Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातील पत्ता देऊन महागडे परफ्यूम मागविले, मात्र नंतर बँकेकडे तक्रार करीत पेमेंट रोखून जळगावातील ऑनलाइन व्यवसाय चालकाची ग्राहकाने १ लाख २१ हजार २८२ रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार २९ मार्च ते ६ एप्रिल या दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगरातील रहिवासी विशाल विनोद जवाहराणी (२६) यांचे परफ्यूम्स बाय जनता शॉपी या नावाचा ऑनलाईन व्यवसाय आहे. वेबसाईटवरून ते ऑनलाईन परफ्यूमचा व्यवसाय करतात. २९ मार्च रोजी रवी कुमार नामक व्यक्तीने मेलवरून ११ हजार १४८ रुपये किमतीचे तीन महागडे परफ्यूम ऑर्डर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मिरवणूक मार्गावर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलावरून टॉवर चौकात येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच मार्गावरील सात चौकांमध्ये मिरवणुकीदरम्यान बॅरिकेड्स करण्यात येऊन उपरस्ते बंद करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या वतीने आवश्यक त्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये मिरवणूक दरम्यान वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात १४ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून गोविंदा रिक्षा थांबा, चित्रा चौक, खैरनार ऑप्टीकलनजीक, घाणेकर चौक, साने गुरुजी चौक, १७ मजली इमारतीच्या बाजूला गोलाणी मार्केटकडून येणारा रस्ता, टॉवर चौकात चित्रा चौकाकडे जाणारा रस्ता…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान’ राबविण्यात आले. त्यात ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यात चार लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विशेष अभियानांतर्गत विभागातील भुसावळ, जळगाव, नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ६० तिकीट तपासणी कर्मचारी आणि ९ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. एकूण ६०१ प्रकरणांमध्ये विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून ४,३०,३३० इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय रेल्वे कायद्याच्या कलम १४५ (बी) व १६७ अंतर्गत…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१२ एप्रिल २०२६ मेष राशी तुम्ही ऑफीसमध्ये अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. आज गाण्याच्या आवडत्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते. अशक्य वाटणाऱ्या काही कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काही नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वडीलधाऱ्यांची मदतही मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. वृषभ राशी आज तुम्हाला मुलांकडून एक खुशखबक मिळेल, ज्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदी होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही निरोगी राहाल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. एखाद्या सर्जनशील कामात तुमचे नाव चर्चेत राहील. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. मोठी खुशखबर मिळेल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या औचित्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रोबेशनरी ऑफिसर वृषाली चौरे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अधिकारी पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडत महिलांना आत्मविश्वासाचा संदेश दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगावचे धीरज श्रीनिवास पाटील यांनी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची सविस्तर माहिती देत कर्ज प्रक्रियेतील सुलभता स्पष्ट केली. ‘बँक सखी’ रंजना…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल १८२७) आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुप वाघ नगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांना आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात चामुंडा माता रुग्णालय, जळगाव येथील अनुभवी डॉक्टरांच्या टीमने सेवा प्रदान केली. डॉ. जयेश वाल्हे, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली आणि आवश्यक होमिओपॅथी औषधे मोफत वाटप केली. शिबिरात मोठ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  क्रांतीज्योती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आधुनिक भारतातील स्त्री-शिक्षण,सामाजिक समता, व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे थोर समाज सुधारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीज्योती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्ता प्रतिभा ताई शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. आज ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारावर चालण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहरातील फुले मार्केट येथील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बीड येथील एका व्यक्तीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवार यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “राजकारणात अशा प्रकारचे धोके संभवतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी स्वतःची काळजी घेत सावध राहणे आवश्यक आहे.” बीडमधील व्यक्तीने भोंदू अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सुनेत्रा पवार यांना राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबतचे सत्य तपासातून समोर येईल, असेही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. ७ एप्रिल २०२६ पासून पूर्वीची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पोर्टल माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या वतीने संलग्नित रुग्णालयांसाठी नवीन पोर्टल प्रणालीसंदर्भात प्रशिक्षण/मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ चौधरी (अध्यक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव) यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. रितेश पाटील (राज्य समन्वयक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी नवीन पोर्टलच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली असून, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे प्राथमिक केंद्र औंढा नागनाथ परिसरात असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, पुढील तपासात वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही सेकंद जमिनीला हादरे बसल्याची जाणीव नागरिकांना झाली. या भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांनी तात्काळ माहिती संकलित केली. भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी अनेक ठिकाणी त्याचे धक्के स्पष्टपणे…

Read More