Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील राजमालती नगर परिसरात जून्या वादातून दोन गटात हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यावेळी एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या गटातील काही जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणारे संशयित फरार झाले होते. फरार झालेल्या सात जणांच्या शहर पोलिसांनी राजमालती नगरातून मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ७ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, जून्या वादातून राजमालती नगरात दोन गटातील वाद पुन्हा उफळून दगडफेकीसह हाणामारीची घटना दि. २० नोव्हेंबर रोजी राजमालती नगरात घडली होती. यामध्ये एका गटातील सिद्धार्थ माणिक वानखेडे यांचा मृत्यू झाला होता तर दोन्ही गटातील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील टेमी व्हिला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेल्या धनादेशचा गैरवापार करून सुमार २५ लाख ५ हजार ६०० रूपयांची फसणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २ जानेवारीला सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील टेमी व्हिला येथे अदिल रूसी कविना (वय ५७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. तर व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यांच्या ओळखीचे कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिरवार्ड, भुसावळ) यांना विश्वासाने त्यांनी दोन धानदेश दिले होते. या दोघांनी २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर दरम्यान या काळात संगनमत करून १ लाख १५…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या ममुराबाद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्याने सचिन अशोक सावळे (वय ३४) या तरुणावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथे सचिन सावळे हा तरुण वास्तव्यास होता. सलूनचे दुकान चालवून तो कुटुंबियांना हातभार लावित होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास सचिनने काहीतरी विषारी औषध प्राशन केले. कुटूंबियांनी सचिनला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी दुपारच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील चित्रा चौकात  असलेल्या जिल्हा कृषी औद्योगीक सर्वसेवा सहकारी संसी मर्यादीत या कापड दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्याठिकाणाहून आठ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चित्रा चौकात जिल्हा कृषी औद्योगी सर्वसेवा सहकारी संस्था मर्यादीतचे कापड दुकान आहे. याठिकाणी कमलाकर अभिमन ठाकरे (वय ६०, रा. घनश्याम नगर) हे नोकरीस आहे. दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी निघून गेले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील चित्रा  चौकात  रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात मौसिन सलिम पिंजारी (वय २३, रा. हरिविठ्ठल नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. १ जानेवारी रोजी चित्रा चौकात घडली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरात मौसिन सलिम पिंजारी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच्याजवळील (एमएच १९डीआर ७७१६) क्रमांकाच्या दुचाकीने चित्रा चौकातून घरी जात होता. दरम्यान, नेरी नाक्याकडून टॉवरकडे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या अनोळखी कारने तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू झाला आहे. विशेष यात जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ४५ रेल्वेच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासून प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही. भुसावळ विभागातील ३२ पॅसेंजर, मेमू विशेष क्रमांक असलेल्या गाड्या नियमित क्रमांकासह नवीन वर्षापासून धावू लागल्या आहेत. नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून त्या रेल्वेंची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासून प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गाड्यांच्या वेळेत बदल झालेल्यांमध्ये ११०३९ कोल्हापूर- गोंदिया एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक- शालिमार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मिळकतीमधील हक्क डावलण्यासाठी खोटे कागदपत्रं व बनावट मृत्युपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी वकिलांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाचे आदेशाने दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विश्रामनगर येथील श्रद्धा योगेश देसाई यांच्या सासऱ्यांच्या नावाने बनावट मृत्युपत्र तयार करून मिळकतीमधील हक्क डावलण्यासाठी उषा देसाई, दीपक देसाई, राजेश देसाई, स्वाती देशमुख, आनंदराज पाटील, रमेश पवार, अशोक पवार, अॅड. कालिंदी चौधरी यांनी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, हे मृत्युपत्र बनावट असून, न्यायालयाची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब श्रद्धा देसाई यांनी न्यायालयात वकिलामार्फत मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या…

Read More

मेष : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. जवळच्या नातेवाईकाचे सहकार्यही लाभेल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यातही तुमची महत्त्वाची भूमिका असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी राहील. वृषभ : महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्‍यास चांगले यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश लाभेल. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी वेळ अनुकूल नाही. व्‍यवसायिक जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी मशिन, कर्मचारी इत्यादींबाबत समस्या उद्भवू शकतात. मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील. एकमेकांशी समन्वय साधून कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल. कर्क :…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर नेहमीच टीकेचा भडीमार करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने राज्यात नव्या समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. जहाल नक्षलवादी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षल्यांनी नुकतेच गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन केले आहे. “सरकारने चांगले काम केले असून त्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे आमचे राज्य आहे आणि गडचिरोली हे नक्षल प्रभावित ठिकाण आहे. जर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून घटनात्मक मार्ग निवडला असेल तर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मराठी अभिनेते सचिन पिळगावकर हे नेहमीच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित “स्थळ” या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगावकर करणार आहे. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला “स्थळ” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त “स्थळ” चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी “स्थळ” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार…

Read More