मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळी सहभागी झाले आहेत. मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज महायुती सरकारविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलनाची हाक दिली होती. आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तिथून सर्वजण गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी येथील पी आर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज भारतीय विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थी सेनेच्या सदस्यांची नाव नोंदणी करून घेतली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते छत्र्या देखील वाटप करण्यात आल्या आहेत. धरणगाव येथील पीआर हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज (दि. 31) रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भारतीय विद्यार्थी सेना शाखेच्या पालकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रतापराव पाटील यांनी स्वतः विद्यार्थी सेनेच्या सदस्याची नोंद केली आणि सदस्यांना शिवबंधन बांधले. तसेच महाविद्यालयातील प्रोग्राम हॉलमध्ये…
नंदूरबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अत्याचाराच्या घटना ताज्या असतांना नुकतेच शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नराधम बापानेच नात्याला काळिमा फासत आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत मुलीच्या आईनेच शहादा पोलिसात शनिवारी दुपारी फिर्याद दिली. त्यावरून अत्याचारी बापाविरुद्ध बलात्काराचा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, या १३ वर्षीय मुलीवर तिच्याच बापाने एप्रिल व जुलै महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत तो तिच्यावर अत्याचार करीत होता. कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या अत्याचारातून बालिका गरोदर राहिली. ही…
जळगाव : प्रतिनिधी गरोदर असलेल्या पत्नीला गर्भ पाडावा यासाठी जबरदस्ती करून, पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह आणखी एका महिलेविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार नंदिनी राहुल सावळे (वय २९, रा. पिंप्राळा हुडको) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्या गरोदर आहेत. मात्र त्यांचा गर्भ पाडण्यात यावा, यासाठी पती राहुल पुंडलिक सावळे (वय ३३) याने शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पत्नी नंदिनी सावळे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोटावर मारहाण केली. या प्रकरणी नंदिनी सावळे यांनी शुक्रवारी दुपारी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन, पती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल केला असून आज १ सप्टेंबरपासून दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १९ किलो व्यावसायिक LPG सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १,६९१.५० असेल. ही दरवाढ अनेक घसरणीनंतर होत आहे. याआधी काही महिने व्यवसायांना काहीसा दिलासा मिळाला होता. जुलैमध्ये प्रति सिलिंडरच्या किमती ३० रूपयांनी कमी झाल्या होत्या, त्याआधी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथे एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश दीपक पाटील (वय १८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. वडील मजुरीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास यश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यास तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून यश याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच…
यावल : प्रतिनिधी यावल-चोपडा रस्त्यावर वढोदाजवळ एका दुचाकीवर जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरात बँकेतील ई केवायसी करण्यासाठी जनार्दन प्रल्हाद नारखेडे (६५) आशाबाई जनार्दन नारखेडे (६०) रा. डांभूर्णी हे दाम्पत्य आले होते. शुक्रवारी काम आटोपून सायंकाळी दुचाकीने क्रमांक एमएच १९ एबी १२९९ घरी जात असताना वढोदाजवळ मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने क्रमांक एमएच १९ एड़झेड ८८१० धडक दिली. या अपघातात जनार्दन नारखेडे आणि आशाबाई नारखेडे यांना जबर दुखापत झाली…
मेष राशी आज दिवसभर व्यस्त राहाल. घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. त्यांची सल्ला लाभदायक होईल. तुमच्या व्यक्तीमत्त्वात होत असलेला सकारात्मक बदल चर्चेचा विषय होईल. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. धैर्य ठेवा. शांततेने काम पूर्ण करा. त्यामुळे चांगला परिणाम मिळेल. तरुणांनो, संकटाच्या काळात बिथरून जाऊ नका. आज ऑफिशियल मिटिंग होईल. त्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल. पतीपत्नीत आज वाद होतील. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे दूरावा निर्माण होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. वृषभ राशी धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल. तसेच सेवेशी संबंधित क्षेत्रात योगदान द्याल. आज तुमचं अर्धवट काम मार्गी लागेल. मुलांसोबत दिवस घालवाल. व्यवसायात सावध राहा. नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात सत्ताधारी अनेक जिल्ह्यात ‘लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु असून या मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नुकतेच नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम पार पडला. अजित पवार म्हणाले, हे विरोधक एवढे वर्ष सत्तेत होते, तेव्हा तुम्हाला का नाही सुचले महिलांना मदत करण्याचे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. अजित पवार म्हणाले, तुम्ही फक्त महायुतील साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळतीलच. मात्र नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होईल. आम्ही तिघे…
चाळीसगाव : प्रतिनिधी आपल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षात चाळीसगाव मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरु केला आहे, या विकास कामांमध्ये आता चाळीसगाव शहरातील अजून 10 कोटींच्या विकास कामांची भर पडली आहे. चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील महत्वाचे रस्ते व खुली जागा विकसित करणे व सभामंडप, पथदिवे आदी कामांसाठी 10 कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजना कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, याबाबत शहरवासियांना दिलासा देण्यासाठी गेल्या 2 वर्षात 50 कोटींहुन अधिक निधी रस्त्यांच्या कामांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी…

