Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून तरूणाला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहितीनुसार, शहरातील कांचन नगरातील चौघुले प्लॉट परिसरात दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२) हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुर्गेश सपकाळे हा कांचन नगरातील उज्ज्वल चौकात उभा असतांना जुन्या वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पुर्ण नाव माहिती नाही) आणि यांच्या…

Read More

रावेर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी करून तिच्या आई व बहिणीस मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना तालुक्यात घडली. या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेच्या घराच्या खिडकीजवळ जाऊन रितेश सुधीर गवई (वय २०) या युवकाने शरीर सुखाची मागणी केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. बालिकेने हा प्रकार तिची आई व बहिणीस सांगितला. तर या युवकाने तुम्ही आमच्या प्रेमाच्या आड आल्यास तुम्हाला मारून टाकेल, अशी धमकी दिली, याबाबत पीडित बालिकेने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी इलेक्ट्रिक मीटरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे बेडरूममध्ये आग लागल्याने लग्नाचे बस्त्याचे कपड, इलेक्ट्रिक सामान, महत्त्वाचे कागदपत्रांसह संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. ही घटना रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ईश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ईश्वर कॉलनीत मोहित अनिल नाईक (वय १९) हा तरुण – आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घराच्या मागच्या खोलीत इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू महत्त्वाची कागदपत्र इलेक्ट्रिक साहित्य या त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले बस्त्याचे कापड देखील जळून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला ग्युलन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून, महिला रुग्णाला डिस्चार्ज दिला, तर रावेरच्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे डॉ. पाराजी बाचेवर यांनी सांगितले. या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले.  त्याच्यावर तत्काळ जीएमसीचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे यांनी उपचार सुरू केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत, एका शेतकऱ्याची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील प्रभाकर सोपान जावळे (वय ५५) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा असा परिवार आहे. फिर्यादीनुसार प्रभाकर जावळे यांचा मुलगा कुणाल याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष देत, २०१८ पासून ते आतापर्यंत सतीश दिलीप चौधरी (वय ३२, व्यवसाय व्यापारी) शशिकांत दिलीप चौधरी (वय २९), धर्मराज रमेश खैरनार (वय ३५), सरिता पंढरीनाथ कोळी (वय ४५,…

Read More

मेष श्रीगणेश म्‍हणतात की, आज मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्‍या समस्‍यांवर तोडगा निघेल. तरुणांनी त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करावे. आर्थिक व्‍यवहार काळजीपूर्वक करा. व्यावसायिक कामे पूर्वीसारखीच सुरू राहतील. कुटुंबासमोवत धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. वृषभ श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमची आर्थिक स्थिती आणि घराची व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. बेकायदेशीर कृत्‍या सहभागी होणार्‍यांपासून लांब राहा. जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या अडचणीचे कारण ठरण्‍याची शक्‍यता आहे. व्यवसायाच्या कार्यपद्धतीत काही बदल होऊ शकतात. दैनंदिन दिनचर्येसह आहाराकडे लक्ष द्या. मिथुन श्रीगणेश म्‍हणतात की, बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे आज एखाद्याच्या मदतीने पूर्ण होण्‍याची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असे सांगितले होते. मात्र, अद्यापही राजीनाम्याची कारवाई झालेली नाही. तसेच माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे विधान अजित पवार यांनी केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिस्थितीवर भाष्य केले आहे. अजित पवार जे बोलतात…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आ.धस व मंत्री मुंडे यांच्या भेटीवरून राज्यात राजकारण तापले असतांना आता यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे. खा.सोनवणे म्हणाले कि, भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट झाली होती. या भेटीत त्यांच्यात काय शिजले हे माहिती नाही. पण थोडे दिवस थांबा, त्यांचे सर्वच गुपित बाहेर येईल, असा दावा त्यांनी केल आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी यासंबंधी त्यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच खून प्रकरण चर्चेत असतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे त्या म्हणाल्यात. आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हाणला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्ती एकदा तरी महामार्गावरून प्रवास करीत असतो आता त्याच लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून फास्टॅगशी संबंधित नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने फास्टॅगसंदर्भात आजपासून (17 फेब्रुवारी) नवीन नियम लागू केले आहेत. अनेकदा वाहनचालक फास्टॅग खात्यामध्ये पैसे नसतानाही टोल नाका पार करतात. मात्र, आता असे केल्यास चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. समजा, फास्टॅग ब्लॅकलिस्ट अथवा बंद असेल तर टोल नाका पार करण्याच्या 60 मिनिटं आधी रिचार्ज करावे लागेल. चालक टोल पार केल्यानंतरही 10 मिनिटात रिचार्ज करू शकतात. मात्र, या 70 मिनिटांच्या कालावधीत रिचार्ज न केल्यास चालकांकडून दुप्पट टोल घेतला जाईल. टोल…

Read More