धरणगाव : प्रतिनिधी
चालू हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नांव नोंदणी धरणगाव येथील शेतकी संघ कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी असे आव्हाण एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, चालू वर्षाचा सन-2024-25 खरीपचा ऑनलाईन तूर पिकपेरा नोंदणी केलेला सातबारा उतारा, व नमुना 8 अ (खाते उतारा ) तसेच एकत्रित क्षेत्र असल्यास समंती पत्र व भाडेपट्टीवर (लिझवर घेतलेली आहे )करारनामा देण्यात यावा. ही कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करीता दि. 11 फेब्रुवारी पासून धरणगाव येथील कार्यालयात जमा करावीत. या वर्षी हमी भाव तूर रु. 7550/- एवढा आहे. व सदर मालाची खरेदी वखार महामंडळ धरणगाव येथील गोदामात करण्यात येईन. सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान एरंडोल-धरणगाव तालुका शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मॅनेजर यांनी केलेले आहे. नोंदणीची अंतिम मुदत 22/02/2025 पर्यंत आहे.