Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ‘छावा’ चित्रपट मोठ्या अडचणीत आला होता त्यानंतर हा चित्रपट अनेक चित्रपटगृहात सुरु झाल्यानंतर सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने एकूण ₹ ११६.५ कोटींची कमाई केली आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट आहे ज्याला इतका अद्भुत प्रतिसाद मिळाला आहे. ‘सकनिल्क’चा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतातून ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, एकूण भारतीय निव्वळ संग्रह ११६.५…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये आज दि.१७ सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर एकच घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बिहारच्या सिवान जिल्ह्यात होते. आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ५.३६ वाजता भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसाररिश्‍टर स्‍केलवर याची तीव्रता ४.० इतकी होती. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना संयम राखावा, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहावे, असे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वर्षभरापूर्वी मुंबईहून परतणारा प्रशांत प्रताप चौधरी (वय ३०, रा. जानकीनगर) हा तरुण येत असतांना तो रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला होता. वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी सकाळच्या सुमारास अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जानकी नगरात सामान्य कुटूंबातील प्रशांत प्रताप चौधरी (वय २८) हा तरुण मिळेल ते, खासगी कामे करुन कुटूंबाला हातभार लावत होता. वर्षभरापुर्वी प्रशांत कामासाठी मुंबई गेला होता. तेथे कामधंदा करुन कुटूंबाला अधार ठरला होता. मुंबईहून जळगावी येत असतांना धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला. वडीलांसह लहान भावाने शक्य ते उपचार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला धडक दिल्यामुळे मच्छिंद्र देवजी महाजन (३६, रा. विखरण, ता. एरंडोल) हे जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी जखमीला शिवीगाळ करीत मारहाणही केली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी डी-मार्ट समोर घडली. या प्रकरणी १५ फेब्रुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मच्छिंद्र महाजन हे दुचाकीने (एमएच १९ डीएल ८३९६) डी-मार्ट समोरून जात असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच १९, एएक्स ६३४२) धडक दिली. यात महाजन हे खाली पडले व पायाला दुखापत झाली. याचा जाब विचारला असता धडक देणाऱ्या दुचाकीवरील तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण…

Read More

चोपडा : प्रतिनिधी आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करून जमावाने हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. मारहाणीत पोलिस अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. ही थरारक घटना पार उमर्टी ता. वरला येथे शनिवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाशी झालेल्या झटापटीत सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हेकॉ. शशिकांत पारधी, किरण पारधी आणि होमगार्ड विश्वास भिल्ल हे जखमी झाले आहेत. यापैकी शशिकांत पारधी यांचे जमावाने अपहरण केले होते. त्यांची नंतर सटका करण्यात आली. रात्री उशिरा पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (३०), राजेंद्रसिंग • प्रीतमसिंग…

Read More

मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज समर्पित वृत्तीने काम केल्‍यास तुमच्‍या उत्‍पन्‍नात वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार सुधारतील. कोणतीही योजना आखण्यात घाई करू नका.नकारात्मकता वर्चस्व गाजवू शकते. भावनेच्या भरात घेतलेली निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. नवीन काम सुरू करण्यास वेळ चांगला आहे. जोडीदाराचा सल्ला तुमचे आत्मबल टिकवून ठेवेल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक बाबींवर सक्षम करण्‍यावर असेल. घराच्‍या नुतनीकरणाच्‍या विचारात असाल तर वास्तुचे नियमांचे पालन करणे हितकारक ठरेल. पैसे उधार देताना काळजी घ्या. कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करा.जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी आज तुमच्‍या सुप्‍त प्रतिभेला चालना मिळेल. विश्रांतीलाही प्राधान्‍य द्‍याल. नकारात्मक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यानं अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. माझ्यावर सिंचनाच्या आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून ठाकरे गटाला गळती लागली असतांना नुकतेच दोन ते तीन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आज भास्कर जाधव यांनी यावर मौन सोडले आहे. तर विरोधकांना प्रतिउत्तर देखील दिले आहे. पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव म्हणाले कि, कुठलेही पद मिळवण्यासाठी मी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शहरात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने मोठी खळबळ उडाली असतांना आता जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता गुलियन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कच्चे मांस खाल्ल्यामुळे जीबीएसची लागण होत आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज…

Read More

चोपडा : प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत उमर्टी गावात जाऊन आपल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. चोपडा ग्रामीण पोलीस हे महाराष्ट्रात असलेल्या ऊमर्टी गावात गेले आणि…

Read More