• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोघामध्ये उडाले खटके : प्रेयसीचे घर गाठले अन प्रियकराच्या कृत्याने परिसर हादरला !

editor desk by editor desk
February 2, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य
0
दोघामध्ये उडाले खटके : प्रेयसीचे घर गाठले अन प्रियकराच्या कृत्याने परिसर हादरला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना या प्रेमप्रकरणातून होत असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पनवेलमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात केलेले कृत्य त्याचे आणि तिचे आयुष्य उद्धवस्त करून गेले. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नवीन पनवेलमधील 22 वर्षाचा निकेश शिंदे याचे प्रेम प्रकरण सुरू होते. पण दोघांमध्ये खटके उडाले आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाले. आपली प्रेयसी कुणाशी तरी बोलते असा त्याला संशय होता. त्याच्या या संशयाच्या भुताने दोघांमधील वाद वाढला होता. ब्रेकअप नंतर पण निकेश तिच्यावर पाळत ठेवून होता.

तू कोणाशी बोलते असा जाब विचारण्यासाठी निकेशने थेट प्रेयसीचे घर गाठले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी निकेशने सोबत चाकू सुद्धा नेला होता. रागाच्या भरात निकेशने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर निकेशने स्वतःवर चाकूने हल्ला केला. त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी निकेश शिंदे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांकडून होत असलेल्या गुन्ह्यावर चिंता व्यक्त होत आहे.

प्रेयसीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्यानंतर ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिची हत्या केल्यानंतर आरोपी निकेश शिंदेने स्वतःच्या गळ्यावर त्याच चाकूने वार केला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Previous Post

जळगावात रिक्षा व दुचाकीची जबर धडक : बाप लेक गंभीर जखमी

Next Post

भाविकांना घेवून जाणारी खासगी बस दरीत कोसळली : ५ ठार तर १७ जखमी !

Next Post
भाविकांना घेवून जाणारी खासगी बस दरीत कोसळली : ५ ठार तर १७ जखमी !

भाविकांना घेवून जाणारी खासगी बस दरीत कोसळली : ५ ठार तर १७ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group