पाचोरा : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक जोरदार सुरू असून पाचोरा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. दि. २७ रोजी मध्यरात्री गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली असून तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त करण्यात आला आहे. वाळूवाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिस पथकास सूचित केले. यावेळी पथकाने ३ ट्रॅक्टर व १ डंपर व त्यातील ९ ब्रास वाळूसह ६३ लाखाचा मुद्देमाल जप्त करीत चारजणांना अटक केली. यासह अन्य दोघे अशा ६ जणांविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. पोउनि योगेश गणगे, सुनील पाटील, सपोउनि पांडुरंग सोनवणे, पोहेकों राहुल शिंपी, भोजराज धनगर यांनी मध्यरात्री एक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मोहाडी-धानोरा रस्त्यावर उतरलेल्या महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्तिक पथकाने वाळूची वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांना जप्त केले आहे. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोऱ्यातील गिरणा पात्रात कारवाई सुरु केल्यानंतर सर्वच वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत ४ ट्रॅक्टर, २ डंपर, प्रत्येकी एक व्हायवासह ट्रक वाळूसह जप्त करण्यात आला आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी, डी.वाय.एस.पी. संदीप गावीत, तहसीलदार शीतल राजपूत, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड यांनी महसूल, तालुका पोलीस स्टेशन व शीघ्रकृती दलाचे जवानांचे एक पथक नियुक्त केले. त्यानुसार या पथकाने धानोरा-मोहाडी रस्त्यावर गस्त सुरु केली. त्यात वाहनांवर कारवाई केली गेली. या कारवाई पथकात म्हसावद मंडळाधिकारी अजिंक्य आंधळे, आसोद्याचे रमेश वंजारी,…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात घुसून मारहाण, कागदपत्रे चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यात अॅड. विजय भास्कर पाटील, अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह चारही जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तशी कागदपत्रे सरकार पक्षातर्फे मंगळवारी (२८ जानेवारी) न्यायालयात सादर करण्यात आली. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी १५ डिसेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अॅड. विजय भास्कर पाटील, त्यांचे भाऊ संजय भास्कर पाटील, अॅड. प्रवीण चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
अमळनेर : प्रतिनिधी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गर्भवती नील गायीचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जानवे गावाजवळ घडली. हा अपघात होताच वनकर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी माहिती दिली. मात्र नीलगाय सापडली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याने जखमी नीलगायीची माहिती दिल्यावर वन कर्मचाऱ्यांनी नीलगायीचा शोध घेतला. घटनास्थळी एका चारचाकीचे काच पडलेले होते आणि ३० फुटाच्या अंतरावर जखमी अवस्थेत नीलगाय आढळून आली. तत्काळ वनरक्षक रामदास वेलसे, जानव्याचे पशुवैद्यकीय अधिकारी थोरात यांनी भेट देऊन गाईवर उपचार केले. नीलगायीचे पुढचे पाय तुटलेले होते. तेथून नीलगायीला अमळनेर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गाढे यांनी…
जळगाव : प्रतिनिधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जि. प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील (डीआरडीए) कंत्राटी कर्मचारी अनिल हरी बडगुजर (४६, रा. वाघनगर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी रात्री वाघनगरात घडली. सविस्तर वृत्त असे कि, अनिल बडगुजर हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने काम करायचे. सोमवारी रात्री वाघनगर येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी ‘सुसाइड नोट’ लिहून आई वडील व भावाच्या मोबाइलवर पाठविली. त्यात त्यांनी कार्यालयात कोणा-कोणाकडून कसा त्रास दिला जात होता, याचा उल्लेख केला आहे. अनिल बडगुजर यांना गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयातील महिला विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. तथापि, संगम नदीच्या काठावर अजूनही लोकांची प्रचंड गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगम किनाऱ्यावर कसे तरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन करत आहेत.…
मेष : श्रीगणेश म्हणतात, आज अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. मनात काही काळापासून सुरू असलेला कोणताही संघर्ष संपेल. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा; कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. व्यावसायिक कामांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिकदृष्ट्या काही अडचणी आणि समस्या येऊ शकतात. तसेच तुम्हाला त्याचे निराकरण देखील मिळेल. तरुणांनी आपल्या करिअरबाबत गंभीर राहावे. व्यवसाय उत्पादन क्षमतेत वाढ होईल. वरिष्ठांशी वाद घालू नका. मिथुन : स्थलांतराशी संबंधित विचार असेल तर विशेष काळजी घ्या. मित्राचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कामात व्यस्त रहा आणि निरुपयोगी कामांमध्ये रस घेऊ नका.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता तर त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे जनतेचे लक्ष असतांना यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे आधीच लांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखी रखडल्या आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीने, निश्चित तारीख देऊन पुढील सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजीच या संबंधीचा निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल रमेश वाघ…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी आता चांगलेच वातावरण तापले असतांना सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. कारण भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांचे तांडव सुरू आहे. त्यांना शासकीय मदत सुरू असल्याशिवाय ते होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही. आमच्यावर दबाव येतो हे न्यायमूर्तीनीच सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी नियमित वेगवेगळे अपडेट समोर येत असतांना आता मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरि बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहे. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे कसे संबंध आहेत, त्यांच्यातील आर्थिक व्यवहार या सर्व…

