जळगाव : प्रतिनिधी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अप्पर आयुक्त करिष्मा नायर या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. मिनल करणवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून काम करताना विविध विकासकामांना गती दिली होती. मार्च २०२५ मध्ये त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेतून बदली होऊन जळगाव येथे पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि शिक्षण क्षेत्रात काही…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील रहमतपुरा भागातील साजिद खान सुलतान खान पठाण (वय २४) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना ७ एप्रिलला पहाटे घडली. या हल्ल्यात साजिद खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खान हा पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगावहून नशिराबादकडे येत असताना हॉटेल सावन समोर अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित राम संतोष मोरे (वय २४, रा. सत्यम पार्क, जळगाव) तसेच एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेला पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ६…
जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील ग्रामीण व शहरी भागासाठी १२० तसेच जळगाव शहरासाठी १७ अशा एकूण १३७ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील “यशदा” कार्यशाळेतून येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसबाबत ‘डाऊनफॉल’ सुरू असल्याचे विधान करणाऱ्या पार्थ पवार यांना सौम्य शब्दांत सुनावले आहे. “कोणताही राजकीय पक्ष असा संपत नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने काम करत असतो,” असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका करत राज्यात त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना संयमाचा सल्ला दिला होता. आता रोहित पवारांनीही हे विधान घाईगडबडीत झाल्याचे सांगत त्यावर नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की,…
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या विनंतीनुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार संपूर्ण जळगाव जिल्हयातील सर्व किरकोळ मदयविक्री अनुज्ञप्त्या (सीएल-३ (देशी किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती, एफएल-२/ सीएल/एफएल/टिओडी-३ (विदेशी व देशी किरकोळ विक्री), एफएल-३ (परमिटरुम), एफएल/बिआर-२ (बियरशॉपी) तसेच टि.डी. १ (ताडी दुकाने) या सर्व अनुज्ञप्तीधारकांनी १४ एप्रिल २०२४…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. डिजिटल गव्हर्नन्स, ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यात स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. विकसित भारत २०४७ अंतर्गत विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याअंतर्गत विद्यमान माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर ‘इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय’मध्ये करण्यात येणार असून, राज्यभरासाठी स्वतंत्र IT संवर्ग (IT Cadre) निर्माण केला जाणार आहे. यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती जळगाव येथे विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे साहेब, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच ॲडिशनल गटविकास अधिकारी योगिता पाटील मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्वप्रथम घरकुल योजनेचा सविस्तर…
मुंबई : वृत्तसंस्था कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांच्या टीकेला उत्तर देताना “कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच “ते अजून राजकारणात लहान आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही पटोले यांनी निशाणा साधला. “संजय राऊत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातच मान्यता नाही. आम्ही त्यांना मान्यता द्यावी, अशी अपेक्षा असेल तर त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही,” असे ते म्हणाले. भाजपवर हल्लाबोल करताना पटोले यांनी गंभीर आरोप केले. “धर्म…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी वाहनांचा संयुक्त पोलिस पथकाने पर्दाफाश करत सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक इराणी मोहल्ला, रजा टॉवर परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी तिन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या. यानंतर या वाहनांची चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे…
जळगाव : प्रतिनिधी समोरून येणाऱ्या कारला ट्रॅक्टरने धडक दिल्यानंतर आपसात चर्चा सुरू असतानाच अचानक विशाल राजेंद्र बावस्कर (३०, रा. आसोदा, ता. जळगाव) या ट्रॅक्टरचालकाने स्वतःला ट्रकसमोर झोकून दिले. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. ५ रोजी रात्री बायपासवर घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मध्यप्रदेशातील लिंगा, ता. नेपानगर येथील रहिवासी असलेले विशाल बावस्कर हे सध्या आसोदा येथे राहून ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करायचे. रात्री घरी त्यांचा काही वाद झाला व त्यानंतर ते ट्रॅक्टर घेऊन निघाले. पाळधी ते तरसोद बायपासवरून विरुद्ध दिशेने (राँग साईड) जात असताना समोरून येणाऱ्या कार व ट्रॅक्टरची धडक झाली.…

