रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम निमड्या परिसरातील नवीन नवाड पाड्यावर आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लालूबाई शरद पावरा (वय अंदाजे २५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या ४ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह डोंगरदरीत एका झाडाला साडीने अडकवलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, तेथे डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील शासकीय…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.७ एप्रिल २०२६ मेष राशी तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल. रोखून ठेवलेले पैसे आज परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल. एका अनुभवी व्यक्तीला भेटल्याने तुमच्या अनेक समस्या सुटण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्याकडे विशेष लक्ष देईल आणि तुमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकेल. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता आहे. खूप पूर्वी घेतलेल्या कर्जाचा हप्ता आज भरला जाईल, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. वृषभ राशी तुम्ही घेतलेल्या आर्थिक निर्णयांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, त्यांना काही नवीन यश मिळेल. आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन जळगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा महानगरच्या वतीने जी.एम. फाउंडेशन आणि बळीराम पेठ येथील जुने भाजप कार्यालय येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत कार्यकर्ते तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला देशभक्तीचा सुर लाभला. या निमित्ताने भाजप महानगरच्या वतीने पक्षाच्या ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, भगवा गमछा आणि तांब्याचा दिवा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानितांमध्ये गजानन…
बारामती : वृत्तसंस्था बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक टळू शकली नाही. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्टरीत्या केले,” असे…
नांदेड : वृत्तसंस्था शहरात गुन्हेगारीने कळस गाठल्याचे चित्र समोर येत असून, सोमवारी पहाटे सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेच्या शहराध्यक्षाची भररस्त्यात तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, अवघ्या तीन दिवसांत पाच हत्यांच्या घटनांनी पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोनू कल्याणकर (वय ३५) असे मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. यावेळी श्रीनगर परिसरातील पंचशील कापड दुकानाजवळील कुमार ड्रेसेससमोर अचानक चारचाकी वाहनातून आलेल्या ६ ते ७ हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींचा वापर करत कल्याणकर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या तब्बल ५९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत नवा इतिहास रचला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसून शपथ घेतली, मात्र त्यांच्या या कृतीने पुन्हा एकदा त्यांच्या जिद्दीचा प्रत्यय देशाला आला. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे दुर्मिळ आणि ऐतिहासिक चित्र निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही एक वेगळे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील राज्यसभेची शपथ घेतली. तसेच महाराष्ट्रातून माया ईवाते, रामराव वाडकुटे…
जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीवरील सात साखळी बंधाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाने मान्यता देऊनही पुढील कार्यवाही न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील ६० ते ७० गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देत तातडीने प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, गिरणा धरणाखालील गिरणा नदीच्या सुमारे १६८ किलोमीटरच्या पट्ट्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी गिरणा धरणातील आवर्तनावर अवलंबून राहावे लागते. या भागात पाण्याची टंचाई तीव्र असून शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गिरणा नदीवर विविध ठिकाणी सात साखळी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पत्रात असा दावा आहे की, चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील एका महिला पदाधिकारीने अशोक खरातकडे महिलांना घेऊन जात होत्या. या पत्राच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या हेमा पिंपळे यांनी चाकणकर यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासण्याची मागणी केली असून पोलीस अधीक्षकांनी प्रकरण एसआयटीकडे सोपवावे, तसेच पत्रावरील स्वाक्षरीची तांत्रिक तपासणी करून संबंधित व्यक्तीचा…
अमळनेर : प्रतिनिधी लग्नासाठी पैसे घेतलेल्या पत्नीने आठच दिवसात पळ काढून पतीला तिघांनी फसवल्याचा गुन्हा दि.२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रमेश शिरसाठ वय ३१ रा सानेनगर हल्ली नोकरी आडाजंग पाटीया सुरत याने विवाहासाठी चुंचाळे ता. चोपडा येथील आपल्या बहिणीच्या सासरे भिकन महादू पाटील यांच्या मध्यस्थीने दुर्गा गजानन थाटोड रा. गायेगाव ता अकोला हिच्याशी निश्चित झाला. त्यांनी अडीच लाख रुपये दुर्गा व तिची मावशी नंदा आणि त्यांच्यासोबत एक मध्यस्थी पुरुष यांना विवाहनिमित दिले. ठरल्याप्रमाणे दि.१० डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी कुलदेवता बीजासनी माता मंदिरमध्यप्रदेश येथे सध्या पद्धतीने विवाह लावला. दि.२२ डिसेंबर रोजी त्याची पत्नी सकाळी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीसह संशयित आरोपी अमोल किसनराव निंदाणे (वय २८) याला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले आणि पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवत मुलीचा ठावठिकाणा लावला व तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या जबाबानुसार आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानुसार संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला ६…

