जळगाव : प्रतिनिधी दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार, ३ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून, चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले. यामध्ये दुचाकीस्वारांना सवय लागणार यासाठी महिनाभर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली नव्हती, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली. शहरात हेल्मेट सक्ती नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर महामार्गावरील तसेच चौकांमध्ये हेल्मेट सक्ती राहणार आहे.
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी दहा हजार रुपये द्या… त्याचे एक लाख करून देतो, अशी बतावणी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. प्रकाश पीतांबर जाधव (५१, रा. सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) आणि मोहम्मद समीर अब्दुल करीम (५९, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्या दोन जणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील जांभूळ शिवारात जीवन खैरे (रा. चिंचखेडा) यांचे फार्म हाऊस आहे. याठिकाणी शुक्रवारी दुपारी वरील दोन जण आले. त्यांनी खैरे यांना दहा हजाराच्या मोबदल्यात एक लाख करून देतो… असे सांगितले. यावर खैरे यांनी या दोघांकडे ११ हजार रुपयांची रक्कम दिली.…
मेष राशी आज नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. सरकारी लोकांशी संबंधात गोडवा येईल. व्यवसायात नवीन करारांमुळे व्यवसायाची स्थिती सुधारेल. जमीन खरेदी-विक्रीच्या कामातील अडथळे दूर होतील. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वृषभ राशी व्यवसायात अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळू शकतात. शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेज इत्यादींमध्ये गुंतलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो. कपडे आणि दागिने खरेदीसाठी खूप पैसा खर्च होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळा. अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. मिथुन राशी आज भावंडांसोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनू शकते. प्रेमसंबंधातील दुरावा संपेल. प्रेमविवाहाची योजना आखणाऱ्या लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून सकारात्मक बातम्या मिळू…
जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अनेक संधी घेऊन आलेला आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. ना. गुलाबराव पाटील म्हणाले, “या अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषतः, जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेली पाच वर्षांची योजना तसेच डाळी उत्पादन वाढवण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.” सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीच्या निर्णयांबाबत बोलताना ते म्हणाले, “लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तीय मदत आणि नवीन उद्योग सुरू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज 2025-26 च्या केंद्रीय बजेटचे स्वागत करत हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. बजेट सादरीकरणानंतर माध्यमांसमोर बोलताना, मंत्री खडसे यांनी विविध लक्षित योजनांद्वारे महिलांना सशक्त बनवण्याचे आणि देशातील तरुणांना महत्त्वपूर्ण संधी प्रदान करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी “२०२५-२६ च्या केंद्रीय बजेटने परत एकदा सरकारच्या स्वयंपूर्ण आणि प्रगतीशील देशाच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडवले आहे, ज्यात युवाशक्ती, क्रीडा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.” असे सांगितले. 2025-26 च्या बजेटचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे…
मुंबई : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला. संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे. हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणता येईल, विशेषतः मध्यमवर्गासाठी. आयकर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रूपयापर्यंत कोणताही आयकर द्यावा लागणार नसल्याची महत्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये करदात्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही, असे जाहीर करून मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. तसेच 12 ते 16 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नावर केवळ 15% कर लागणार आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात करदात्यांना फायदा होणार आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले कि, राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनातील असलेली अनेक जाळमटे दूर होतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी टीका केली.…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथे मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने पायी चालणाऱ्या मजुरास बसच्या मागील भागाची जबर धडक बसल्याने ५० प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बोहर्डी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर घडली. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर कडून भुसावळकडे जाणारी एस.टी. बस (एम- २०, बीएल- ०७२०) ही घेऊन चालक दिलीप जीवराम नागरुत (वय ५५रा. मेसांगे, ता. मुक्ताईननगर) हे महामार्गावरुन सर्विस रोडकडे वळण घेत होते. याचवेळी रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या अनिल अंबोरे यांना एस.टी. बसच्या मागील भागाची जबर धडक बसली. या अपघातात अनिल अंबोरे हे रस्त्यावर फेकले गेल्याने…
जळगाव : प्रतिनिधी महाविद्यालयातून टहाकळी येथे दुचाकीवर मागे बसून जात असताना मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या महेश संजय पाटील (१८, रा.टहाकळी ता. धरणगाव) या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (३१ जानेवारी) मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथील महेश पाटील हा पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी (एनएमकेसी) महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. २३ जानेवारी रोजी दुपारी तो महाविद्यालयातून घरी पायी निघाला असताना त्याच्या गावातील एक जण कंपनीतून दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी त्यांनी महेशला दुचाकीवर बसवून घेतले. महामार्गावर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीलाजोरदार धडक दिली. त्यात महेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू…

