जामनेर : प्रतिनिधी जामनेरनजीक बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या तीन अपघातात चारजण ठार झाले. रस्त्यात टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली. याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसून मेहुणे आणि शालक असे दोनजण, दुसऱ्या अपघातात बंद पडलेल्या एका वाहनावर मागून आलेले दुसरे वाहन धडकले, यात तिसरा ठार झाला; तर ट्रॅक्टर चालविताना तोल गेल्याने चाकाखाली येऊन चालक ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या अपघातात शंकर भगवान चौधरी (३५, रा. धुळे) आणि मयूर गणेश चौधरी (२५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हे मेहुणे आणि शालक, तर दुसऱ्या अपघातात शेख कलीम शेख मोहम्मद (५०, रा. शिवना, ता. सिल्लोड) हे ठार झाले. तिसऱ्या अपघातात सल्लाउद्दीन जैन उद्दीन शेख (३२)…
Author: editor desk
मेष राशी भागीदारीत व्यवसाय करण्याची शक्यता आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागल्यास त्यांना नवीन आशेचा किरण मिळेल. इकडे-तिकडे गोष्टींमध्ये अडकू नका. विरोधकांशी सावधपणे वागा. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. बजेटवर लक्ष ठेऊनच पुढल्या योजना आखा. नोकरीत स्थान बदलू शकते. महत्त्वाच्या कामातील अनावश्यक अडथळे आपोआप दूर होतील. करिअर आणि व्यवसायात चांगले स्थान राखाल. खर्च अधिक होईल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे, सावध रहा. मिथुन राशी आज लाभ होऊ शकतो.समजूतदारपणे व्यवसाय करण्याकडे लक्ष द्या. कामावर लक्ष केंद्रित करा. राजकारणात तुमचे स्थान वाढेल. कामाच्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटू नका. तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत दिल्यानंतर महायुतीने 5 डिसेंबरला महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर 7 दिवसांनी गुरुवारी मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाची शपथ 14 डिसेंबरला होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीत आहेत. शहा यांची भेट घेण्यासाठी ते संसदेतही पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले नाहीत. शहा-फडणवीस…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली असून यात मुख्यमंत्री पदी देवेद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांची वर्णी लागली आहे तर दुसरीकडे शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीमुळे पवार कुटुंबात मनोमिलनाचे पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता शिवसेनाही त्याच मार्गाने पुढे जाण्याची शक्यता वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंबंधी एक महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे. तसे शिवसेनेतही कुणीतरी टाळी देण्यास तयार हवे, असे ते म्हणालेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज…
पारोळा : प्रतिनिधी एसटी बसमधून महिलेचे २२.५ तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव ते पाचोराच्या दरम्यान घडली. यात पिंपळगाव हरे. पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदाड येथील शोभा अरुण पाटील या दि. ९ रोजी लग्न सोहळा आटोपून दुपारी ३:४० वाजता चाळीसगावहून पाचोऱ्याकडे परत येत होत्या. नाशिक पाचोरा बस क्रमांक एम.एच. १९-१८८४ मध्ये चढल्यावर पर्समधील साडेबावीस तोळे सोने अज्ञातांनी लंपास केले. शोभा पाटील या सुनेसह नातवाला घेऊन पाचोरा स्थानकावर उतरल्या. त्यानंतर शिंदाड येथे घरी आल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी पिंपळगाव हरे पोलिसात माहिती दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव…
जळगाव : प्रतिनिधी दिलेल्या पैशांच्या पाच ते सहा पट रक्कम वाढवून परत देण्याचे आमिष दाखवत पुतणीचा पती व त्याच्या भावाने पिंप्राळा येथील व्यापाऱ्याची ४८ लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. पैसे मागितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी (११ नोव्हेंबर) रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल प्रभुलाल राठी (६३, रा. पिंप्राळा) यांची एमआयडीसीमध्ये कंपनी होती. त्यांनी ती सन २०१८-१९ मध्ये विकली होती. त्यासाठी त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते. गोपाल राठी यांच्याकडे पैसे असल्याची माहिती पुतणीचे पती विजय जगदीश मंडोरे आणि त्यांचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्याकडे होती. मंडोरे यांनी सन २०१६ मध्ये…
पारोळा : प्रतिनिधी बाभळेनाग येथून पारोळ्याकडे येणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातात कमलबाई नारायण माळी (७५, रा.. बाभळेनाग, ता. पारोळा) यांचे निधन झाले. ही घटना दि. ११ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बाभळेनाग येथील पृथ्वीराज धनराज माळी हा आजी कमलबाई यांच्यासोबत एमएच १९-डीके ८४०२ क्रमांकाच्या वाहनाने पारोळा येथे येत होता. त्यावेळी हिरापूर फाट्याजवळ एमएच ०२-बीटी ८३९२ क्रमांकाच्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात पृथ्वीराज हा गंभीर जखमी झाला. तर कमलबाई यांचा मृत्यू झाला. याबाबत कार चालकाविरोधात पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे आसिफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (४०, रा. आयेशा नगर, सुप्रीम कॉलनी) हे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरएल चौफुलीजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हे गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कॉलनी परिसरातील आयेशानगरात राहतात. वॉल पेपर लावण्याचे काम करणारे कुरेशी बुधवारी दुपारी सुप्रीम कॉलनीकडून दुचाकीने (क्र. एमएच १९, डीसी १७५१) शहरात येत होते. त्यावेळी आरएल चौफुलीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १९ सीएक्स ४९४०) जोरदार धडक दिली. त्यातदुचाकीस्वार आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अटल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश घेतला होता. या…
जळगाव : प्रतिनिधी नगररचना विभागातील १५ हजारांच्या लाचप्रकरणी सहायक संचालक दिघेश तायडे यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. दुसरीकडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे बुधवारी संध्याकाळी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नगररचना विभागातील रचना सहायक मनोज वन्नेरे याला १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्याने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगररचना विभागाचे सहायक संचालक दिघेश तायडे यांच्या नावाने लाच घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान, लाचखोर वन्नेरे याने दोन प्रकरणात १५ हजार, तर अन्य जुन्या प्रकरणात चार हजारांची लाच स्वीकारल्याचे संभाषण ध्वनिमुद्रित झाले आहे. या संभाषणातील मजकुरानुसार चौकशीमध्ये विचारणा करण्यात आली. तसेच…

