कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मतभेद असतांना नेहमीच दिसून येत असतांना पुन्हा एकदा आता शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी थोकारली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा,…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये मोठे राजकारण सुरु असतांना नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे. समुद्रकिनाराच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा एका माणसासोबत फेरफटका मारताना उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडावर कोटींग पावडर निघून गेले होते. आणि…
चाळीसगाव : प्रतिनिधी पोळ्याची सर्वत्र तयारी सुरू असतानाच ४८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना वाघडू येथे घडली. या घटनेने पोळ्याच्या सणावर दुःखाची छाया पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, वाघडू येथील शेतकरी साहेबराव भीमराव पाटील (४८) हे सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यास गेले असता त्यांचा शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. वडील घरी आले नाहीत, म्हणून मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात…
पाचोरा : प्रतिनिधी पोळ्याच्या दिवशी बैलाचा दुचाकीला धक्का लागल्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथे बैलपोळ्यानिमित्त बैलांना संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास गावात फेरफटका मारत असताना शेतकरी भाऊसाहेब नाना पाटील यांच्या बैलाचा अल्ताफ खान मेहबूब खान यांच्या दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे अल्ताफ खान याने शिवीगाळ केली. याचा जाब विचारल्याच्या रागातून अल्ताफ याने गल्लीतील युवकांना बोलावले. यावेळी बैलमालक भाऊसाहेब नाना पाटील यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. अल्ताफ मेहबूब खान, जुबेर अनिस खान, जुनेद अनिस खान, अकबर भिकन नजीर अमीन बाबू,…
रावेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुल्धार पाऊस सुरु असून नुकतेच दोधे शिवारात तापी नदीकाठी वास्तव्याला असणाऱ्या हातमुजरांच्या झोपडीवर दि. २ रोजी सायंकाळी ८:३० वाजता वीज कोसळली. त्यामुळे झोपडी जळून खाक झाली आहे. या घटनेत मध्यप्रदेशातील पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत रेखा कालू खरते, (वय २४, रा. बढी, ता. झिरण्या, मध्यप्रदेश), मीरा प्रताप जमरे (वय २८, रा. रतलीपुरा, ता. झिरण्या), पूजा प्रताप जमरे (वय ६) हे गंभीर जखमी झाले आहेत. कालू नाना खरते (२६, बढी, ता झिरण्या, जि. खरगोन) आणि ज्योती चंदरसिंग रावत (वय २९, रा. खिराला ता. झिरण्या,…
जळगाव : प्रतिनिधी सेवानिवृत्त परिचारिकास्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०, रा. खोटेनगर, जळगाव) यांचा ३० लाखांच्या रकमेसाठी खून करून, मृतदेह तापी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांना ११ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खून करून संशयितांनी फेकून दिलेल्या महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. मात्र, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी महिलेकडून लुबाडलेली तीस लाखांची रक्कम तसेच ज्या चार चाकी वाहनांमध्ये महिलेच्या खून केल्याचा संशय आहे. ती चार चाकी देखील जप्त केल्याची माहिती…
जळगाव : प्रतिनिधी थकीत कर्जाच्या रक्कमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, रा. नागपूर) यांच्यासह वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.३) सायंकाळी, रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनील पाटील याला लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक…
मेष राशी नोकरीचा शोध पूर्ण होईल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात येणारे अडथळे सासरच्या मंडळींच्या मदतीने दूर होतील. कामात नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. नोकरीत अधीनस्थांशी जवळीक लाभेल. दूरदेशी प्रवासाचे योग येतील. उद्योगाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल. कुटुंबात काही शुभ घटना घडतील. वृषभ राशी मनात वाईट विचार येतील. काही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. ऐषआरामात अधिक रस राहील. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होऊ शकतात. दुसऱ्याच्या भांडणात सहभागी होणे टाळा नाहीतर वाद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतो. राजकीय विरोधक षडयंत्र रचू शकतात. प्रवासादरम्यान काही मौल्यवान वस्तू हरवल्या किंवा चोरीला जाऊ शकतात. नोकरीच्या स्थितीत अधोगती होऊ शकते. आध्यात्मिक कार्य करावेसे वाटणार नाही. मिथुन राशी…
जळगाव : प्रतिनिधी के. सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा संचालित नंदुदादा बेंडाळे यांच्या संकल्पनेतून खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात.यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ,राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या अनुषंगाने खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती ,बॉक्सिंग ,धनुर्विद्या,हॉकी ,खोखो ,कबड्डी ,वेटलिफ्टिंग,हॉलीबॉल ,फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक ठिकाणी मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज दि.३ बलात्कार विरोधी (‘अपराजिता वुमन अँड चाइल्ड बिल ) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. नवीन कायद्यात बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला किंवा तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आरोपीस फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बलात्कार आणि सामूहिक बलात्कारच्या दोषींना पॅरोलशिवाय जन्मठेप शिक्षा होणार आहे. ‘अपराजिता वुमन अँड चाइल्ड बिल (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदे आणि सुधारणा) 2024’ हे विधेयक, बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. नुकत्याच लागू केलेल्या भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023…

