Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोने गावात चांदीचे दागिने पॉलीश करून देण्याचे बहाण्याने एका महिलेची फसवणूक करून पोबारा झालेले परराज्यातील तिघं भामटे शेवगेपिंप्री येथे दिनेश रमेश राठोड या तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत. एका दुचाकीवर तिघं अनोळखी व्यक्ती ९ एप्रिलला सकाळच्या सुमारास जुनोने येथील कविता ताराचंद राठोड यांच्या घराजवळ आले. आम्ही सोनार असून तुमच्या चांदीचे बाजूबंद (एल्या) पॉलीश करून देतो, तुम्ही आमच्या बहिणी सारख्या आहेत, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी दोघं हातातील चारशे ग्रॅम वजनाचे चांदीचे बाजूबंद काढून त्यांच्याकडे दिले. त्यांनी ते बकेटमध्ये टाकून त्यात काही केमिकल टाकले आणि स्वच्छ करून महिलेच्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील मारवड येथील रहिवासी गौरव सुरेश पाटील (वय ३०) या तरुणाने ९ रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी घराच्या छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  गौरव पाटील यांचे वडील सुरेश पाटील हे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना गौरवने घरातील मागच्या खोलीत गळफास घेतला. हे समजताच शेजाऱ्यांच्या मदतीने त्यास खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांस मृत घोषित केले. या प्रकरणी विजय भदाणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. शरीफ पठाण करत आहेत. दरम्यान, मयत गौरवचे वडील सुरेश पाटील हे मूळचे चिंचोली येथील…

Read More

धरणगांव : प्रतिनिधी  पथराड रस्त्यावर झालेल्या अपघात अज्ञात वाहनाने एका दुचाकी स्वारास धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड साळवा येथे असलेल्या भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आटोपून सतीश काशिनाथ जोशी (वय ७५) हे जळगाव येथील आपल्या मुलीकडे दुचाकी (एमएच-१९, एव्हि – ४०४५) ने जात होते. पथराड रस्त्यावर असलेल्या पाटाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांचा दुचाकीला धडक दिल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे हे त्यांचा सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या वेळी त्यांच्या खिशात असलेल्या पाकिटात १५ हजार रुपये होते, ते…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील आडगाव या गावातील एका तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी गावात जावून पडताळणी केली असता तरूणाकडे चोरीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. तेव्हा दोघं दुचाकी जप्त करीत तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याने धरणगाव येथुन दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आल्याने त्यास धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  आडगाव ता. यावल येथील रहिवासी रुपेश अशोक मराठे (वय २८) या तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. तेव्हा या माहितीची पडताळणी करण्याच्या करीता त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार संदिप सुर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी संशयावरून पतीने पत्नीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्यावर भररस्त्यात चाकूने तब्बल १३ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी शहरातील बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्यानजीक घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दीपक बुधा लोंढे (४०, रा. संजय नगर, धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची पत्नी सोनल लोंढे (३३) ही धुणीभांडी करते. कामे आटोपून ती बुधवारी दुपारी घराकडे परतत होती. बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्याजवळ दीपक याने सोनल हिला गाठले. काही समजण्याच्या आत त्याने तिच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकाराने ती गोंधळली. त्याच वेळी पतीने तिचे हात, पाय, पोट आणि…

Read More

आजचे राशिभविष्य दि.११ एप्रिल २०२६ मेष राशी आज, तुमच्या जुन्या कंपनीतील अनुभव कामाच्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरेल. तुमचा अध्यात्माकडे असलेला कल वाढेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊ शकतात. घरी पाहुणे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. आज स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्या; तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या करिअरमध्ये उत्तम परिणाम देईल. वृषभ राशी तुम्हाला एका खास व्यक्तीकडून एक भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. विद्यार्थ्यांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या परिसरातील काही लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. मिथुन राशी तुम्हाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्यासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. त्यांनी जिल्ह्यातील खत पुरवठ्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती सादर केली. यावेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच खतांची अनावश्यक साठवणूक न करण्याचे आवाहन केले. जमिनीची आरोग्यपत्रिका आणि पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी…

Read More

अकोला : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील यावलखेड येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे. यावलखेड येथील गजानन नगर परिसरात राहणाऱ्या वृषाली अनिल निंबोकार (वय 32) यांचा पती अनिल निंबोकार (वय 42) याने चाकूने सपासप वार करत खून केला. वृषाली या गायत्री ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत काम करत होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. गुरुवारी सकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या दरम्यान अनिल निंबोकार मोठ्या मुलाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल झाली आहे. सदर रेकद्वारे जिल्ह्यासाठी एकूण २६५० मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले असून हा पुरवठा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक व वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विक्रेत्यांनी खतांची विक्री रिअल-टाईम सेल प्रणालीद्वारे तसेच आधार संलग्न e-POS…

Read More

बारामती : वृत्तसंस्था बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, करुणा मुंडे शर्मा यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्यात आले, तर महायुतीची सत्ता कोसळेल आणि तो पक्ष पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या की, वंजारी समाजाने धनंजय मुंडेंना नाकारले असून, त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. “हा एका स्त्रीचा शब्द आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी तीव्र भूमिका मांडली. तसेच, “धनंजय मुंडेंनी स्वतःच्या पत्नीला तुरुंगात टाकले आणि अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले. अशा हजारो लोकांची यादी माझ्याकडे आहे,”…

Read More