Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दुचाकीचा कट लागल्याच्या करणावरुन दोन जणांनी अमिन युनूस मन्यार (वय २८, रा. खंडेराव नगर) या तरुणाला दगडासह कड्याने बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १४ रोजी नेरीनाका स्मशान भूमीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात अमिन युनूस मन्यार हे वास्तव्यास असून ते इलेक्ट्रीशनचे काम करतात. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना समोरुन येणाऱ्यांना अमिन मन्यार यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरुन त्या दोघांनी मन्यार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढतच गेल्याने त्या दोघांनी मन्यार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीस्वार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर असलेले रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६, रा. पोलीस लाईन) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना रविवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम केदार यांची वर्षभरापुर्वी उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. पदोन्नती झाल्यानंतर त्यांना रामानंद नगर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती. तीन दिवसांपासून भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. याठिकाणी केदार हे बंदोबस्तासाठी तैनात होते. कर्तव्यावर हजर असतांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ममुराबाद येथील योगेश उर्फ शुभम कैलास शेटे (वय २४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथे योगेश उर्फ शुभम शेटे हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. दुपारच्या सुमारास घरात एकटाच असतांना शुभमने घराचा दरवाजा लावून दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी शुभम दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आईने खिडकीतून डोकावून बघितले असता, त्यांना शुभम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा शहरात बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना सावदा पोलिसांनी अटक केली होती. तर या प्रकरणात तिसरा फरार झाला होता. त्यास भुसावळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावदा शहरातील ख्वाजा नगरमधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना १३ डिसेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. तर या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा तिसरा आरोपी आवेश (भुसावळ) याला सावदा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने १४ रोजी दुपारी ३ वाजता करगांव रोडलगत असलेल्या दयानंद – हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. याप्रकरणी तिघांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला व या छाप्यात ६ हजार रुपये किमतीचे घरगुती वापराचे २ गॅस सिलिंडर, १५ हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे उपकरण, ८० हजार रुपये किमतीची रिक्षा व ८० हजार रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा असा एकूण १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस हवालदार राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला संदीप शरद जाधव (३२, नेताजी चौक), रिक्षाचालक समाधान भरत मोरे (३६,…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील निम येथे अंगणात लावलेल्या दोन दुचाकी रात्रीतून चोरीला गेल्याची तक्रार मारवड पोलिसात नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निम येथील मयूर चंपालाल पाटील यांची ३५ हजार किमतीची दुचाकी (एमएच१९/डीडी ८७४१) ही १३ रोजी रात्री ९:३० वाजता अंगणात लावली होती. मात्र, सकाळी ८ वाजता पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता गावातील सुशीलकुमार सुधाकर पाटील यांची २५ हजार किमतीची विना क्रमांकाची दुचाकीही चोरीला गेल्याचे दिसून आले. मयूर पाटील याने मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत. गेल्या काही दिवसात परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीधारक चिंताक्रांत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे पायी जात असलेल्या रामचंद्र धनू माळी (५७, रा. रामेश्वर कॉलनी) हे ठार झाले. हा अपघात १३ रोजी राष्ट्रीय महामार्गावर एक नर्सरीजवळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील शांतीनारायण नगरात राहणारे रामचंद्र माळी हे १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरून पायी जात होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये रामचंद्र माळी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी गोपाल रामचंद्र माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नारायण कॉम्प्लेक्सजवळ ५५ वर्षीय प्रौढास तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक संशयित फरार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित जय मनोज जाधव (२४), रवी देवसिंग कसोटे (२४) दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुनील यशवंत पाटील (५५) रा. जुना सातारा मरीमाता मंदिरामागे राहतात. दोन डिसेंबरला १० वाजेच्या सुमारास नारायण नगर कॉम्प्लेक्स जवळून जात असताना तिघांनी त्यांना…

Read More

मेष राशी तुमचा आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी होणार आहे. आज तुम्हाला कठोर परिश्रम आणि वर्तनामुळे आर्थिक लाभ मिळेल. शत्रू पक्ष आज तुमच्या प्रभावाने पराभूत होतील. मेष राशीच्या लोकांना आज कौटुंबिक सुख आणि शांती प्राप्त होईल. तुमच्या नात्यात गोडवाही येईल. आज तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवाल. काहींना आर्थिक लाभ संभावतो. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांच्या उत्तम मनोबलामुळे त्यांचे काम चांगल्या गतीने होईल. आज व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगले काम कराल. या राशीच्या प्रियकरांसाठी दिवस चांगला आहे. आज नशीब पूर्णपणे तुमची साथ देईल. पण बोलताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. मिथुन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असून महायुतीने मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवारांनी शपथ घेतली मात्र गेल्या काही दिवसापासून मंत्री मंडळाचा विस्तार झालेला नव्हता तो आज होत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आ.गुलाबराव पाटील हे देखील मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले गुलाबराव पाटील हे यंदाच्या सरकारमध्ये तिसऱ्यादा मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील भूषविले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यात संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना या मंत्रीमंडळ…

Read More