Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी मुलीचे दागिने आणि रोख रक्कम परत देण्यासाठी जळगावला जाणाऱ्या शिंपी दाम्पत्याच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत. ही घटना दि.२९ रोजी पारोळा बस स्थानकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नगरपालिकेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल भटू सोनू शिंपी, रा. गावहोळी चौक, पारोळा यांच्याकडे गेल्या काही दिवसांपासून त्यांची जळगाव येथील मुलगी व जावयाने ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचा तुकडा आणि तीन लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम ठेवायला दिली होती. ही रक्कम त्यांनी आपल्या पारोळा येथील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली होती परंत मलीला या रकमेची गरज असल्याने ती त्यांनी मागितली त्याप्रमाणे लॉकरमधून काढून दि.२९ रोजी शिंपी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पत्नी आणि मुलगा कामावर असताना विलास रूपचंद इंगळे (वय ५५, रा. वाल्मीक नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास इंगळे हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी स्वयंपाकाच्या कामाला गेल्या होत्या, तर मुलगा रिक्षामध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी गेला होता. त्यामुळे इंगळे हे घरी एकटेच होते. विलास इंगळे यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी इंगळे यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धानवड- पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष मिळून आल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन ते अवशेष जिल्हा रुग्णालयात आणले. पोलिसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड पिंपळे शिवारातील शेतात जात असलेल्या तरुणाला शेतात मानवी शरिराचे काही अवशेष दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, त्याठिकाणी मानवी शरिरातील कवटी आणि हातापायासह इतर अवशेष दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले. मानवी अवशेष…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे कर्जामुळे हताश झालेल्या हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (३७) शेतकऱ्याने या आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी येथे घडली. सविस्तर वृत्त असे कि, हिरालाल सोनवणे हे पिलोदा येथे आई, भाऊ, पत्नी, दोन मुलांसह राहात होते. शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. यंदा त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच गावातदेखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतली होती. डोक्यावर कर्जाचा बोजा असताना शेतात टाकलेल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्न चांगले आले नाही. याशिवाय शेतमालाला भावही मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. या विवंचनेतून त्यांनी रविवार, २६ रोजी कीटकनाशक पिले. विष घेतल्याचा प्रकार…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून तस्करी करत असलेल्या वाळू – माफियांवर महसूलच्या पथकाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर पकडले. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. मळलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाचे पथक वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना रिगाव येथून सुलेमार्गे वढोदा येथे वाळूची वाहतूक करत असलेले तीन ट्रॅक्टर त्यांच्या नजरेस पडले. यावेळी पथकाने त्यांना अडवले असता ट्रॅक्टर चालक पळून गेले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील यांना माहिती देऊन पोलिस सहकार्य मागितले. त्यानुसार कुऱ्हा पोलिस…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात दुचाकी घसरून अपघात घडला होता. यामध्ये पिता, पुत्र जखमी झाले होते. यातील जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाची तीन दिवस दिलेली मृत्यूशी झुंज अखेर बुधवारी संपली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी घसरून राकेश भरतसिंग बारेला (३०) आणि व त्याचा मुलगा युसुफ बारेला (१०) हे पिता, पुत्र जखमी झाल्याची घटना रविवार, २६ रोजी जानेवारी घडली होती. सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात मोटरसायकल घसरून राकेश बारेला व युसुफ बारेला हे दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. बालकाची प्रकृती गंभीर…

Read More

मेष राशी आज तुम्ही सर्वांशी चांगला संवाद साधाल. कामाचा दर्जा उंचावण्यात यश मिळेल. प्रशासकीय नफा वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. मोठे ध्येय असेल. फोकस वाढेल अनुकूलतेची पातळी अपेक्षेपेक्षा चांगली राहील. वृषभ राशी व्यवसायात चांगली प्रगती होईल. व्यावसायिकांवर विश्वास ठेवा. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, योग्य संधी मिळतील. उच्च अधिकारी तुमच्या युक्तीने प्रभावित होतील. संपत्ती मिळाल्यानंतर तुम्हाला अधिक आनंद वाटेल. चर्चेत सहभागी होतील. व्यावसायिक दळणवळण वाढेल. मिथुन राशी कुटुंब आणि जवळच्या लोकांच्या सल्ल्याने पुढे जाल. निर्णयात उत्स्फूर्तता राखाल. घाई दाखवणार नाही. घरामध्ये आनंदाची परिस्थिती राहील. राहणीमानात सुधारणा होईल. मोठे काम पूर्ण होईल. मुलाखतीला वेळ देईन. मित्र सहकार्य करतील.…

Read More

विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष सौ.भारती जि.रंधे यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आपल्या जळगाव शहराचे आमदार मा.श्री.सुरेश दामू भोळे (राजुमामा),मा.महापौर तथा सभागृह नेते श्री. ललितभाऊ कोल्हे,दर्जी फाऊंडेशन चे गोपाल दर्जी सर,प्रभागाच्या मा.नगरसेविका सिंधुताई कोल्हे मा.महापौर सीमाताई भोळे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सरिताताई माळी-कोल्हे, सौ.ज्योती गोपाल दर्जी, *मा.नगरसेविका सौ.लीनाताई पवार,योगिताताई पाचपांडे *शिवसेनेच्या शोभा चौधरी,निशा पवार,ममता जनजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन श्री. ललितभाऊ कोल्हे यांनी केले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काथार कंठहार वाणी समाजसेवा संघ, जळगांव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वाणी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धा 24, 25 आणि 26 जानेवारी या तीन दिवसांमध्ये मानराज पार्क मैदान प्रिंराळा येथे भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 पुरुष संघ व दोन महिला संघांनी सहभाग नोंदवला होता. यात पुरुष संघांमध्ये यंगर्स क्रिकेट क्लब यांनी विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद हे फ्रेंड सर्कल या संघाने मिळवले तर दुसरीकडे काथार 11 या संघाने महिला विजेतेपद पटकावले तर जय 11 यांना उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. गेल्या तीन दिवसात वाणी प्रीमियर लीग मध्ये एकूण 24 सामने खेळण्यात आले. सर्वच सामने हे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व…

Read More

जामनेर : प्रतिनिधी सोनबर्डी टेकडीच्या तळाशी असलेल्या जलतरण तलावात बुडून संकेत निवृत्ती गवांडे (पाटील) (१५, रा. हिवरखेडे रोड, जामनेर) याचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, जलतरण तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती सोशल मीडियावर होती. यावरून ही घटना पुढे आली. जालमसिंग राजपूत यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. संकेत हा घोसला, ता. सोयगाव येथील राहणारा असून तो व त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी आजीकडे जामनेरला आले. येथील शाळेत तो आठवीत शिकत होता. जलतरण तलाव काही दिवसांपासून बंद होता, मात्र त्यात नुकतेच पाणी सोडल्याचे सांगण्यात आले. नगरपालिकेने तलाव बांधला आहे. मात्र, या घटनेमुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read More