उत्तराखंड : वृत्तसंस्था उत्तरखंडमधील अल्मोड येथे बस थेट दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. बचाव पथक, पोलिसांसह एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. ४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची माघारीचा दिवस उगविला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी बिबट्याची दहशत कायम असतांना नुकतेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वन परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. हा हल्ला झाला त्यावेळी तरुणाचे वडील व काका सोबत होते. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. हरिराम गंगाराम धिकार (रा. केसरपूर) असे मृताचे नाव आहे. हरिराम त्याच्या वडील व काकांसह जंगलात गेला होता. हरीसालपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर जंगलात हे तिघेही चारा आणण्यासाठी गेल्याचा अंदाज आहे. दरम्यान हे बफर झोनमध्ये असतानाच अचानक वाघाने हरिराम यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर वाघाने त्यांना ओढत सुमारे ३०० ते ४००…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल. तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू शकाल. कुटुंबातील समस्या आज सुटतील आणि दीर्घ काळानंतर एखाद्या जुना मित्राला भेटल्याने तुम्ही खूश व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आज कोणाकडे उधार पैसे मागू शकता. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कामामुळे तुम्ही नोकरीत इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळेल. पण आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत…
जळगाव : प्रतिनिधी भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनाविदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक औक्षण केले. गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.’ ”या औक्षणाच्या सोहळ्यात बहिणींनी आपल्या गुलाब भाऊंच्या विजयाची प्रार्थना करत, “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगून “आम्ही सर्व बहिणी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे भावनिक उद्गार व्यक्त केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आ.राजूमामा भोळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील सुप्रीम कॉलनी येथील वार्ड क्रमांक १९, मंडळ क्रमांक ३ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. भोळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आगामी काळात महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असे या युवकांनी सांगितले. देशात व राज्यात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील भारत आणि प्रगतिशील महाराष्ट्र निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण व नागरिक हे पक्षात प्रवेश करीत आहे. त्यानुसार शहरातील वार्ड क्रमांक १९ येथील सुप्रीम कॉलनीतील १०० पेक्षा अधिक तरुणांनी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने आगामी काळात प्रचारासाठी कंबर कसली असून महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे सर्वात मोठे स्टार प्रचारक ठरणार आहेत. राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबरपासून मोदींच्या प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे. राज्यात भाजपकडून स्टार प्रचारकांची यादीच जाहीर करण्यात आली असून विविध केंद्रीय मंत्रीदेखील प्रचारात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. सर्वात अगोदर धुळे व नाशिक येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकोला व नांदेड येथे त्यांची सभा होईल. तर १२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी असून अनेक नेते बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यात व्यस्त असतांना नुकतेच मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अखेर विधानसभा निवडणूकीला उमेदवार उभे करण्याचा निर्णय आज घेतला आहे. जिथे ताकद आहे तिथेच जोर लावायचा, जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा. फक्त एससी एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही आमच्या उमेदवारांकडून बाँड लिहून घेणार आहे..तसेच व्हिडिओग्राफी देखील करून घेणार. पण हे काही व्हायरल करणार नाही. कारण आपल्याला कुणाला अडचणीत आणयचे नाही असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आता आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आघाडी व महायुतीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून नुकतेच या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशीच एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे सर्वाचंच लक्ष आहे. अजित पवार सध्या गावभेटी घेत आहेत. गावागावात जात अजित पवार प्रचार करत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणालेत. 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल. त्यामुळे कोण- काय बोलतं? कुणाचे काय दावे आहेत? याला…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीमधून माघार घेण्याची वेळ तोंडावर येवून ठेपली असतांना आता राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मोठा झटका लागला आहे. निवडणूक आयोगाने थेट सत्तार यांच्या शपथपत्रांची तातडीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांचं टेन्शन वाढलं आहे. सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल…

