Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील चोरवड येथील उपअभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (४६) यास तब्बल २० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. एका खासगी कंपनीचा नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ करण्यासाठीचा प्रस्ताव वरील उपअभियंत्याकडे दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता भुसावळ यांच्याकडे पाठविण्यासाठी इंगळे याने तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दिली. यानंतर बुधवारी २० हजार रुपयांची लाच घेताना इंगळे यास चोरवड येथे अटक करण्यात आली. याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे भक्ष्याचा पाठलाग करताना रात्रीच्या वेळी शेतातील विहिरीत पडून बिबट्या गतप्राण झाल्याची घटना बुधवारी भोटा येथे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, भोटा येथील रायबा तुळशीराम मोरे यांच्या गट क्रमांक ८१ मध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती सकाळी वन विभागाला मिळाली. वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अक्षय मोरे, स्वप्निल गोसावी, सुधाकर कोळी उमेश तायडे, योगेश बोरसे, महेंद्र पुरकर, पवन टेळे, गौतम मोरे, रसूल तडवी, राजू खिरडकर, विशाल खिरडकर, रमेश खिरडकर, अशोक तायडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन माहितीची शहानिशा केली असता विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ मृत बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढले.…

Read More

मेष राशी आरोग्याकडे लक्ष द्या. वैयक्तिक बाबींमध्ये शुभ आणि सहजता राहील. गोष्टी प्रभावीपणे पाहण्यात आणि पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. नियोजनाच्या प्रयत्नांना गती मिळेल. आर्थिक ताकदीचा अनुभव येईल. अपेक्षित यश मिळेल वृषभ राशी नेतृत्व क्षमता वाढेल. करिअर आणि व्यवसायात सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात उत्स्फूर्तता वाढेल. योग्य संधींचा लाभ घ्या. तज्ञांच्या सल्ल्याने काम करा. तुमच्या पुढाकाराच्या विचारांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त उत्साह दाखवू नका. व्यावहारिकता आणि समजूतदारपणामुळे तुम्हाला यश मिळेल. स्मार्ट काम कराल. मिथुन राशी सूडाची भावना टाळा. जबाबदाऱ्या पार पाडाल. कामकाजाच्या बजेटवर लक्ष केंद्रित कराल. पैसा हुशारीने खर्च करण्यावर भर द्याल. कर्जाचे व्यवहार टाळा. संयुक्त कार्य कराल. शुभ प्रस्ताव प्राप्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष कैलास करवंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेतील कथित भ्रष्टाचाराविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना धोरणात्मक मुद्यांवर भाष्य न करण्याची तंबी दिली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक रुपयात पीकविमा योजनेत काहीअंशी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. एक रुपयात पीकविमा योजनेत काही गैरप्रकार झालेत. 96 सीएससी केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती आहे. सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी फौजदारी कारवाई करतील. यासंबंधी साडेचार लाख अर्ज रद्द करण्यात आलेत. बीडमध्येच नाही तर अनेक जिल्ह्यांत हा प्रकार घडला आहे. पण कोणत्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण जोरदार चर्चेत आले असतांना आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडीला गरज भासल्यास पुन्हा कोठडी मागू शकते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटक असलेल्या आरोपींचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था इन्स्टाग्राम, फेसबूक अशा ॲप्सच्या माध्यमातून नवनवीन लोकाशी ओळख होते, प्रसंगी मैत्रीही केली जाते. मात्र सोशल मीडियाचा हाच वापर धोकादायकही ठरू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील दहिसर येथे घडला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या मित्राने एका मुलीवर अत्याचार केला, तसेच तिची अश्लील छायाचित्र काढल्याचेही उघडकीस आले. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडित मुलीला धमकावून तिचे अश्लील छायाचित्र ओळखीच्या व्यक्तींनाही पाठवले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 17 वर्षांची असून 2022 साली तिची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार आल्यापासून काहीना काही प्रकरणाने अडचणीत येत असतांना विरोधक महाविकास आघाडीतील ठाकरे गट आक्रमक होत सत्ताधाऱ्यावर हल्लबोल करीत आहे. आज देखील अक्षय शिंदे प्रकरणी ठाकरे गटाने सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले. अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही? फडणवीस, लोकांच्या मनात हा प्रश्न कायम सळसळत राहील. देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून फडणवीसांवर टीका केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये अवैध धंदेवाल्यांसह वाळू माफियांसोबत पोलिसांचे आर्थीक हितसबंध असल्याचे आरोप होत आहे. या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव विभागातील पाच पोलीस ठाण्यांसह एलसीबी आणि पोलीस मुख्यालयातील अशा एकूण ९ जणांची चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पोलीस मुख्यालयात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिंका माता मंदिरजावळ भरधाव वाळूच्या डंपरने चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली होती. यावेळी संतप्त जमावाने डंपर पेटवून देत पोलिसांवर वाळूमाफियांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता. शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये संबंधीत पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांसोबत असलेल्या आर्थीक संबंधामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय संकुलाच्या (मेडीकल हब) बांधकामासाठी बिलाची रक्कम टीडीएस कपात न करता अदा करण्यात आल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (२१ जानेवारी) आयकर विभागाचे नाशिक येथील पथक सकाळी नऊ वाजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल झाले. पथकाकडून दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन संध्याकाळी सातवाजेपर्यंत संपूर्ण झाडाझडती करण्यात आली. दरम्यान, आयकर विभागाचा हा नियमित सर्वे असल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले. चिंचोली शिवारामध्ये वैद्यकीय संकुलाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी केंद्र सरकारच्या एचईसीसी कंपनीला काम देण्यात आले आहे. बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून…

Read More