अमळनेर : प्रतिनिधी शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या दोन्ही बंधूंनी मिळून दहा वर्षात सुतगिरणी तर उभारलीच नाही पण त्यासाठी आलेले १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यांनी हा नुसता घोटाळा केला नसून महाघोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावानांशी खेळ केला आहे, त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही, यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात याचे…
Author: editor desk
मेष राशी तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमताद्वारे परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही प्रकाराची मालमत्ता संबंधित समस्या असेल, तर आज त्यावर लक्ष द्या. बाहेरील लोकांची आणि मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. कामात अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यापासून दूर राहा. घरात पती-पत्नीमध्ये काही वैयक्तिक मुद्द्यांवर वाद होऊ शकतो. वृषभ राशी बहुतांश वेळ घराची सजावट आणि देखभालीसंबंधी कार्ये आणि खरेदीत जाईल. तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे तुम्हाला जीवनाला आवश्यक असलेली ऊर्जा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार एखाद्या प्रकल्पात यश न मिळाल्यास ते निराश होऊ…
भादली/जळगाव दि. 10 – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडगाव, जळगाव खुर्द, खिर्डी, निमगाव, बेळी, मन्यारखेडा, तरसोद आणि भादली या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन योजना राबवून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा मिळत असून शेळगाव पूल, कडगाव पूल, तरसोद गणपती मंदिराला पर्यटन दर्जा देऊन कोटींचा निधी, हायवे (मकरा पार्क) ते तरसोद रस्त्याला दर्जा देऊन तीन कोटींचा निधी मंजूर केला. मन्यारखेडा ते हायवेपर्यंत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विविध मुलभूत सुविधा आणि सिंचनाच्या बंधाऱ्यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्याने जनतेचा भक्कम साथ व पाठिंबा मिळत असल्याचे…
जळगाव : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा ममुराबाद-विदगाव भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा थाट होता. नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केले. काही ठिकाणी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. गुलाबराव देवकर यांनी ममुराबादसह विदगाव, धामणगाव, आवार, तुरखेडा, धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, डिकसाई, रिधूर, घार्डी, आमोदा, करंज, नंदगाव, नांद्रा बुद्रुक आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. संधी मिळाल्यानंतर समस्या सोडविण्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली. दरम्यान, ममुराबाद येथील नागरिकांनी माजी मंत्री देवकर यांना गावातून जमा करण्यात आलेली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी खोटे नगर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत जळगाव शहरातील नागरिक आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये जयश्री महाजन यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवण्यात आला. दुपारी खोटे नगर परिसरातून निघालेल्या या रॅलीत विविध वयोगटातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी जयश्री महाजन यांना साथ दिली. रॅलीत जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ घोषणांचा जयघोष करण्यात आला. विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयश्री महाजन…
मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध प्रभागात जन आशिर्वाद रॅली काढून मतदारांशी संवाद साधत मतदारांचे आशिर्वाद घेतले आणि आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरिल बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी रोहिणी खडसे यांच्या जन आशीर्वाद रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभागा प्रभागात महिला भगिनींनी रोहिणी खडसे यांचे औक्षण केले तर ज्येष्ठांनी विजयी भव चे आशीर्वाद दिले युवकांनी परिवर्तनाच्या लढाईत आम्ही सोबत असल्याचे रोहिणी खडसे यांना अश्वस्त केले यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या…
रावेर (प्रतिनिधी) : रावेर – यावल विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी जल्लोषात सुरु झाली असून, प्रचार फेऱ्यांनीही वेग घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी आज (दि.१०) तामसवाडी, बोरखेडा प्र. रावेर, शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा बु., सावखेडा खु., कळमोदा या भागात प्रचार फेरी काढत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून मुंजलवाडी, ते कुसुंबा रस्ता, मुंजलवाडी ते उतखेडा फाटा रस्ता, सावखेडा लोहारा रस्ता डांबरीकरण, बसस्टँड, सावखेडा बु. खु. कळमोदा फैजपूर रोडवर पूल बांधकाम करणे, गावाला जोडणाऱ्या पुलाला पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे , जलजीवन…
जळगाव | प्रतिनिधी मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदार म्हणून सुरेश भोळे हेच हवे असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठा महासंघाने आमदार भोळे यांना पाठिंबा दिला आहे याबाबतचे पत्र त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयात आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्याकडे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सुपूर्त करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख बी.बी. भोसले, उपाध्यक्ष विश्वास पाटील, ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष उन्मेश पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील भडगाव तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील चाळीसगाव तालुक्याचे अध्यक्ष रमेश पाटील यांसह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय जनता…
जळगाव । प्रतिनिधी मतदानाचा टक्का वाढावा व लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्री समस्त जळगाव बारी पंच व श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्यातर्फे मतदान अभियानाचा कार्यक्रम घेण्यात् आला. या मतदार मेळावा प्रसंगी आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्षाला उज्जवलाताई बेंडाळे यांसह श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी व श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी तसेच ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल भाऊ बारी, नगरसेविका शोभाताई बारी व समाजसेविका मंगलाताई बारी, अवधूत कोल्हे, भास्कर बारी, महेंद्र बारी, हर्षल बारी, मुकुंद बारी, विजय पुना बारी, राहुल…
रावेर (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, गावागावात उमेदवार ग्रामस्थांशी संपर्क करत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि.९) रावेर तालुक्यातील गुलाबवाडी- मोहरव्हाल-ताड जिन्सी – विश्राम जिन्सी -आभोंडा बु-आभोंडा खु येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जिन्सी ते रसलपूर १४ किलोमीटर डांबरीकरण रस्ता, जिन्सी सांबरपाट रस्ता पूल तसेच गावाअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी अनेक मुलभूत सुविधांची कामे झालेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या चौधरी परिवाराने जाती-पातीविरहित सर्वसमावेशक राजकारण करत लोकसेवक…

