Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण !
    राजकारण

    वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण !

    editor deskBy editor deskJanuary 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्य पथवर तिरंगा फडकवणार आहेत. महाराष्ट्रातही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यांनी तिरंग्याला सलामी दिली. महाराष्ट्र पोलिस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

    जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

    प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीत राष्ट्रध्वज फडकावला आहे.

    प्रजाकसत्ता दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलिसांनी केलेले पथसंचालन उपस्थितांच्या डोळ्यांचे पाळणे फेडणारे होते, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्वातंत्र सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते उपस्थितांना संबोधन करताना राज्याच्या कृषी मंत्री यांनी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या अनेक योजना बद्दल माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.