रावेर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी करून तिच्या आई व बहिणीस मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना तालुक्यात घडली. या युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेच्या घराच्या खिडकीजवळ जाऊन रितेश सुधीर गवई (वय २०) या युवकाने शरीर सुखाची मागणी केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. बालिकेने हा प्रकार तिची आई व बहिणीस सांगितला. तर या युवकाने तुम्ही आमच्या प्रेमाच्या आड आल्यास तुम्हाला मारून टाकेल, अशी धमकी दिली, याबाबत पीडित बालिकेने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे, तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत.