धरणगाव : प्रतिनिधी दि.१४ रोजी पहाटे धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार आणि २१ प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०)ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक भागातून दुचाकी चोरीच्या घटना नियमित होत असतांना नुकतेच जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल वीस दुचाकीसह संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा.धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा.वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा.वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा.लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा.वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत. संपूर्ण कामगिरी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना नेहमीच वाढत असतांना नुकतेच जळगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला केला आहे. यात शहर डीबी पथकाकडून एकुण १९ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाणे अंतर्गत वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा चित्रा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित आरोपी आशीफ बशीर पटेल वय -३५, रा. दहिगाव ता. यावल याला…
पाचोरा : प्रतिनिधी वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने सायकलवर जाणाऱ्या अथर्व उर्फ रुद्र जितेंद्र गोसावी (रा.राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) या दहा वर्षीय बालकास चिरडले. यात बालक जागीच ठार झाला. ही भीषण घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील शक्तीधामनजीक घडली. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा सा. प. शिंदे विद्यालयातील तिसरीचा विद्यार्थी होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास घराजवळील शक्तीधाम कार्यालयाजवळ रस्त्यावर सायकलवर फिरत होता. याचवेळी अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. यात रुद्र हा मोठ्या चाकाखाली सापडून जागीच ठा झाला. घटना घडताच ट्रॅक्टरसह चालक तिथून पसार झाला. तिथ जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले व…
जळगाव : प्रतिनिधी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी वॉचमन किरण मानसिंग राठोड (३६, रा. विद्यानगर) यांच्या घरातून रोख रकमेसह मोबाइल, भांडे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, किरण राठोड हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत जय अशोक राजपूत (१९, मयूर कॉलनी, पिंप्राळा) याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून रोख दोन हजार १०० रुपयांची रोकड, दोन हजारांचा मोबाइल, एक हजार ३०० रुपयांची स्वयंपाकाची भांडी असा एकूण पाच हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पळण्याच्या तयारीत होता. मात्र राठोड यांनी त्यास रंगेहात पकडले.
जळगाव : प्रतिनिधी भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिल्याने गीता भगवान पाटील (४२, रा. माळपिंप्री, ता. जामनेर) या ठार झाल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भास्कर पाटील (रा. माळपिंप्री, जामनेर) व त्यांची काकू गीता पाटील हे २ डिसेंबर रोजी दुचाकीने वावडदा येथे जात होते. त्या वेळी विटनेर गावाजवळ एका ढाब्यासमोर ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिला. त्यात गीता पाटील या ठार झाल्या.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भुसावळ रस्त्यावरील सियाराम ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मुक्ताईनगर येथील तरुण जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी रात्री उशिरा घडली.मृत तरुणाचे नाव नीलेश सुपडू डवले (२८) असे आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दीपक राजपूत यांची मोटारसायकल घेऊन क्रमांक (एम.एच. १९ डी.पी. ७४७७) बाहेर गेला होता. दरम्यान रात्री भुसावळ रस्त्यावरील सियाराम ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात नीलेशचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात मुकेश डवले यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत. या संदर्भात घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. त्या…
अमळनेर : प्रतिनिधी उसनवारीचे पैसे घेण्यासाठी चोपड्याहून आलेल्या एका इसमाला दोघांनी मारहाण करून त्याच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना धुळे रस्त्याला घडली आहे. या दोघांवर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सुदाम महाजन याने ३ महिन्यांपूर्वी सुनील मनोहर सोनगिरे रा. चोपडा यांच्याकडून दीड लाख रुपये उसनवारीने मागितले होते. त्यातील ३० हजार रुपये घेण्यासाठी ८ डिसेंबर रोजी साडेपाच वाजता चोपड्याहून बोलवून घेतले. सायंकाळी ७ वाजेला पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर महेंद्र महाजन आणि त्याचा मित्र दीपक मराठे यांनी सोनगिरे यांना पैशांसाठी वारंवार तगादा लावतो, असे सांगत मारहाण केली. दोघेही दुचाकीवर निघून गेले. जखमी सोनगिरे…
पारोळा : प्रतिनिधी कापूस घेण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याने मापात फसवणूक केल्याने त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना आडगाव, ता. पारोळा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी शेकडो ग्रामस्थ एकत्र जमले होते. पोलिस वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील आडगाव येथे कापूस घेण्यासाठी पारोळा शहरातील व्यापारी आले होते. मात्र, कापूस घेताना ते मापात फसवणूक करीत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. याबद्दल ग्रामस्थांनी व्यापाऱ्याकडे विचारणा केली. मात्र, व्यापाऱ्याने उडवा- उडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी थेट व्यापाऱ्यालाच चोप देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गावात जमावही जमला होता. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव…
मेष राशी व्यवसायात प्रगती आणि प्रगतीची शक्यता आहे. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. राजकारणात नवे मित्र बनतील. जे फायदेशीर ठरेल. आज व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक मदत मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत उघडतील. वृषभ राशी वैयक्तिक समस्यांवर उपाय शोधण्यात तुम्हाला यश मिळू शकते. वरिष्ठांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. नफ्याचा प्रभाव हळूहळू वाढेल. महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यात अपेक्षित यश मिळणे कठीण होईल.घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. प्रलोभनात अडकून निर्णय घेऊ नका. मिथुन राशी एखादे का वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न…

