष पाटील व प्रमोद पाटील यांनी राजकारण करताना दूध संघाच्या हिताचाही विचार करावा, आपल्या राजकीय वैयक्तिक स्वार्थासाठी दूध संघाच्या विश्वासार्थाबाबत खोटी माहिती पसरू नये. आजपर्यंतच्या इतिहासात दूध संघाच्या दुधात भेसळ झाल्याबाबत साधा आरोप देखील कोणीही केला नाही अगदी स्पर्धकांनी देखील…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर कसबेत बैलपोळा फोडण्याच्या अर्धा तास अगोदर अचानक अज्ञातांकडून दोन गटांत दगडफेकीची घटना घडल्याने तणावपूर्ण वातावरण झाले. यात एका गटाचे १३ जण जखमी झाले असून, पैकी चार जणांना जळगाव येथे हलविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहूर कसबेत दपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे दगडफेकीची घटना घडली. घटनास्थळावरून काही जण पळताना जि.प. शाळेच्या खोलीचे पत्रे खाली कोसळल्याने काही युवक खाली पडले. पोलिस निरीक्षक सचिन सानप व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शांतता निर्माण केली. त्यानंतर, साडेचार वाजता नियोजित पोळा फोडण्यात आला. या सर्व घटनेत दगडफेकीचे कारण समोर आले नाही. मात्र, एका गटाकडून पहूर पोलिस…
नंदूरबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच खान्देशातील नंदूरबार शहरात एका १४ वर्षीय मुलीचा दोन वेळा विनयभंग करत तिची छळवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीने आई-वडिलांसह उपनगर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कैलास काशीराम मोरे (४३) असे मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी १४ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना कैलास याने तिला अश्लील हावभाव करत ‘मला घरात येऊ दे’ असे सांगितले होते. घाबरलेल्या मुलीने ही बाब शेजारी असलेल्या महिलेला सांगितल्यानंतर त्यांनी तिला धीर देत घराचा दरवाजा बंद ठेवण्यास…
मेष राशी उच्च पदावरील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचार ठेवा. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. मुलांचे सहकार्य मिळेल. व्यापार क्षेत्रात नवीन सहयोगी होतील. उद्योग विस्ताराची योजना यशस्वी होईल. कोणतेही मोठे निर्णय घाईत घेऊ नका. अचानक तुम्हाला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्र, नोकरी इत्यादी ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. तुमच्या वागण्यातही बदल होईल. वृषभ राशी नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील. नोकरीत वाहन सुख मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. व्यवसायात तुमच्या योजनांबद्दल विरोधकांना कळू देऊ नका. योजनेत अडथळे आणि अडथळे येऊ शकतात. मेकअपमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच ‘भारतीय जनता पक्षामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपकडे केली होती. मात्र भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे, मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार,’ असे सर्वात मोठे विधान एकनाथ खडसे यांनी केले. यामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात देणाऱ्या क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये यासंबंधी अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदाच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील १०८ शक्तीपीठांपैकी एक वैष्णो देवी मंदिर हे देवी दुर्गाला समर्पित आहे. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, याच ठिकाणी माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला आहे. यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने दोन महिला यात्रेकरू ठार झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तर एक मुलगी जखमी झाली आहे. या दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. जखमी भाविकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी सतर्क राहून मार्गाची स्थिती लक्षात घेऊन पुढे जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरड कोसळल्याने यात्रा मार्गावरील वाहतूक…

