Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याची ४२ लाख १५ हजार रुपयांमध्ये, तर निवृत्त लिपिकाला खोटे कागदपत्र पाठवून गुन्ह्याची धमकी देत १८ लाख रुपयांमध्ये फसणूक करण्यात आली. दोघांना एकूण ६० लाख १५ हजार रुपयांमध्ये गंडविण्यात आले असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्याशी एका जणाने १३ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर यादरम्यान संपर्क साधून एका अॅप्लिकेशनद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये अॅड केले. त्यात त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी माहिती देऊन त्याद्वारे अधिक नफ्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या…

Read More

मेष : आज तुम्‍ही आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीला कठोर परिश्रमाद्वारे तोंड देण्यास सक्षम असाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी सौम्य मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रकृतीच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. वृषभ : आज दिवस अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांचा गौरव करण्यात चांगला व्‍यतित कराल. नातेवाईकांशी संवाद साधाल. विद्यार्थी आपल्‍या ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील. मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण करा. उधार घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. नकारात्मक गोष्टींना वर्तमानात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात शिरुन महिलेला घर देण्यावरुन वाद झाला. यावेळी अंजूमबी फिरोज खान (वय ४०, रा. ख्वॉजा नगरी, पिंप्राळा हुडको) यांना कय्यूम शेख यांनी पकडून ठेवले. तर त्यांची पत्नी मेहुरुनिसा शेख हीने महिलेच्या हाताचा चावा घेत जखमी केले. ही घटना दि. २९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वॉजा नगरीत अंजूम बी फिरोज खान या महिला वास्तव्यास आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या परिसरातील मेहरुनिसा शेख व तिचा पती कय्यूम शेख हे त्यांच्या घरात घुसले. त्यांनी महिलेला माझे घर देवून…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले, तर सोबत काढलेले फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना दि. ४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा वर्षीय मुलगी वास्तव्यास आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित कामेश उर्फ कमलेश चरखे याने हात ओढून धमकी दिली. यावेळी त्याने तू माझ्यासोबत प्रेमसंबंध नाही ठेवले तर मी तुझ्यासोबत काढलेले फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करेल. अशी धमकी दिली. तसेच मुलीच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी साहित्य बाजूला करण्यास सांगितल्याचा राग आल्याने कुंदन अरुण राणे (वय ३६, रा. कानळदा, ता. जळगाव) याला रविंद्र सुरेश शिंदे व राहुल सुरेश शिंदे (दोघ रा. कानळदा) यांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा गावात कुंदन राणे हे वास्तव्यास असून दि. ६ रोजी त्यांच्या घरासमोर त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवलेले होते. राणे यांना रस्त्यावरुन येण्या जाण्यासाठी रस्त्यात पडलेले साहित्य बाजूला करण्यासाठी रविंद्र शिंदे व राहुल शिंदे यांना सागितले. त्याचा राग आल्याने दोघ भावांनी कुंदन…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवार दि.६ डिसेंबर रोजी काढले. दरम्यान गॅस रिफलींग स्फोट प्रकरण त्यांना भोवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून दत्तात्रय निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ११ जण भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जोरदार टीका सुरू होती. त्यामुळे निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडी व दोन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात चोपडा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील सुंदरगढी परिसरातील शुभम पारधी (वय २०), लोहिया नगरमधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगरमधील एक अशा तिन जणांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टॅक्सीमधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार (रा. सुरत) याला डॉ. सुमित सूर्यवंशी यांच्या रुग्णालयात दाखल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाल्याने हा पाऊस पडत आहे. दरम्यान आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्राकार वारे देखील पुढे सरकल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार आता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेच्या काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने दोन दिवसापूर्वी शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला असून राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली. नऊ वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात शपथ दिली. आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधानभवनात शपथ देतील. हंगामी सभापती झाल्यानंतर कोळंबकर हे विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. तसेच 9 डिसेंबर रोजी 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विश्वासदर्शक ठराव मांडेल. महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने हा ठराव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारने दोन दिवसापूर्वीच शपथविधी घेतला असून यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दिग्गज नेते आता अजित पवार गटाच्या काही नेत्यांच्या संर्पकात असल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत गुलाबराव देवकर यांनी ५ रोजी सकाळी १०.३० वाजता भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ही गुलाबराव देवकर यांचा संपर्क झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाला श्रेष्ठींनी हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती देखील समोर आली…

Read More