Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना पोलिसांनी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतूसे, चॉपर, चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील काही संशयित हे हिस्ट्रीशिटर आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख (रा. भारत नगर, भुसावळ), अरबाज शेख शबीर (रा. तेली गल्ली, भुसावळ), मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम, शोएब इकबाल खाटीक (दोन्ही रा. फैजपूर), आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर, राहूल उर्फ चिकू राम डेंडवाल आणि मोहित जितेंद्र मेलावंस (तिघे रा. खंडवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सोमवारी (९…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील कुर्ला उपनगरात बेस्टची इलेक्ट्रिक बस भरधाव वेगात गर्दीत घुसली आणि रिक्षासह, खासगी वाहने आणि प्रवाशांनाही धडक दिली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आफरिन रसूल शाह (१९), आझम शेख (२०), कनिस फातिमा कादरी (५५) आणि शिवम कश्यप अशी मृतांची नावे आहेत. आरोपी बसचालक संजय मोरे (५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे म्हणणे आहे. याबाबत आरटीओचे पथक अधिक तपासणी करत आहे. कुर्ला पश्चिमेकडील महापालिकेच्या एल वॉर्ड कार्यालय परिसरात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान…

Read More

मेष राशी आज तुमच्या बऱ्याच इच्छा मार्गी लागणार आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये काही सुधारणा होऊ शकतात. कुटुंबात काही छोटे वादविवाद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहा. प्रवास टाळा, कारण काही अडचणी येऊ शकतात. व्यवसायात काही तोटे होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा चांगली जाईल. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. वृषभ राशी आज तुम्हाला घरगुती खर्चासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. तरीही, उत्पन्न पाहूनच खर्चावर नियंत्रण ठेवा. नाही तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. प्रतिस्पर्ध्यांचे लक्ष तुमच्यावर असू शकते, त्यामुळे सतर्क राहा. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल. मात्र, प्रियकराशी वाद होऊ शकतो. मिथुन राशी समाज कार्यात भाग घ्याल. परंतु काही अडचणी येऊ शकतात.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. देशात कुठल्याही राज्याचे राज्यपाल करतो, असे आमिष दाखवून नाशिकच्या बारावी पास भामट्याने चक्क तामिळनाडूतील एका शास्त्रज्ञास ५ कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी (रा. गंधर्वनगरी, मोटवाणी रोड, नाशिकरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली. फसवणूक झालेले नरसिम्मा रेड्डी अपुरी (रा. चेन्नई, तामिळनाडू) यांची याबाबत फिर्याद दिली होती. रेड्डी एका पूजेसाठी फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये आले होते. मुंबई नाका येथील एका हाॅटेलमध्ये निरंजन कुलकर्णी याच्यासोबत त्यांची तेव्हा एका मित्रामार्फत पहिल्यांदा भेट झाली. ‘माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत अोळख अाहे. मी कोणत्याही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दारूच्या नशेत वेडीवाकडी दुचाकी चालविणारे दुचाकीस्वार समोरुन येणाऱ्या आयशरवर धडकले. या अपघातात ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक व नेपालसिंग नेहेरसिंग टाक (दोच रा. तांबापुरा) हे गंभीर जखमी झाले. ही घटना ६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिंधीकॉलनी रोडवरील कलाभवसमोर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवगाव येथील नरेंद्र युवराज सोनवणे हे पोलीस दलातील (एमएच १९, एम ९२१४) क्रमांकाचे आयशर वाहन सिंधी कॉलनीकडून पांडे डेअरी चौकाकडे जात होते. यावेळी ईश्वरसिंग टाक व नेपालसिंग टाक हे दोघे (एमएच १९, टी ६८१८) क्रमांकाच्या दुचाकीवरुन दारुच्या नशेत बेडीवाकडी चालवून सिंधी कॉलनीकडे जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करुन हात्तात चॉपर घेवून दहशत माजविणारा चिकी उर्फ माया गणेश शिंदे (वय २०) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या, त्याच्याकडून धारदार चॉपर जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसरात विक्की उर्फ माया गणेश शिंदे हा दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हातात चॉपर देवून परिसरात शिवीगाळ करीत सार्वजनिक शतितेचा भंग करुन दहशत माजवित होता, याबाबतची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आनंॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकी विजय खैरे हे करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कारचे नुकसान झाल्याची घटना दि. २९ नोव्हेंबर रोजी आदित्व लॉनजवळ पडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभात कॉलनीत अभिषेक अविनाश लाठी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी ते रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आदित्य लॉन परिसरात (एमएच १९, ईएल ४४९४) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. लाठी यांनी दि. ७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दुचाकीस्वार जयदीप राठोड रा. मन्यारखेडा ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों रामदास कुंभार हे करीत आहे

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर (३४, क्रांतीनगर, शिरपूर) याने एक दुचाकी चोरली होती. पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी विविध रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथकाला रवाना केले. संतोष हटकर यांच्याविरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने तांत्रिक मुद्यांच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली.

Read More

भडगाव ; प्रतिनिधी सध्या भडगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशिनद्वारा अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजता वलवाडी येथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर तसेच शनिवारी सकाळी ७ वाजता वाक येथील रस्त्यावर एक ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. ही दोन्ही वाहने भडगाव शासकीय आयटीआय येथे जमा करण्यात आली आहेत. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत महसूल विभागाच्या पथकात तलाठी सुनील मांडोळे, किरण मैंद, महादू कोळी यांचा समावेश होता. शनिवारी झालेल्या कारवाईत विवेक महाजन, गीतेश महाजन, महादू कोळी, योगेश पाटील यांचा समावेश होता. अवैध वाळू वाहतूकप्रकरणी अशीच धडक कारवाई…

Read More