जळगाव : प्रतिनिधी नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग आल्याने नितीन जाधव (रा. दादावाडी) याने महेंद्रकुमार पगारे (रा. दादावाडी) व त्यांच्या पत्नी पद्मिनी पगारे यांची कार अडवून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ८ डिसेंबर रोजी दादावाडी तसेच काव्यरत्नावली चौकाजवळ घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जाधव याने बदली केल्याच्या रागातून महेंद्रकुमार व त्यांच्या पत्नी जात असलेल्या कारसमोर दुचाकी आडवी लावून कार अडवली. त्यानंतर महिलेच्या पतीला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पद्मिनी पगारे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नितीन जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Author: editor desk
बोदवड : प्रतिनिधी शहरातील भिल्लवाडीतीला एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यातून शहरात खळबळ उडाली. घटनेची दखल घेता पोलिसांनी बंदोबस्त लावला असून दुकाने बंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान शहरातील बस स्थानका जवळ लहान मुलांचे भांडण झाले त्यात भिल्लवाडीत राहणाऱ्या उखा भिल या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे
चाळीसगाव : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली दिली आहे. दि. ९ रोजी सुमारे ९:१५ वाजता, पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळविण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉडने तपासणी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली…
जामनेर : प्रतिनिधी शहरातील शास्त्रीनगर भागातील ३० वर्षीय तरुणाचा १० रोजी अपघाती मृत्यू झाला. मनोज बाविस्कर (भज्ञ्जी) असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडे रस्त्यावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास त्याची दुचाकी झाडाला धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मेष राशी व्यवसायात सहकाऱ्यांशी समन्वय ठेवावा लागेल. संयमाने आणि उत्साहाने काम करा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने व शौर्याने नियंत्रण ठेवा. विरोधी पक्षाच्या कारवायांकडे लक्ष देण्याची गरज आहे. गुप्त कारवायांमधून तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न कराल. आज वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आनंद आणि सहकार्य सामान्य राहील. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी पदोन्नती होईल, पगार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू सुरळीत राहील. आर्थिक बाबतीत व्यावसायिकांशी भेटीगाठी होतील. नोकरीत वाद टाळा. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. हरवलेली कोणतीही मौल्यवान वस्तू सापडू शकते. उद्योग सुरू करण्याच्या योजनेला गती मिळेल. मिथुन राशी मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायातील…
चाळीसगाव : प्रतिनिधी रेल्वेत अडीच लाखांची चोरी करणाऱ्या अहिल्यानगर येथील तिघांच्या चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा ही समावेश असून त्याच्या आजीला समज देऊन त्याला ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली होती. अर्जुन ऊर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (२५, मारोती मंदिराजवळ धारनगाव, जि. अहिल्यानगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (२३, धारनगाव) व एक अल्पवयीन मुलगा अशी या तिघांची नावे आहेत. शीतल कैलास (चाळीसगाव) या एक्स्प्रेसमध्ये चढत पाखले धुळे-मुंबई असताना प्रवाशांच्या गर्दीत त्यांच्या खांद्यावर लटकवलेली पर्स अज्ञाताने चोरून नेली होती. या पर्समध्ये हिरव्या रंगाची कापडी पिशवी होती. या पिशवीत २ लाख ५० हजार रुपये, त्यांच्यासह पतीचे आधारकार्ड, पॅनकार्ड…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील खेडीढोक येथील १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. हितेश विजयसिंग पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास पंडित पाटील (४१, खेडीढोक) यांनी याबाबत पारोळा पोलिसात खबर दिली आहे. गावातील महेंद्र मुख्त्यारसिंग पाटील यांनी आपल्याला खबर दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. फिर्यादीनुसार, हितेश विजयसिंग पाटील याने त्याच्या खेडीढोक शिवारातील शेतात विष प्राशन केले आहे. भानुदास पाटील, महेंद्र पाटील, विशाल पाटील, मंगलसिंग पाटील, शुभम पाटील, गजानन पाटील यांनी हितेश पाटील यास अमळनेर येथे दाखल केले. मात्र त्याची तब्येत खालावल्याने त्याला कुटीर रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.…
जळगाव : प्रतिनिधी मनपा मालकीच्या गिरणा पंपिंग व बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाइप चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी भाजपकडून मनपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील महाजन यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, जितेंद्र मराठे, भगत बालानी, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, मनोज काळे, गोपाल पोपटानी, सुनील सरोदे, वीरेन खडके, गायत्री राणे, सुरेखा तायडे, आशिष सपकाळे, मुकुंद मेटकर, मुकुंदा सोनवणे, कैलास सोनवणे, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, शंकर कुमावत, राजेंद्र घुगे पाटील, उमेश देशपांडे, मिलिंद चौधरी, विनोद मराठे, नितीन पाटील, जितेंद्र…
जळगाव : प्रतिनिधी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेली कार कमी किमतीत (डिस्काऊंट) मिळवून देण्याचे आमिष दाखवत विक्रम रमेश मुणोत (४२, रा. गणपतीनगर) यांची ३ लाख २५ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात राकेश सुभाष बडगुजर (४२, रा. आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम मुणोत यांची व्यवसायाच्या माध्यमातून एका कंपनीच्या जळगाव कार्यालयातील एरिया मॅनेजर राकेश बडगुजर याच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत राकेश बडगुजर याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना डिस्काऊंटमध्ये मिळणारी कार मुणोत यांना कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी मुणोत यांनी वेळोवेळी एकूण तीन लाख २५ हजार रुपये दिले. त्यानंतर बडगुजर याने नकार देऊन फसवणूक केली.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री स्वामी नारायण मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवासाठी १० ते १७ डिसेंबरदरम्यान जळगाव ते भुसावळ दरम्यान अवजड वाहनांना बंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवर जवळील श्री स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगळवारपासून आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणाहन होणारी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात येणार असून त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे…

