Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून चुरस बघायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार नागरिकांसमोर आपण केलल्या विकास कामांचा आढावा देत आहे, तसेच भविष्यकालीन योजना आणि आश्वासनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील महाजन या त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि संयमी राजकारणामुळे तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वसमावेशक मुद्द्यांमुळे सर्वांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत. जयश्री महाजन यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला गती मिळाली होती. त्यांनी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच जळगावच्या महापालिकेची कर्जातून केलेली सुटका व त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात झालेली वाढ आजही नागरिकांच्या…

Read More

मेष राशी आज कामाच्या ठिकाणी संघर्ष होऊ शकतो. तुम्हाला काही अप्रिय बातम्या मिळू शकतात. व्यावसायिकांची स्थिती सुधारेल. नवीन योजना इत्यादींमधून चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शौर्याने आणि बुद्धीने प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवत आहात. आपले वर्तन सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा. काही आर्थिक योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामासाठी जास्त धावपळ करावी लागेल वृषभ राशी आज अचानक दीर्घ विदेश दौरा होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाद वाढू शकतात. धार्मिक कार्यात भक्ती कमी होईल. व्यवसायात चढ-उतार होतील. नोकरदार लोकांच्या अडचणी वाढू शकतात. आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. फायदा होईल. व्यवसायात प्रगती होईल. मिथुन राशी कुटुंबात काही शुभ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महामार्गाला लागून असलेल्या खेडीतील आंबेडकरनगर व भोईवाडा या भागात बंद असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजता घडली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांद्वारे आग विझविण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. यात संसार मात्र खाक झाला आहे. घरात दिवा सुरू असल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या घटनेत दोन सिलिंडरचा स्फोट झाला आहे. प्रीती निवृत्ती गाढे यांचे भोईवाड्यात पार्टेशनचे घर असून, तेथे त्या दोन मुलांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी त्या मुलांना घेऊन रथोत्सवात गेल्या होत्या. त्याच वेळी सायंकाळी त्यांच्या घरात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन जण गंभीर झाल्याची ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वप्नील रमण पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्वप्नील पाटील यांचे वडील रमण सीताराम पाटील (वय ६४) हे आपली दुचाकी (एमएच १९, सीए- ०९५७) ने शेळावे खुर्द येथून पारोळ्याकडे येत होते. या वेळी धरणगाव रोडवरील धाबे फाट्याजवळ समोरुन येणारी दुचाकी (एमएच १९, इएच- ७२४२) वरील दुचाकी चालक दीपक ईश्वर बिऱ्हाडे (वय २४, रा. शेळावे खुर्द) याने रमण पाटील यांना जबर धडका दिली. या अपघातात रमण पाटील वा शेळावे…

Read More

शिरसोली/जळगाव दि. 12 – दोन्ही शिरसोली रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरात मोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली येथे मेडीयाशी संवाद साधताना बोलत होते.*सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीत भगवत तुफान पसरले होते शिरसोली प्रभो शिरसोली या दोन गावांना जोडणारा पूल नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र पाणीपुरवठ्याच्या योजना सबस्टेशन शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर विविध सामाजिक सभागृह ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा तसेच शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरीहिताचे काम…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना व्यापारी,भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी, ‘तुमच्या पाठीशी असून पुन्हा एकदा आपणच निवडून याल’ अशी विजयाची खात्री आ. राजूमामा भोळे यांना दिली. प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर आ. राजूमामा भोळे यांनी पिंजून काढला. रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवत आ. राजूमामा भोळे यांचे बाजार समितीमध्ये भरभरून स्वागत केले. प्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी एका महिला भगिनीने आ. राजूमामा भोळे यांना कानात विजयाची गोष्ट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जोरदार प्रचार सुरु असून दि.१२ नोव्हबेर २०२४ रोजी शहरातील सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, दत्त नगर/अशोक किराणा, काशिनाथ लॉजचा मागच्या परिसरात प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “शहराला हवा चेहरा नवा, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत. शहराच्या विविध परिसरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवी चैतन्याची लहर दिसून आली.…

Read More

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मधापुरी आणि चारठाणा येथील पावरी वाडा या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी या आदिवासी पाड्यांवर ॲड. रोहिणी खडसे यांचे सडा रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांकडून आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे मिळालेले प्रेम पाहून ॲड.रोहिणी खडसे भारावून गेल्या या प्रेमातून उतराई होणे शक्य नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला आपला परिवार मानून गेले तीस पस्तीस वर्ष आणि रोहिणी खडसे यांनी गेले पाच वर्षात केलेल्या जनसेवेच्या कार्याची सर्व पदाधिकाऱ्यांना या स्वागतातून प्रचिती…

Read More

रावेर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ आज (दि.१२) फैजपूर येथे राज्यसभा खासदार व सुप्रसिध्द कवी इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला आ.शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, अब्दुल करीम सालार, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार मुक्ती हारून साहेब व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुतीचे सरकार असूनही त्यांनी जनतेच्या हितासाठी सत्ता वापरली नाही. यामुळे शेतकरी व…

Read More

रावेर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी काल (दि.११) यावल शहर, अंजाळे, वाघळूद या परिसरात आपला प्रचार दौरा काढला. यावेळी यावल तालुक्यातील यावल शहर, अंजाळे, वाघळूद यासह परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून यावल ते फैजपूर रस्ता डांबरीकरण यावल ते भुसावळ रोडवरील काँक्रीटीकरण व अंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. यावेळी…

Read More