जामनेर : प्रतिनिधी जामनेर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळ महिंद्रा पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना १३ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून पावरा समाजाचे जवळपास ४० मजूर ऊस तोडण्यासाठी महिंद्रा पिकअप गाडीने महाराष्ट्रात येत होते. दरम्यान, जामनेर ते पहुर रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळील वळणावर ही गाडी उलटली. या अपघातात पावरा समाजाचे एकूण १४ जण जखमी झाले आहेत. यातील धर्मा बारेला (वय ३०), जितेंद्र बारेला (वय १६, सुभा राजू बारेला (वय १३), तुळशीराम बारेला (वय ३५), अनिल तोवरसिंग बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय आत्माराम पाटील (वय ५१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख आज नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचे वृत्त चोपडयात धडकताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १२ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास टाकरखेडा ते अमळनेर नजीक असलेल्या मालधक्का रेल्वे पटरीवर एका व्यक्तीचा मृतदेह चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर हा मृतदेह अमळनेर पोलिसांकडे सोपवण्यात आल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले. तर हा…
जळगाव : प्रतिनिधी वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये समावेश करून नफ्याचे अमिष दाखवत भुसावळ येथील एका व्यापाऱ्याची ३४ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. १ जानेवारी ते दि. १३ डिसेंबरपर्यंत घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील व्यापाऱ्याला दि. १ जानेवारी रोजी एका ग्रुपच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर दोन महिलांनी त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले व त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यातून अधिक नफा देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण ३४ लाख रुपये ऑनलाईन स्वीकारले. या व्यापाऱ्याने वेळोवेळी रक्कम गुंतविल्यानंतर अनेक…
जळगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऋषीकेश महारु मोरे यांच्या मालकीचा (एमएच १५, डीके ९७५३) क्रमांकाचा डंपर लोनवाडे येथून दि. ११ डिसेंबर रोजी चोरीलागेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा डंपर जळगावच्या दिशेने गेल्याची माहिती तपासधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील शरद बागल, पोना योगेश बारी, विशाल कोळी व राहुल रगडे यांना डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, त्यांना डंपर एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच संपुर्ण परिसरात शोध घेतला असता, दि. १३ रोजी हा डंपर फातेमा नगरातील निर्जन स्थळी उभा असलयाचे आढळून आले. पोलिसांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशनजवळील जून्या मालधक्क्याजवळ सुमारे ७५ वर्षीय अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या अंगात लाल, निळी व पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. याप्रकरणी डीवायएसएस सुनिल आर. पाटील यांनी दिलेल्या लेखी खबरीवरुन लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस नाईक चौघरी यांनी केले आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीत फातेमानगरात घरात सुरू केलेल्या रिफिलिंग सेंटरवर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी छापा टाकून ३४ व्यावसायिक व घरगुती सिलिंडर जप्त केले. सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील फातेमानगर परिसरात एका घरात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईमध्ये शोएब शेख शफी (२०, रा. फातेमानगर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप…
मेष राशी आज नोकरीचा शोध पूर्ण होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कामे पूर्ण होतील. आळस झटका, कामाला लागा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाशी संबंधित काम पुढे ढकलणे टाळावे. आज व्यावसायिक प्रवास यशस्वी आणि फायदेशीर होईल. व्यवसायात विचारपूर्वक भांडवल गुंतवा. वृषभ राशी बेरोजगारांना काम मिळेल. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा मान-प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल. मिथुन राशी आज आर्थिक क्षेत्रात सामान्य वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात अडथळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. नातेसंबंध सांभाळताना तुम्हाला दबाव जाणवेल. आवश्यक माहिती मिळू शकते. घरगुती जीवन यशस्वी होईल. कर्क राशी आज औद्योगिक योजना यशस्वी होतील. उच्च पदावरील लोकांच्या मार्गदर्शनाने, तुम्ही…
जळगाव : प्रतिनिधी जळगांव जिल्हयात होमगार्ड संघटने तर्फे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह दि. ७ ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन जिल्हयात ऊत्साहाने साजरा करण्यांत आला. सदर कालावधीत सर्व तालुका पथकांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्रथमोपचार विमोचन, पथनाटय ईत्यादि विषयाबाबत शाळा, सार्वजनिक ठिकाणी प्रात्यक्षीक देण्यांत आले तसेच पथनाटयाच्या माध्यमातुन वाहतुक नियमांचे पालन, तंटामुक्ती, सामाजीक एकता ईत्यादीबाबत शहरातील मुख्य चौकात जनजागृती करण्यांत आली. वरील प्रकारच्या सर्व उपक्रमांमध्ये होमगार्डसने स्वच्छेने सहभाग नोंदवीला. दि.१४/१२/२०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जळगांव येथे पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदानावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मा. सुरेश दामु भोळे, (राजु मामा) आमदार जळगांव विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत व…
जळगाव :प्रतिनिधी प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लार्इव्ह कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे. रसिक प्रेक्षकांसाठी नववर्षाची एक अनोखी पर्वणी अनुभवण्यास मिळणार आहे. जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बॅकवॉटर वर असलेल्या बेटावर पर्यटनस्थळाच्या हिरवळीवर या विलोभणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 एकर वरील विस्तीर्ण परिसरात हा सोहळा रंगणार आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून रात्री 8 ते 12 दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी…
बुलढाणा : वृतसंस्था जिल्ह्यातील अमडापूर येथे दि.१३ रोजी शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ चा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये चिखली वरुन उदयनगर कडे जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होते की, हे तरुण जागेवरच मृत पावले. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालकांने घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील तीन तरुणांचा जागच मृत्यू झाला. या मृतांमध्ये पंचवीस वर्षे वयाचा प्रतीक भुजे, 26 वर्षे वयाचा प्रथमेश भुजे आणि सौरभ शर्मा…

