Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीने सरकार स्थापन केले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वी होताना दिसत आहे. अशातच येत्या १५ तारखेला नागपुरात मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती होती. ती माहिती खरी ठरली आहे. येत्या १६ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच १५ डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, याउद्देशाने शनिवारऐवजी रविवारी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अवघ्या देशभरात ‘पुष्पा २’ सिनेमाचा धुमाकूळ सुरु असतांना हैदराबाद येथे ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलीसांनी अभिनेता अल्लू अर्जून याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता असा आरोप करण्यात आला होत. ज्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आणि चेंगराचेरीत महिलेचा मृत्यू झाला. शिवाय महिलेच्या मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध विविध…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच धरणगावजवळ आज दि.१३ डिसेंबर रोजी पहाटे बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. धरणगाव तालुक्यातील दोनगाव जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ बसवरचा ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात आज दि.13 रोजी सकाळी 6 वाजेला झाला. यात 28 प्रवाशी जखमी झाले असून यामध्ये विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक एमएच १४ बीटी २८८७ नेहमीप्रमाणे १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली गावावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली. रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जूनियर कॉलेज संघटनेतर्फे पदवीधर आमदार सत्यजित तांबे  यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले NES boys शाळेत शाळेत एका छोटे खाणे कार्यक्रमानिमित्ताने साहेब आले होते. आ.तांबे यांना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. शशिकांत पाटील सर तसेच उपाध्यक्ष विजयकांत पाटील सर सचिव प्रभाकर पाटील सर तसेच जिल्हा संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. संदीप पाटील सर यांनी सादर केले. विधानसभेत आमच्या मागण्यांच्या सकारात्मक विचार व्हावा असे निवेदन देण्यात आले पदवीधर आमदार यांच्या निधीतून संगणक व पोडियम साहित्य आमदार साहेबांच्या स्थानिक निधीतून शाळांना वाटप करण्यात आले. त्याच प्रसंगी माननीय तांबे साहेबांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोग करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे व स्वतः तंत्रसायक बनावे असा…

Read More

जामनेर : प्रतिनिधी बनावट तृतीयपंथींयाना भिक्षा मागताना पकडल्याने चौघांनी बनावट तृतीयपंथीयांना मारहाण केली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. यावेळी या बनावट तृतीयपंथीयाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जामनेर येथील आठवडे बाजार असल्याने भुसावळ येथील तृतीयपंथी तेथे येत असतात. आज काही बनावट तृतीयपंथी भुसावळ रस्त्यावरील विशाल लॉनजवळ भिक्षा मागत असल्याचे पाहून हा प्रकार घडला. लक्ष्मी रेणुका जोगी (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भावना कुंवर, चुटकी कुंवर, रेश्मा कुंवर, दुर्गा कुंवर (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट तृतीयपंथीयांना पोलिस ठाण्यात आणल्याचे पाहून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Read More

जळगाव : प्रतिनिधी नाताळच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील बेकरींसह अन्य आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीत साठवणूक केलेला ३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा साठा जप्त करण्यात आला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, के. एच. बाविस्कर, श.म. पवार यांनी…

Read More

यावल : प्रतिनिधी अंकलेश्वर ब-हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडे जाताना साकळी गावाच्या पुढील वळणावर दुचाकीला वाचवण्याच्या बेतात ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर पसरले होते. परिणामी रहदारीला अडचण निर्माण होत वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर उलटलेले वाहन बाजूला करून रस्ता मोकळा केला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार,  अंकलेश्वर-ब-हाणपूर राज्य मार्गावर यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे वळण आहे. या वळणावरून दुचाकीने (एम. एच १९/सी.बी. ९०२९) एक जण जात होता. भरधाव वेगात जात असताना वळणावर अचानक चोपडाकडून यावलकडे येत असलेला ट्रक (जी. जे. २३/ए. डब्ल्यू, ९९००) हा समोर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी सुनसगाव येथील ग्रामपंचायत सदस्याच्या गोठ्यास मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. कोणीतरी ही आग लावल्याची चर्चा गावात आहे. आग लावण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य व धनगर समाजाचे कार्यकर्ते सुनील परशराम कंकरे यांचा वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गुरेढोरे व म्हशी तसेच चारा व लाकडे ठेवण्यासाठी गोठा आहे. सुनील कंकरे यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने या गोठ्यात म्हशी बांधलेल्या होत्या. ३ रोजी गावात रात्री एका महिलेचे निधन झाल्याने गावातील कार्यकर्ते संबंधितांकडे जागरण करण्यासाठी बसलेले होते. यावेळी मध्यरात्री सुनील कंकरे हे घरी गेले असता मध्यरात्री २ वाजता गोठ्यास आग लागल्याचा प्रकार…

Read More

बोदवड : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून बोदवड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक चारचाकी वाहन पकडून पोलिसांनी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटे बोदवडजवळ करण्यात आली. एक चारचाकी (एमएच २०/ जीड़ोड ०४७२) गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जात असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला. त्यांनी या गाडीला जामनेर रस्त्यावरील गोशाळेजवळ अडवत तपासणी केली असता गाडीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा (सुमारे १८ लाख ७६ हजार ८० रुपयांचा) आढळून आला. शयाबाबत पोलिस उपनिरीक्षक सुमित पाटील यांनी आरोपी चालक राकेश अरुण नवगिरे, वाहक योगेश लहू लोखंडे (दोन्ही रा. बोकूड जळगाव, ता. पैठण, जि, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा नोंद करत…

Read More

जामनेर : प्रतिनिधी माझ्या मुलापासून दूर राहा, त्याला तुमच्यामुळे व्यसन लागेल, असे बोलल्याचा राग आल्याने दोघा भावांनी पिता-पुत्राला चाकूने मारहाण करून जखमी केले. ही घटना कापूसवाडी (ता. जामनेर) येथे घडली. याबाबत तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन आनंदा थोरात (४६, रा. कापूसवाडी, ता. जामनेर) हे घराच्या बांधकामावर पाणी मारीत असताना पूर्वीच्या वादावरून सागर सोनवणे याने गजानन सोनवणे यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेला मुलगा सौरभ यांच्यावरही गजानन सोनवणे याने सागर याच्या हातातील चाकू घेऊन वार करून जखमी केले. नातेवाईक व नागरिकांनी धाव घेताच दोघे पळून गेले. नागरिकांनी जखमी अवस्थेत दोघांना जामनेर येथे…

Read More