Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवारी (५ डिसेंबर) मेहरुण परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम नगरातील रहिवासी माया वालचंद तांबे (३०) या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून समोरील दुचाकीस्वाराने महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करत आहेत

Read More

जळगाव : प्रतिनिधी पोलिसांचे बॅरिकेड्स घेऊन जाणाऱ्या वाहनावर दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी कलाभवनजवळ झाला. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली नाक्यावरील सद्‌गुरू नगरातील ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (३६) हे दोघे भाऊ दुचाकीने जात होते. त्या वेळी ते पोलिसांच्या वाहनावर धडकले. यात दोघांनाही मार लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यातील ईश्वरसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करून सावखेडा सिम-दहिगाव भागात कमी दरात विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील चोरीच्या तब्बल ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ बशीर पटेल (रा. पटेल वाडा, दहीगाव, ता. यावल) असे या अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जळगाव येथून चोरीस गेलेल्या मोटरसायकलीच्या तपासासाठी जळगाव शहर पोलिसांनी दहिगाव गाठले. दहिगावातील पटेल वाड्यात रहिवास करीत असलेला आसिफ यास बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी केली. त्यावेळी त्याने चोरून आणलेल्या मोटारसायकली ज्या-ज्या लोकांना कमी दरात विक्री केल्या, त्यांची नावे त्याने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्वरित त्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी पोलिस असल्याची बतावणी करीत महिलेच्या अंगावरील दोन लाख ६५ हजारांचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविले. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळ घडली. दोघा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगरजवळ दोघा अनोळखींनी वसंत जगन्नाथ पाटील (७९, रा. वेडीमाता मंदिर, खळवाडी, आदर्शगल्ली, भुसावळ) यांची अॅक्टिवा गाडी थांबवून त्यांना पोलिस असल्याचे सांगितले. आता एका वृद्धेचे दागिने लांबविण्यात आले. तुम्ही इतके दागिने घालून कोठे जात आहात, अंगावरील सोने काढून ठेवा, असे सांगितले. वसंत पाटील यांनी पदमावती पाटील यांचे दागिने रुमालात काढले, सोबत कागदपत्रेसुद्धा रुमालात ठेवली. रुमाल बांधला व रुमाल डिक्कीत नीट ठेवतो, असे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मेंदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या परिवाराचे बंद घर फोडून चोरट्यांनीभरदिवसा २५ तोळे सोन्यासह २८ लाख ५५ हजारांचा ऐवज लांबविला होता. ही घटना सोमवारी दुपारी तीन ते रात्री दहाच्या वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात या घराचा जावईच चोर निघाला. त्याला फेकरी येथून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे या अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान अनिल हरी बहाटे (६४, रा. सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी, भुसावळ) यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले ३३ तोळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सीमा तपासणी नाक्यावर नियुक्तीच्या मोबदल्यात पंटरला लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देत त्याच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसम (पंटर) भिकन भावे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तसेच जळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नाही. दरम्यान, सीमा नाक्यांवर झालेल्या नियुक्त्यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्तीच्या बदल्यात आरटीओ दीपक पाटील यांनी पंटर भिकन भावे याला तीन लाख रुपयांच्या लाचेसाठी प्रोत्साहन दिले व त्यानुसार लाच मागण्यात आली. छत्रपती…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना मंगरूळ (ता. अमळनेर) येथील औद्योगिक वसाहत भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाच्या पत्नीस ताब्यात घेत तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. तुषार चिंधू चौधरी (३७) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चौधरी (३०) व तिचा प्रियकर सागर अरुण चौधरी (३०, रा. मालपूर, दोंडाईचा) अशी संशयितांची नावे आहेत. तुषार हा ५ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास १० मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही, म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याचे मोबाइल लोकेशन मंगरूळपर्यंत दाखवत होते. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून…

Read More

मेष राशी कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. एखाद्या राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल. राजकीय किंवा सामाजिक मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नोकरीत सुख मिळेल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. गंभीर आजारांपासून आराम मिळेल. वृषभ राशी महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने मनोबल वाढेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. तुम्हाला काही सामाजिक कार्याची जबाबदारी मिळू शकते. नोकरीचा शोध पूर्ण होईल. न्यायालयीन प्रकरणातील कोणताही अडथळा मित्राच्या मदतीने दूर होईल. आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल. तुमच्या जीवनसाथीला नोकरी मिळाल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन राशी आज…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी दुचाकी व टीव्ही चोरीच्या दोन घटनांना आठवडा उलटला नाही, तोच कुलूपबंद घरात चोरट्यांनी पुन्हा संधी साधली आहे. अज्ञात चोरट्यांनी ओमनगर येथे कटरने कडीकोयंडा कापून दोन घरांमध्ये चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील ओमनगरामधील भटू चौधरी हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी कटरने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून २५ हजार रुपये रोख व ३ ते ४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. त्याच परिसरात प्राचार्य अनिल पाटील यांच्या कुलूपबंद घरात आधी चॅनेलगेट तोडले. नंतर घराचा कडी कोयंडा तोडण्यात आला. मात्र, किरकोळ पैसे वगळता चोरांच्या हाती काहीएक लागले नाही. नंतर प्राचार्य अनिल पाटील यांच्या शेजारी असलेल्या…

Read More

जामनेर : प्रतिनिधी कुटुंब लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने व ३५ हजाराची रोकड असा सुमारे १ लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना नेरी बुद्रुक (ता. जामनेर) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश भगवान पाटील (ग्यानपार्क, नेरी बुद्रुक) हे नातेवाईकाच्या लग्नासाठी मंगळवारी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्न असल्याने निघण्यास उशीर होणार असल्याने ते मुक्कामी राहिले. बुधवारी सकाळी त्यांना त्यांच्या मित्राचा फोन आला की, तुमच्या घरात चोरी झाली आहे. पाटील यांनी तातडीने नेरी गाठले. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. कपाटातील ५७ हजाराचे सोन्याचे दागिने, ४ हजार ४०० किमतीचे चांदीचे दागिने…

Read More