भुसावळ : प्रतिनिधी शहरातील चक्रधर नगरातील गायत्री मंदिराच्या मागील भागात संजय सुकलाल परदेशी यांच्या गिफ्ट फॅशन डिझायनिंग या कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता आग लागल्याने तब्बल ३५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळेस परदेशी हे तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते तर त्यांची पत्नी रंजना परदेशी हे बाजारात गेल्या होत्या. तेव्हा या कंपनीत त्यांचे १५ लाख रुपयांचे इंडस्ट्रियल गारमेंट मशीन, पाच लाखांचे रॉ मटेरियल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फर्निचर टीव्ही, केबिन वायरिंग, कुलर आदी साहित्य जळून खाक झाले. शेजाऱ्यांना धुराचे व आगीचे लोट उठताना दिसल्यावर त्यांनी त्वरित ही माहिती परदेशी यांना कळविली. आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेचे…
Author: editor desk
मेष श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडत आहे. फक्त योग्य परिश्रमाची आवश्यकता आहे. शुभचिंतकाची मदत तुम्हाला आशेचा एक नवीन किरण देईल. विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक गंभीर असतील. घाईघाईने आणि भावनिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेऊ नका. वाहन किंवा कोणत्याही महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान झाल्यास जास्त खर्च येऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस संमिश्र परिणाम देणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. समान विचारसरणीच्या लोकांना भेटल्याने नवीन ऊर्जा मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत काही तणाव अनुभवाल. संयमाने समस्येवर मात कराल. व्यापारात लाभ संभवतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. मिथुन श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मकत…
कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भाजपा नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. कृष्णराज महाडिक हे रिंकूसोबत लग्न करणार आहेत, अशी देखील चर्चा सुरू झाली. अखेर या फोटोवर प्रतिक्रिया देताना कृष्णराज महाडिक यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये ते रिंकू राजगुरूसोबत दिसत आहेत.’आज अभिनेत्री रिंकू राजगुरू या कोल्हापूरमध्ये आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मला दिली असती तर मी देखील चांगले काम करून दाखवले असते. राज्यातील अनेक नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस केल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करताना ज्या नेत्याच्या संस्था नाहीत, अशा व्यक्तीची आणि आक्रमक…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा शहरातील सोन्याच्या दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत पाचोरा पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. यासोबतच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी पाटील ज्वेलर्स या सराफा दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील CCTV कॅमेऱ्यांची तोडफोड करून DVR चोरला आणि ६८,००० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी दुकानाचे मालक राहुल विश्वनाथ चव्हाण यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मी पवारांवर बोलणे योग्य नाही मात्र कुटुंब फोडणाऱ्यांचे, महाराष्ट्र तोडणाऱ्यांचे सत्कार आणि कौतुक आम्ही करत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच ऑपरेशन टायगर करा, लोटस करा मात्र जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या. पक्ष सोडून जाणारे ‘जय महाराष्ट्र’ नव्हे तर ‘जय गुजरात’ करतात, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपसह पक्ष सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खोचक टीका केली. दरम्यान, दिल्ली…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी, लोकसभेत नवे आयकर विधेयक सादर केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या टप्प्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे आज हे विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक आता पुढील विचारविनिमयासाठी संसदीय वित्त स्थायी समितीकडे पाठवले जाणार आहे. सीतारामण यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नवे आयकर विधेयक सभागृहाच्या समितीकडे पाठवण्याची विनंती केली. हे विधेयक आज लोकसभेत मांडताच विरोधकांना त्याला विरोध केला. पण सभागृहाने ते सादर करण्यासाठी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. या विधेयकात ६२२ पानांमध्ये ५३६ कलमे, २३ प्रकरणे आणि १६ अनुसूची आहेत. हे विधेयक सध्याच्या कायद्यापेक्षा २०१ पानांनी कमी आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी चालू हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नांव नोंदणी धरणगाव येथील शेतकी संघ कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी असे आव्हाण एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, चालू वर्षाचा सन-2024-25 खरीपचा ऑनलाईन तूर पिकपेरा नोंदणी केलेला सातबारा उतारा, व नमुना 8 अ (खाते उतारा ) तसेच एकत्रित क्षेत्र असल्यास समंती पत्र व भाडेपट्टीवर (लिझवर घेतलेली आहे )करारनामा देण्यात यावा. ही कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करीता दि. 11 फेब्रुवारी पासून धरणगाव येथील कार्यालयात जमा करावीत. या वर्षी…
धरणगाव : प्रतिनिधी सरकार नेहमीच जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते काही ठिकाणी योग्य जनतेला लाभ मिळतो तर काही ठिकाणी या योजनेवर नको ते लोक डल्ला मारीत असतात अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथे घडली आहे. पत्नी गावची सरपंच असलेल्या चिंचपूरा येथील ग्रामपंचायत सदस्याने आईला कुटुंबातून विभक्त दाखवून तिच्या नावे घरकुलाचे अनुदान लाटल्याचा आरोप धरणगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे करण्यात आले. या प्रकरणी पंचायत समितीने दिलेल्या चौकशी अहवालात अनुदान परत करण्यात आल्याचे आणि दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. तथापि, तक्रारदाराकडून या अहवालावर संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु झाली असताना अनेकांनी लग्नाच्यापूर्वी खरेदी सुरु केली असून आता सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच जागतिक धोरणांमुळे शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचे सराफा बाजारात पडसाद दिसत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रम केला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह 88 हजार 475 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 99 हजार 910 रुपयांवर पोहोचले आहे. सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी…

