एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कासोदा येथे ६ रोजी गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात ८ जण जबर भाजले गेले होते. त्या ८ जणांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले होते. यातील सागर किसन मराठे (वय ३२) या तरुणाचा शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककला पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील अनिल पुणा मराठे (मानकीवाले) यांच्या घरात गॅस गळती झाल्यानंतर भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ८ जण गंभीर भाजले गेले होते. या सर्वांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यात सागर मराठे हा मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालावली. मृत सागर मराठे यांच्या पश्चात आजी, आई, वडील, पत्नी व दीड महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी १० वाजता कासोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात शोककला पसरली आहे. दरम्यान या स्फोटातील इतर जखमींवर रुग्णालयात सुरु आहे.