नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी येत असतांना दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १० जण जखमी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१५) रात्री १० च्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जखमींना एलएनजेपी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र जखमींमधील १५ जणांचा रुग्णालयात…
Author: editor desk
मेष राशी सरकारी नोकरीत बढती मिळेल. राजकारणात तुमचे विरोधक पराभूत होतील. व्यवसायात नवीन सहकारी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. जुन्या प्रकरणातून दिलासा मिळेल. वृषभ राशी आज आर्थिक क्षेत्रातील आर्थिक धोरणे चांगल्या प्रकारे समजून घ्या. काही नवीन योजना इत्यादींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. जमीन, वास्तू आणि वाहनांच्या विक्रीसाठी आजचा दिवस चांगला राहील. भावंडांच्या सहकार्याने व्यवसायात लाभ होईल. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता राहील. प्रेम विवाह नियोजन यशस्वी होण्याचे लक्षण आहे. वैवाहिक जोडपं हे सहलीसाठी पर्यटनस्थळी जाईल. कर्क राशी आज आरोग्याशी संबंधित कोणतीही विशेष समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असेल. शारीरिक व्यायाम…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. या बँकेत मोठा अपहार झाल्याची माहिती मिळत आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेची तिजोरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. NICB चा Former General Manager and Accounts head हितेश मेहता विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे तब्बल 122 कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी हा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गट व पवार गटात शीतयुद्ध सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आभार मेळावा आयोजित केला जात आहे. आज हा मेळावा कोकणातील रत्नागिरीत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोकणवासियांचे आभार मानले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादामुळे मी तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या विजयामध्ये कोकणी माणसाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एकही आमदार निवडून येणार नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती महाराष्ट्राने बंद केली, अशा शब्दांत ठाकरे गटाला टोला लगावला. आज रत्नागिरी येथे आयोजित आभार मेळाव्यात माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत…
संगमनेर : वृत्तसंस्था राज्यातील शिक्षण क्षेत्रातून अनेक खळबळजनक बातमी समोर येत असतांना आता संगमनेर शहरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मालदाड येथील माध्यमिक विद्यालयात किरकोळ वादातून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजे सुमारास घडली. यामुळे शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालदाड येथील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस गुरुवारी असल्याने पतीसाठी त्यांनी पुष्पगुच्छ आणून ठेवला होता. वाढदिवस साजरा केल्यावर शुक्रवारी हा पुष्पगुच्छ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेऊन जा, असे पतीने सांगितल्याने या शिक्षिकेने हा पुष्पगुच्छ शाळेमध्ये आणला होता. त्यांनी हा पुष्पगुच्छ शाळेतील मुलांना दिला. गुरुवारी दुपारी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. आता या प्रकरणात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशात जर कोणी बोलत असेल तर मी देवा भाऊंना…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह भाजपचे आ.सुरेश धस एकाच व्यासपीठावरून मंत्री मुंडे यांना कोंडीत पकडत असतांना नुकतेच शुक्रवारी आ.धस यांनी चक्क मंत्री मुंडे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धस-मुंडे भेटीवर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय मंचावरील हे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ प्रेमाचे नाट्य पाहून सर्वसामान्य नागरिकांनी तोंडात बोटे घातली. ही भेट म्हणजे एक षड्यंत्र असल्याचे स्पष्ट दिसते, अशी जोरदार टीका जरांगे टापील यांनी या भेटीवर केली आहे. धस-मुंडे भेटीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ज्या लोकांनी टीका…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाकुंभ सुरु असल्याने कोट्यावधी भाविक सहभागी होत असतांना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो आणि बसमध्ये धडक झाली. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक कुंभमेळ्यात संगमामध्ये स्नान करून बोलेरोने परतत होते. त्याचवेळी मध्य प्रदेशातील राजगड येथील भाविकांची बस आणि बोलेरोमध्ये धडक झाली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो चक्काचूर झाली. अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात…
जळगाव : प्रतिनिधी किचनमधील विजेच्या बोर्डामध्ये शॉर्टसर्किट होऊन फ्रीजला आग लागण्यासह ती घरात पसरल्याने मुलांचे जन्मदाखले, आधारकार्ड व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शिवाजीनगर हुडको परिसरात १३ फेब्रुवारी रोजी घडली. सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगरमध्ये फरिदाबी बाकरअली सैयद (५५, रा. शिवाजीनगर हुडको) यांच्या घरामध्ये शेख अफसर शेख (३५) हे भाडेकरू राहतात. ते बाहेर असल्याने त्यांचे घर बंद होते. त्यावेळी घरमालकांना घरातून अचानक धूर येताना दिसला. त्यांनी शेजारील मंडळींना बोलावून घराचा दरवाजा तोडून पाहिले असता शॉर्टसर्किटमुळे फ्रीजला आग लागलेली होती. स्थानिक नागरिकांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत वाशिंग मशिन, लाकडी कपाट, मिक्सर, गादी, चादरी, पॅन कार्ड, आधार…
जळगाव : प्रतिनिधी दोन दुचाकींची धडक होऊन ठाकूरदास छुगोमल प्यारप्याणी (५१, रा. सिंधी कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरदास प्यारप्यानी हे मोहित सत्यपाल प्यारप्यानी (२३) याच्यासोबत दुचाकीने (क्र. एमएच १९ ईजे ९९३४) जात होते. त्यावेळी ही दुचाकी समोरील दुचाकीवर धडकली. यात ठाकूरदास प्यारप्यानी हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

