जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी परिसरात विश्वासाला तडा देणारी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या महिलेनेच घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका संदीप पाटील (वय ३९, रा. शिवकॉलनी) यांनी त्यांच्या मावशीचे चुलत जावई हर्षल संजय वाघ यांच्यावर नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २०२२ मध्ये १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. नोकरी न लावल्याने त्यांनी वारंवार पैसे परत मागितले, मात्र त्यांना टाळाटाळीची उत्तरे मिळत होती. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेचे केवायसी करून देण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी आलेल्या संशयिताने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडेही प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील ३५ वर्षीय महिलेला लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचे असल्याने तिच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण हा दि. २५ जानेवारी रोजी सदर महिलेच्या घरी आला होता. त्याने संबंधित महिलेकडून कागदपत्रे घेतले. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. तरीदेखील तो वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन…
धरणगांव : प्रतिनिधी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षांपासून शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित राहुल जगन्नाथ अहिरे (रा. अमळनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही धरणगाव शहरात वास्तव्यास असून तीन वर्षांपासून म्हणजेच २०२२ मध्ये एका शाळेत शिकत होती. त्यावेळी राहुल अहिरे हा त्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्याचा पीडितेच्या वर्गाशी काहीही एक संबंध नव्हता. परंतु तरी देखील तो पीडितेच्या वर्गाजवळ येवून तिला अश्लिल इशारे करीत…
जळगाव : प्रतिनिधी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन विक्रांत वासुदेव राणे (वय २०, रा. समर्थनगर खेडी, ता. जळगाव) या तरुणाला दोघांनी लोखंडी कड्यासह स्टिलच्या ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता खेडी गावात घडली. यप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी गावात विक्रांत राणे हा वास्तव्यास असून तो शिक्षण करतो. दि. ६ एप्रिल रोजी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन संशयित जितू पाटील व निखील पाटील यांनी विक्रांतला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर स्टिलच्या कड्यासह ब्लेडने त्याच्यावर वार करीत गंभीर जखमी केले. जखमी विक्रांतला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याने…
जळगाव : प्रतिनिधी घरमालकाच्या घरातून ६२ हजार रुपये किमतीच्या चिलर मशीन व पाच मोटारी चोरून नेणाऱ्या नासीर निसार शेख (रा. शाहूनगर) व कार्तिक संजय मोरे (रा. नवीपेठ) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. तिसरा साथीदार मात्र पसार आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, राजमालती नगरातील रहिवासी संजू बिसमिल्ला पटेल (वय ४९) यांनी त्यांच्या घरातील एक खोली नासीर शेख निसार याला भाडेतत्त्वावर दिली होती. १ एप्रिल रोजी ते भाडे घेण्याकरिता गेले असता मशिनरी व इतर साहित्य तेथे नव्हते. पटेल यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. ही चोरी नासीर शेख, कार्तिक मोरे व त्यांच्या अन्य एका…
आजचे राशिभविष्य दि.९ एप्रिल २०२६ मेष राशी आज, एका जवळच्या मित्राच्या मदतीने, बेकरी व्यवसायातील लोकांचा नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जीवनात आनंद घेण्यासाठी काही अद्भुत संधी मिळू शकतात. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्यासाठी खास ठरू शकतात आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पाठिंबाही मिळेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्हाला स्वतःला भाग्यवान वाटेल. मेष राशी आज, एका जवळच्या मित्राच्या मदतीने, बेकरी व्यवसायातील लोकांचा नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जीवनात आनंद घेण्यासाठी काही अद्भुत संधी मिळू शकतात. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्यासाठी खास ठरू शकतात आणि…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रमुख महिला नेत्री आणि मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची आज सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तातडीने त्यांना मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे उद्या गुरुवारी होणार्या विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीत त्या गैरहजर राहणार आहेत. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे पाठविली जाणार आहे. सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या धारदार वक्तृत्वाची आणि विरोधकांवर थेट हल्ला करण्याच्या शैलीसाठी ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता…
मुंबई : वृत्तसंस्था नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली…
बारामती : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल आणि निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून तब्बल ५५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने ही लढत आता अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देत धनगर समाजाचे प्रतिनिधित्व पुढे केल्याने निवडणुकीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. या जातीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यासमोरचे आव्हान वाढले असून, ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण बनत चालली आहे. दरम्यान, बदलत्या राजकीय…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील धूळपिंप्री येथे ५३ वर्षीय शेतकरी शेतात पाणी भरण्यास गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीजवळ पाय घसरून ते विहिरीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील धूळपिंप्री येथील तथा माजी सरपंच शेतकरी सतीश आत्माराम पाटील (वय ५३) हे नेहमीप्रमाणे ५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. ते सकाळपर्यंत घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे शेतात जावून नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. तर शेतातील विहिरीत मृत अवस्थेत ते आढळून आलेत. दरम्यान, पाय घसरुन ते विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात…

