Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी सोने मोडून आलेले ४० हजार रुपये व नातेवाइकांकडून घेतलेली रक्कम असे एकूण ८३ हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले असताना चोरट्यांनी ते लांबविले. ही घटना रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री भाऊंच्या उद्यानासमोर घडली. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापड व्यावसायिक इंद्रकुमार प्रेमचंद साहित्या (५३, रा. सिंधी कॉलनी) यांनी काही सोने मोड दिली व त्यातून ४० हजार रुपये आले होते, तसेच काही नातेवाइकांनी त्यांच्या पत्नीकडे रक्कम दिलेले होती. असे एकूण ८३ हजार त्यांच्या पत्नीने पर्समध्ये ठेवले व ही पर्स दुचाकीच्या डिक्कीत ठेवून साहित्य व त्यांची पत्नी भाऊंच्या उद्यानात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथून महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून पसार झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या सोनसाखळी चोरीसह अन्य चोऱ्यांचीही त्याने कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने प्रशांतला सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या तपासादरम्यान सोनसाखळी…

Read More

मेष राशी कोर्ट केसमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. स्पर्धेत तुम्हाला उच्च यश आणि सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत विरोधक सहाय्यक होतील. उदरनिर्वाहाचा शोध पूर्ण होईल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसच्या निकटतेचा लाभ मिळेल. वृषभ राशी कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत गाजावाज करू नका. काम बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी काही दबाव वाढू शकतो. नोकरीत बदलाची आवड वाढेल. व्यवसाय क्षेत्राशी निगडित व्यक्तीने आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करावा. मिथुन राशी व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक कामासाठी तुम्हाला बाहेर जावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या धोरणानुसार काम करावे. कोणाचे म्हणणे ऐकू नका. व्यवसायात…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील वर्धा येथे आले असतांना त्यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत मोदींनी संबोधित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. पंतप्रधान म्हणाले की, जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही. आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली. पंतप्रधान…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी तालुक्यातील जळके येथील एरंडोल नेरी रस्त्यावर जळके गावाजवळ पुरुषोत्तम पाटील यांच्या शेतात असलेल्या गजानन महाराज मंदिरात रात्री १:२४सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी मंदिरांतील दानपेटी व दोन पितळी घंटे चोरुन नेल्याचा प्रकार घडला .हि सकाळी नियमित पुजेसाठी गेल्यावर लक्षात आला.सदर घटना येथील सि.सि.टिव्हीमध्ये कैद झाली आहे . घटनेची माहिती म्हसावद पोलिस स्टेशनला कळविण्यात आली आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सह उद्धव ठाकरेंकडून कायम गुलाबराव पाटलांना निशाणा करण्यात आला एवढेच नाही तर गद्दारी केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या सह आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा घेवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्तांतरानंतर गुलाबराव पाटलांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे दुरावले होते. तर संजय राऊत यांनी थेट गद्दारांना गडायचा आव्हान दिल्याने गुलाबराव पाटलांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट…

Read More

बीड : वृत्तसंस्था शहापूर येथील राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना सकाळी ८ च्या दरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जाहीच सहाजण ठार झाले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींची संख्या व मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर बस व आयशरचा भीषण अपघात झाला. बस एम एच 20 बि एल 3553 अंबाजोगाई येथुन संभाजी नगरच्या दिशेने जात होती. तर, आयशर क्रमांक एमएच 01 सी आर 8099 अंबड कडून बीडकडे संत्रा घेऊन जात होता. दरम्यान शहापूर ते मठ तांडा या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे – सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी दि.17 सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून महामार्गलगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांनी त्यांचा जळगावकरांतर्फे सन्मान केला. अध्यात्मिक क्षेत्रात डॉ. इंद्रदेव महाराज यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाविकांना आयुष्यात दिशा मिळते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले. जिल्ह्यातील श्री श्री १००८ महंत महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय संत स्वामी डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली आहे. ह्युमिनिटी ऑफ स्पिरीच्युअल एज्युकेशन या विषयात हि पदवी दिल्ली येथे येथे प्रदान करण्यात आली. या अनुषंगाने आज राधा राणी सेवा समिती ट्रस्टतर्फेदेखील आज त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. आ. राजूमामा भोळे यांच्या…

Read More

नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी दोन गटात हाणामारी होत दंगलीच्या घटना काही ठिकाणी घडल्या असतांना नुकतेच इंदूरीकर महाराजांनी नगर जिल्ह्याच्या अकोले येथे एका कीर्तनात तरुणांना सल्ला दिला आहे. इंदूरीकर महाराज म्हणाले कि, तुम्ही गरीब राहा, वेळ पडली तर घरोघरी फिरून कुल्फी विका, आणखी काही व्यावसाय धंदा करा, पण दंगलींच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला त्यांनी नगर जिल्ह्याच्या अकोले येथे त्यांच्या किर्तनात दिला आहे. तसेच धर्माच्या नावाखाली गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, धर्मांचं भांडवल करु नका, असे सांगत राजकारण्यांचेही कान टोचले आहेत. इंदूरीकर महाराज म्हणाले, माझ्याएवढी किर्तने महाराष्ट्रात कोणी केली नसतील. महिन्यात ८० तरी किर्तने होतात. यातून आलेल्या अनुभवावरून सांगतो,…

Read More