जळगाव : प्रतिनिधी सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिचा मित्र मिरखा नुरखा तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिने फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हे दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेतले. अर्चना पाटील ही ठाणे पोलिस दलात दाखल…
Author: editor desk
मेष श्रीगणेश म्हणतात की, मेहनतीच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. चांगली बातमी मिळाल्यास कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. यश मिळवण्यासाठी मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात तुमचा मोठा सहभाग असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. वृषभ ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. भूतकाळातील चुका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत केलेले बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जवळच्या नातेवाईकाशी सुरु असलेला वादही मिटू शकतो. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या. तुमची महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला…
कराड : वृत्तसंस्था तालुक्यातील आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत प्रेमसंबधातून एका ३० वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार (दि. १३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय ३५) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केले असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबधित महिला विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखाण्याजवळ एका एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर डेपोची बसवकल्याण – तुळजापूर (एमएच २० बीएल २०९२) ही बस लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखान्याजवळ नऊच्या सुमारास आली. तेथील स्टॉप वर बसमधून काही प्रवासी उतरले. त्यानंतर काही शालेय विद्यार्थी या बसमध्ये चढले. त्यानंतर अचानक इंजिन जवळ आग लागल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच बसमधील वाहक व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत संपूर्ण बस धुराने व्यापली होती. चालक व वाहकाने बसमधील…
मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून रेल्वे रुळावर अपघात होण्याचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील चैन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. हातकलंगले आणि रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळही ही घटना घडली. अचानक रेल्वेच्या एसी एम २ मध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १७४१२ हातकणंगले ते रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळ अचानक आग लागली. ट्रेनमध्ये आग लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन दिवसापासून अंतर्गत शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि कौतुक केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली होती. आता ही नाराजी नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी यू-टर्न घेतला आहे. संजय राऊत यांनी नाराज असल्याचे सांगितले होते. शरद पवारांच्या नेत्यांनी टीका केल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, “शरद पवारांना आम्ही नेहमी मुंबईत भेटतो.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून गळती सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून शिंदे गटाचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर म्हणाले, उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर हीच कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. परंतु उद्धव साहेबांना हे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यातील अनेक ठिकाणच्या दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेवून ताकद वाढविण्याचे काम सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील इनकमिंग सुरूच आहे. त्यातच आता काँग्रेससह इतर पक्षांनाह बरीच गळती लागल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्याच्या वाटेवर असून काँग्रेससग इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या काँग्रेस सह इतर पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली असून अनेक दिग्गज नेते हे विविध पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार…
भुसावळ : प्रतिनिधी येथील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पाटील मळा भागातील फळ विक्रेत्याकडे चोरट्याने भर दिवसा घरफोडी करुन २८ हजारांच्या रोकडसह १ लाख ४४ हजारांचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तपास लावून फिर्यादीच्या पत्नीच्या चुलत भावालाच या गुन्ह्यात अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळात चोरी झाल्याचा हा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान समोर आला होता. तर भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिक धास्तावले होते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात घरफोडीची उकल करत संशयित रिजवान फकीरा बागवान (३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यास अटक केली. संशयित आरोपीकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या ठिकाणाहून भर दुपारी एका इसमाच्या बँकेतून काढून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या अडीच लाख रुपयांवर अज्ञात दोन चोरट्यांनी हात साफ केला. पोलिस स्टेशनच्या खालीच ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांत चर्चेचा विषय आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील गणपूर येथील रहिवासी असणारे गोपाल संतोष पाटील (३९) हे दि. १२ रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास गांधी चौक भागात असणाऱ्या बँकेत गेले. त्यांनी आपल्या खात्यातून लागणारी अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. कापडी पिशवीत ही रक्कम आणि कागदपत्र त्यांनी बाहेरच असणाऱ्या आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. एका परिचयाच्या वृध्दास गाडीजवळ थांबायला सांगून गोपाल पाटील पुन्हा बँकेत गेले. मात्र वृध्द…

