Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरसह ट्रॅक्टर जप्त
    क्राईम

    अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरसह ट्रॅक्टर जप्त

    editor deskBy editor deskJanuary 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अवैध वाळूचा उपसा व वाहतूक सुरूच असून शहर व परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत डंपर व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यामध्ये मेहरुण परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलिसांनी तर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणारे एक डंपर डीवायएसपींच्या पथकाने जप्त केले.

    सविस्तर वृत्त असे कि,  मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच १९, डीव्ही ८५०६) एमआयडीसी पोलिसांनी पकडले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोकों गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

    रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच ०४, ईबी ८८७३) उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने पकडले. चालक अनिल नन्नवरे याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. पोउनि समाधान गायकवाड, पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, रवींद्र मोतीराया, पोकों सचिन साळुंखे, महेश पवार, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील यांनी हे डंपर जप्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.