जळगाव : प्रतिनिधी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा मोबाइल लंपास करुन चोरटा पसार झाला. ही घटना शनिवार दि. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तरसोद येथील नारायण प्रकाश राजपूत (वय ३५) हे दि. १८ रोजी अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेलमध्ये आले होते. चोरट्यांने त्यांच्या जवळ येत सुमारे १८ हजार रुपयांचा मोबाईल तसेच सिमकार्ड असा ऐवज चोरुन हॉटेलमधुन पसार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाने मोबाइलची शोधाशोध केली असता मिळाला नाही. काउंटवरही विचारणा केली. मात्र तपास लागला नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार रविवारी गुन्हा दाखल झाला.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घरी आलेल्या पाहुण्यांना पत्नी रिक्षा थांब्यापर्यंत सोडण्यासाठी गेलेली असताना प्रेमचंद भगवान पवार (४०, रा. साईनगर) यांनी घरामोरील छताला गळफास घेत आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यानंतर त्यांना पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ही घटना सोमवारी (२० जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एका चटई कंपनीत कामाला असलेले प्रेमचंद पवार हे साईनगरात राहतात. त्यांच्या दोन मुली आणि मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना रिक्षा थांब्यापर्यंत सोडण्यासाठी पत्नी गेल्या होत्या. त्यावेळी प्रेमचंद यांनी घराबाहेर छताला गळफास घेतला. परिसरातील नागरिकांनी त्यांना शासकीय…
जळगाव : प्रतिनिधी आई-वडील शेतात गेले असताना घरी एकटाच असलेल्या खिलचंद पंडित कोळी (२२ वर्ष, रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खिलचंदचा नुकताच साखरपुडा झाला असून, घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच त्याने टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, असोदा येथील खिलचंद कोळी हा तरुण शेती करून कुटुंबाला हातभार लावत होता. सोमवारी सकाळी त्याचे आई-वडील शेतात गेले असताना खिलचंद घरी एकटाच होता. त्याने घरात छताला गळफास घेतला. ही घटना परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने खिलचंदच्या आई-…
वरणगाव : प्रतिनिधी कार घेण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी विवाहितेने तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मारहाण व छळ केल्याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुकन्या विशाल तायडे (२७) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल तायडे, सासू मीराबाई सुरेश तायडे, सासरे सुरेश बाजीराव तायडे, दीर सागर सुरेश तायडे, आकाश अरुण तायडे रा. नागपूर, कविता सुरेश तायडे (रा. भुसावळ), नणंद रेखा सुरेश तायडे, मनीषा भागवत सोनवणे, नंदोई भागवत वामन सोनवणे दोघे रा. भुसावळ, तसेच विलास बाजीराव तायडे, अरुण बाजीराव तायडे, व मीनाबाई अरुण तायडे रा. नागपूर यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक नागरिक ऑनलाइनच्या नादात खिश्यात असलेल्या लाखो रुपयांची फसवणुकीचे प्रमाण नेहमीच उघडकीस येत असतांना आता पाचोरा तालुक्यातील एका ठेकेदाराला देखील असाच एक फटका बसला आहे. ऑनलाइन गेम खेळून भरघोस कमाई करा असे आमिष दाखवत शासकीय ठेकेदार रोशन पदमसिंग पाटील (वय २७, रा. पाचोरा, ता. जळगाव) यांची तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबरपासून दोन जणांनी रोशन पाटील यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून एका वेबसाईटवरील ‘अंदर बाहर व…
मेष राशी आज तुम्हाला व्यवसायात अनावश्यक धावपळ करावी लागू शकते. व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. कामाच्या ठिकाणी जोडीदाराच्या आकर्षणात बदलेल. कामात दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. किंवा वृषभ राशी आज विविध कामांमध्ये सक्रियता राहील. पात्र व्यक्तींना नोकरीत सकारात्मक संधी मिळतील. उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. आर्थिक बाबींचा आढावा घ्या आणि धोरण ठरवा. जमा झालेल्या भांडवलाचा योग्य वापर करा. कोणाच्याही बोलण्यात अडकू नका. मिथुन राशी आज महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधताना संयम बाळगा. कुटुंबातील सदस्यांचा महत्त्वाचा फोन येऊ शकतो. नात्यात उत्साह राहील. वातावरणात आनंदाची भावना राहील. जोडीदारावर प्रेम व्यक्त करू शकाल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. तुमच्या उत्साहात आणि उत्साहात तुमच्या…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गुन्हेगारी व राजकीय नाट्यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत असतांना आज पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मंत्री मुंडे म्हणाल्या कि, माझा बीड जिल्हा मुळात चांगला आहे. मी यापूर्वीच सविस्तर बोलली आहे. कुणाची हत्या हे राजकारणाचे हत्यार होऊ शकत नाही, हा कलंक आहे. तो पुसण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मुळात बीड शांत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्याचा अनुभव येईल, असा दावा त्यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला. आज आपल्या खात्याशी संबंधित विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर माहूरला श्री रेणुका मातेचे दर्शन घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मत्स्य महाविद्यालय येथील कॉलेज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी बदलापूरातील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीबाबत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला असून त्यात आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणार्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलिस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला पाच पोलिसांना जवाबदार धरत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असून नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री जाहीर केल्याने शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे तर काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केला आहे. काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गरज संपल्यात जमा आहे. नाराजी दाखवून अधिकचे काही पदरात मिळेल का, हाच त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुळात शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे यांना संपवत एकनाथ शिंदेंना आणले आता शिंदेंना संपून नवीन’ उदय’ पुढे येईल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लाच घेण्याच्या घटना घडत असतांना नुकतेच जळगाव एसीबीने एका मुख्याध्यापकाने लाच घेतल्याची घटना घडली आहे. शाळेचे इन्स्पेक्शन करत असताना पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे शेरा द्यावा, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात जळगाव लाचलुचपत विभागाने कारवाई करत आज मुख्यध्यापकाला १ हजार रूपये घेत असतांना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे असलेल्या प्राथमिक शाळेची इन्स्पेक्शन सुरू आहे. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे…

