Author: editor desk

मेष राशी प्रत्येक काम हुशारीने करा. सामाजिक कार्यात अधिक सहभाग घेतल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुम्ही लांबच्या प्रवासाला किंवा परदेशी सहलीलाही जाऊ शकता. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने व्यवसायाचा विस्तार होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील. तुमची समस्या जास्त वाढू देऊ नका. ती लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लाभदायक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या गरजा जास्त वाढू देऊ नका. समाजात आपल्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवा. गुप्त शत्रू तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. सहकाऱ्यांशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आहे. मन लावून विद्यार्थ्यांना शिकवा, हे तुमच्याही भविष्याला आकार देणारे प्रशिक्षण असेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जळगाव तालुक्यात 96 मराठी शाळेत व 11 उर्दू शाळेत असे एकूण 107 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, विस्तार अधिकारी शेख खलील, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, विजय पवार, वंदना मोरे, प्राजक्ता टोके, गणेश काळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक व पालक मोठ्या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर होणे बाकी असतांना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तर अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे डबल इंजिनचे सरकारच जनता निवडून देणार आहे. महाविकास आघाडीत किमान 11 मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. नाना पटोले मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे. मात्र त्यांनी आधी ओबीसी आरक्षण प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी. पटोले यांच्यासह काँग्रेसकडे आठजण इच्छुक आहेत. शिवसेना नेते उद्धव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने 3 बालक ठार झाले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र लाडक्या बाप्पांना निरोप देत असतांना अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या आहे. नाशिक येथील गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा इंदिरानगर येथील वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी साडेसहा वाजता पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता परिसरात घडली. ओंकार चंद्रकांत गाडे (वय २३) व स्वयम मोरे (वय १८) अशी या युवकांची नावे आहेत. हे दोघेही पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा कॉलनीमधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडले. ते दिसानासे झाल्याने मित्रांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला. मात्र ते अपयशी…

Read More

लातूर  : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असतांना नुकतेच लातूर येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताजवळील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) शिवाजीनगर तांडा (ता. जळकोट) येथे घडली. तिरुपती बाबुराव पवार (वय ४२) आणि नामदेव तिरुपती पवार (वय १२) रा. माळहिप्परगा असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घटना घडल्याने माळहिप्परगा व पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट येथील शिवाजीनगर तांडा (माळहिप्परगा) येथील २२० केव्ही उपकेंद्राजवळ तिरुपती पवार यांची शेती आहे. मंगळवारी तिरूपती मुलगा नामदेव याला घेऊन शिवाजीनगर तांडा येथील पाझर तलाव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात बाप्पांना मनोभावे निरोप देत असतांना भिवंडीच्या वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबविली आहे. दरम्यान कामवारी नदीकडे मिरवणूक जात असताना रात्री 1 वाजता मुर्तीवर अचानक दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिस्थिती चिघळली असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तर दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खबरदारी म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री 2.30 वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. यानंतर भाजप आमदार महेश चौघुले यांनी गणपती मंडळाला भेट…

Read More

मेष राशी आजच्या दिवशी देवाणघेवाण करताना सावध राहा. तुम्ही तुमच्या कामासाठी अत्यंत मेहनत कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत खटपट झाल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. जीवनसाथीला एखाद्या प्रकरणातून मोठा दिलासा मिळेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. वाढत्या खर्चावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांचं सहकार्य आणि भरपूर साथ मिळेल. वृषभ राशी तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत सामान्य राहणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. अविवाहितांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचं आगमन होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाबाबत काही अडचणी असतील तर आज बॉसशी बोलून घ्या. आज तुमचं मन कामात लागणार नाही. त्यामुळे तुमची असंख्य कामे पेंडिंग राहतील. तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना आज या क्षेत्रात काही लाभ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या १० दिवस मोठ्या उत्साहात पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. यासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीचे विसर्जन 8:50 वाजता झाले. विसर्जन मिरवणुकीत घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला…

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात आज सर्वात लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप देत असतांना भावूक होवून अनेक गणेशभक्त निरोप देत आहे. तर नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बाप्पाला साकडे घालत निरोप दिला आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर त्यांच्या सागर या बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हैदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने देखील विविध ठिकाणी मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या सागर या बंगल्यावरील विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.…

Read More