Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी कंपनीच्या कामानिमित्त हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेले अतुल यशवंत महाजन (३८, रा. पंचवटी, जि. नाशिक) यांचे एटीएम कार्ड, मोबाइल एका जणाने चोरून नेला. त्यानंतर एटीएममधून एक लाख १७ हजार रुपये काढण्यात आले. ही चोरी हॉटेलमध्ये शेजारील बेडवर असलेल्याने केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी के. राघवेंद्र (रा. कर्नाटक) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी येथील रहिवासी असलेले अतुल महाजन हे एका अमेरिकन कंपनीमध्ये नोकरीला असून कंपनीच्या सेल्सचे नागपूर व नाशिक विभागाचे ते काम पाहतात. २९ जानेवारी रोजी ते जळगावात कामानिमित्त आले व रेल्वेस्थानकाजवळील एका…

Read More

जळगाव : प्रतीनिधी तालुक्यातील एका गावामध्ये परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात चमासिंग बिलाला (२२, रा. भादली खुर्द, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक कुटुंब तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आले आहे. या कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चमासिंग याने गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पीडित मुलीने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चमासिंग बिलाला…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. याचबरोबर मुलगा झाला नाही असा आरोप करत त्रास देण्यात आला. पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून देण्यात आले याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पारोळा येथील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या शलाका सुयोग जैन या विवाहितेने यावल पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिचा विवाह सुयोग रवींद्र जैन (रा. बालाजी मंदिराजवळ, रथ गल्ली, पारोळा) याच्यासोबत झाला. विवाहानंतर पती सुयोग जैन, सासरे रवींद्र जैन, सासू पुष्पा जैन तसेच नंदोई रोशन लखीचंद जैन,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गिलियन बरे सिड्रोम या नव्या आजाराची पहिली महिला रुग्ण जळगाव शहरात आढळून आली आहे. ४५ वर्षीय महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषध व वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार या महिलेवर उपचार करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी या महिलेच्या पायात थकवा जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या व जुलाबचा त्रास सुरू झाला. गुरुवारी रात्री तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी एमआरआय, रक्त तसेच मेंदूतील पाण्याची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी त्याचा…

Read More

मेष : श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्थिती उत्तम असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. कोणत्याही प्रकारची समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव घेतल्याने कामगिरीवर परिणाम होईल. व्यावसायिक कामे व्यवस्थितपणे पूर्ण होतील. वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज महत्त्वाच्या लोकांशी भेट फायदेशीर ठरेल. घर आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राहील. मालमत्तेशी संबंधित एखादा प्रलंबित विषयावर तोडगा निघेल. तणाव घेण्याऐवजी शांततेने समस्या सोडवा. वाहन चालवताना काळजी घ्या. मिथुन : : श्रीगणेश म्‍हणतात की, रखडलेली कामे इच्छेनुसार पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. प्रतिकूल परिस्थित मन स्‍थिर ठेवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामाच्या ठिकाणी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ममुराबाद ते जळगाव रोडवरील एकविरा मंदिराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला कट मारल्याने तरुण खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी 30 जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अज्ञात डंपर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सत्यम पार्क परिसरातील सौरव ज्ञानेश्वर सपकाळे वय-२५ हा तरुण २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ०१२५) ने जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथून जळगावकडे येत होता. त्यावेळी रस्त्यावरील एकविरा माता मंदिराजवळ जळगावकडून ममराबाद गावाकडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने समोरून त्यांच्या दुचाकीला कट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा आता देशपातळीवर होत आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे आणि परळी मतदारसंघावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीड आणि परळीतील घटनांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट विधान केले. या घटना सर्वच ठिकाणी घडत आहेत. परळी परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या घटना होऊ नयेत. ही एक…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड खून प्रकरणी सर्वच विरोधकांनी अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता मंत्री मुंडे समर्थक हे आक्रमक झाले आहे. तर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील मंत्री मुंडे यांची बाजू मांडली आहे. नामदेव शास्त्री म्हणाले कि, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा असून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही, अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची बाजू मांडली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांची पाठराखण करत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला जातोय. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे काल भगवानगड…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे. या प्रकरणात अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, २८ जानेवारीला पुरी-अहमदाबाद १२८४३ या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळली. यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर ८.३५ वाजता आरपीएफकडे ही बॅग दिली. सीसीटिव्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले. भुसावळ…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले योगेश पाटील (वय २९) या युवकाला बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नगावफाट्याजवळ अज्ञात दोन युवकांनी नाकावर जोराचा बुक्का मारुन व चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये व मोबाईल लुटल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे पारोळा येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. ते रोज पातोंडा ते पारोळा दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे ते पारोळा येथून घराकडे येत असताना अमळनेर ते चोपडा रोडवरील नगाव फाट्यापासून काही अंतरावर ७ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे पल्सर या दुचाकीने योगेश पाटील यांच्या गाडीसमोर उभे ठाकले. गाडी थांबताच त्यांनी योगेश यांच्या नाकावर जोराचा…

Read More