Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली. पदभार स्वीकारताच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, या योजनेवर मुंबई उच्च न्यायालय यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने सरकारच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ही सुनावणी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर झाली. संबंधित महिलेला सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ मिळत नसल्याने तिने न्यायालयाची दार ठोठावली होती. सुनावणीदरम्यान पालिकेच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की, या लाभांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, कारण राज्य सरकारकडून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  प्रेमसंबंध असलेली महिला बोलत नसल्याच्या राग आल्याने संशयित गणेश छगन डोळे (रा. तानाजी मालुसरे नगर) याने महिलेवर लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद बायपास रोडवर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील एका भागात ३९ वर्षीय महिला राहत असून तिचे गणेश डोळे याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. ती महिला गणेश डोळे सोबत बोलत नसल्याचा त्याला राग आला. त्यामळे डोळे याने नशिराबाद बायपासवरील रस्त्यावर महिलेसोबत वाद घालीत तीलामारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी धारदार पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी महिलेने रुग्णालयात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात बालविवाहाची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर, वर्षभर चाललेल्या शोषणातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने जिल्हा शासकीय रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात गेल्यावर्षी एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. लग्न झाले तेव्हा आणि त्यानंतरही पीडितेचे वय कायद्याने लग्नासाठी पात्र नव्हते. विवाहानंतर वर्षभराच्या काळात पीडितेच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यात आले, ज्यातून ती गर्भवती राहिली. पीडितेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल…

Read More

पाळधी सबस्टेशनचा खेळखंडोबा! महावितरणमुळे उद्योग ठप्प; रोजगार धोक्यात, आंदोलनाचा इशारा जळगाव : विजय पाटील  जिल्ह्यातील पाळधी सबस्टेशन अंतर्गत एक्सप्रेस फिडरवरील वीज पुरवठ्याच्या सतत खंडित होणाऱ्या समस्येमुळे स्थानिक उद्योजक आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जैन कंपनी, बॉश कंपनीसह विद्यापीठ परिसरातील लहान व्यवसायिकांना या अस्थिर वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसला असून रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसायिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या असून पत्राद्वारेही लक्ष वेधले आहे. तरीही समस्या सुटत नसल्याने आता व्यावसायिक व कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, पाळधी सबस्टेशनचा कारभार पूर्णपणे भोंगळ असून महावितरणकडून गंभीर दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, एक्सप्रेस फिडरवरून…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१० एप्रिल २०२६ मेष राशी तुम्हाला काही कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज ऑफिसमधील तुमच्या आत्मविश्वासाने तुमचे बॉस खूप खूश होतील. आज महिला घरकामात व्यस्त राहतील आणि संपूर्ण कुटुंबाला आवडतील असे नवीन पदार्थ बनवतील. तुम्ही एका नवीन प्रकल्पाकडे आकर्षित व्हाल, तो सुरू कराल आणि नफा मिळवाल. पूर्वीच्या कामांमधून आज चांगले परिणाम मिळतील. आज तुम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी मित्राकडून मदत मिळेल. वृषभ राशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. आज समाजातील लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. या राशीच्या अविवाहित महिलांना आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. तुमचे कुटुंबातील सदस्यांशी…

Read More

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर तसेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलवल्यामुळे नैराश्यातून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ असे स्टेटस ठेवले होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हा तरुण असून त्याचे नाव महेश उद्धव भणगे असे आहे. त्याने राहत्या घरीच विष प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने महेश काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेशने पाणी…

Read More

धरणगांव : प्रतिनिधी  शहरातील एका नामांकि शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या एका उपशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेच्या वेळेबाहेर नियमबाह्य स्वरूपाची कामे केल्याचे उघड झाल्यानंतर संस्थेने तातडीने हा कठोर निर्णय घेतला. सदर शिक्षकाच्या कृती संस्थेच्या नियमांशी विसंगत असल्याचे समोर आले असून, त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन होण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर बाबीची दखल घेत संस्थेच्या प्रशासनाने विलंब न करता कारवाई केली. संस्थेच्या चेअरमन व सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, संस्थेची किंवा समाजाची बदनामी होईल असे कोणतेही कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीस, तिचा प्रभाव किंवा पद काहीही असो,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवडाभराच्या शांततेनंतर पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दीड लाखांच्या पुढे गेला, तर चांदीनेही प्रतिकिलो अडीच लाखांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या दरवाढीस चालना मिळाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विशेषतः अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात चढ-उतार दिसून आले. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला. दरम्यान, सकाळी वाढलेले दर सायंकाळपर्यंत किंचित घसरले असले, तरी एकूणच भाव उच्च पातळीवरच कायम आहेत. त्यामुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना ऐनवेळी आपले आर्थिक नियोजन बदलावे लागत आहे. येथील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी आठवड्याच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शिवकॉलनी परिसरात विश्वासाला तडा देणारी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या महिलेनेच घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका संदीप पाटील (वय ३९, रा. शिवकॉलनी) यांनी त्यांच्या मावशीचे चुलत जावई हर्षल संजय वाघ यांच्यावर नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २०२२ मध्ये १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. नोकरी न लावल्याने त्यांनी वारंवार पैसे परत मागितले, मात्र त्यांना टाळाटाळीची उत्तरे मिळत होती. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे…

Read More