Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात महिलेचे तोंड दाबून अत्याचार !
    क्राईम

    जळगावात महिलेचे तोंड दाबून अत्याचार !

    editor deskBy editor deskOctober 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याप्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी वय-४० रा. हरीविठ्ठल नगर जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगर परिसरातील एका भागात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास कोळी हा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरातून जात असताना “तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली. दरम्यान या संदर्भात पीडित महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.