जळगाव : प्रतिनिधी वीज मीटर फॉल्टी असल्याने सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याने वीज कंपनीतील लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वीज मीटर फॉल्टी असल्याने त्या बदल्यात सकारात्मक अहवाल देण्यासाठी 20 हजाारांची मागणी करीत तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीतील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांना पकडण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाडळसे, ता.यावल येथे ही कारवाई करण्यात आली. यांनी केली कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री.योगेश ठाकूर, श्रीमती नेत्रा जाधव पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोना…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापूर्वीच मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात आहेत. त्यामुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तरच या प्रकरणात योग्य चौकशी होईल,’ असे शरद पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चर्चेत आव्हाड म्हणाले की, “वाल्मीक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? कराडचा ‘आका’ तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलिस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाळूमाफियांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरु असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सध्या अवैध वाळूचा धंदा जोरात सुरु असून हे उद्योग थांबविण्यासाठी महसूल खाते प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने काल रात्री धरणगाव येथील तहसीलदारांनी चांदसर येथील गिरणा नदी पात्रात कारवाई करण्यासाठी पथक तयार केले. हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तिथे असलेल्या सुमारे 15 ते 16 वाळू तस्करांनी या पथकावर हल्ला सुरू केला. यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना जोरदार मारहाण करण्यात आली.…
नागपूर / चाळीसगाव – राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल 250 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आमदार मंगेश दादा चव्हाण यांना यश मिळाले आहे. सद्यस्थितीत वरखडे धरणाच्या बंदिस्त पाटचारीचे काम सुरू असून जवळपास १५ टक्क्याहुन जास्त काम प्रगतीपथावर आहे. मंजूर झालेल्या निधीमुळे या कामाला चालना मिळणार असून या सोबतच प्रलंबित असलेल्या तामसवाडी गावाचे पुनर्वसन व उपखेड / सेवानगर येथील भूसंपादन यासाठी देखील हा निधी वापरता येणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील…
जळगाव : प्रतिनिधी विना परवाना रिक्षा चालवणे, कागदपत्रे नसे, गणवेश न घालणे यासह नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतुक शाखेच्या वतीने बुधवारी सकाळपासून कारवाईची मोहीम राबविली. दोनशे पोलीसांच्या फौजफाट्याासह शहरात विविध ठिकाणी २५० रिक्षांवर कारवाई करुन त्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आल्या, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच शहरात होणारे अपघात टाळण्यासाठी गेल्या आठवड्यात शहर वाहतुक शाखेकडून महाविद्यालयालयीन विद्याथ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली होती. यावेळी शंभराहून अधिक दुचाकी जप्त करुन त्यांच्या पालकांना दंड ठोठवण्यात आला होता. त्यानंतर आता रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम…
जळगाव : प्रतिनिधी इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे मॅकोझेब ७५% हे शेतीपयोगी बुरशीनाशक एम ४५ नावाने अधिकृत विक्री होत असते. भुसावळ शहरातील वाल्मिक नगर येथे सदर कंपनीचा लोगो, ब्रँड नेम, समान रंग संगती असणारे पाकिटे तयार करून बनावट एम ४५ बुरशीनाशक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी तयार करण्यात असल्याचे गोपनीय सुत्रांकडून जिल्हा गुण नियंत्रण पथकातील अधिकारी विकास बोरसे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक व जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार यांना समजले. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन पाकिटे १०१०, बुरशीनाशक म्हणून वॉल पुट्टीच्या बॅग,…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील नगरपालिकेसमोरिल शॉपिंग सेंटरमधील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तत्काळ पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने ही आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कृषी केंद्र चालकाचे जवळपास ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानक रोडवर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपूर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर दुकान सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश कॉलनी स्थित घरी निघून गेले. दरम्यान, सायंकाळी…
जळगाव : प्रतिनिधी कामावरुन दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार विठ्ठल पांडुरंग शेळके (५५, रा. रामेश्वर कॉलनी) हे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१८ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील विठ्ठल शेळके हे एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. रात्री दुकानातून ते दुचाकीने घरी जात असताना भुसावळकडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (जीजे १४, एटी २४२४) दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांना धडक दिली. या घटनेत शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते भुसावळ मार्गावर आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी शांता कमलाकर वाणी (७८, रा. मुक्ताईनगर परिसर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १६ डिसेंबर रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी १७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते भुसावळ मार्गावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. शांता वाणी यादेखील या धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव बसने ट्रकला मागील बाजूने धडक दिल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यामध्ये ट्रकमधील अनिल समाधान पाटील हे जखमी झाले. हा अपघात १६ डिसेंबर रोजी रात्री महामार्गावर पोदार शाळेजवळ झाला. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक मिलिंद अशोक सोनवणे २८, रा. बांभोरी प्र.चा., ता. धरणगाव) हे त्यांचा ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ६५५६) बांभोरीकडून जळगावकडे घेऊन येत होते. त्यावेळी जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या बसचा चालक आनंदा दामू माळी (रा विदगाव) याने दारूच्या नशेत बस (क्र. एमएच १४, बीटी २३०४) भरधाव चालवत ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक उलटली व ट्रकमधील अनिल पाटील…

